Various attractive Ganesha idols created in Central Jail. esakal
नाशिक

Ganeshotsav 2023: कारागृहाच्या महसुलात होणार वाढ! कैद्यांनी तयार केलेल्या मूर्ती पाहण्यासाठी लगबग

सकाळ वृत्तसेवा

Ganeshotsav 2023 : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाडूच्या मूर्ती कैद्यांनी तयार केलेले आहेत. मूर्ती बुक करण्यासाठी व पाहण्यासाठी कारागृहाच्या विक्री केंद्रावर ग्राहकांची गर्दी आहे. गणेशोत्सव अजून लांब असला तरी कैद्यांनी तयार केलेल्या मूर्ती पाहण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे.

या वर्षी वेगळ्या प्रकारच्या आकर्षक मूर्ती असून, कैदीबांधव श्रम घेत असल्याचे कारागृह अधीक्षक अरुणा मुकुटराव यांनी सांगितले. (Ganeshotsav 2023 Increase in prison revenue Close to see idols made by prisoners nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सध्या कारागृहामध्ये मूर्तीनिर्मिती केंद्रामध्ये कैदी बांधव वेगवेगळ्या आकर्षक आणि सुबक मूर्ती तयार करण्यात व्यस्त आहेत. दरवर्षी मूर्ती विक्रीतून लाखो रुपयांचा महसूल सरकार दप्तरी जमा होतो.

शिवाय मूर्ती शाडूच्या असतात. त्यामुळे गुणवत्तापूर्ण कलेने मूर्ती तयार केल्या जातात. कारागृहात सध्या मूर्तींना रंगकाम करण्याचे काम जोरात सुरू आहे. मूर्ती तयार करण्यासाठी अनेक दिवसांपासून कारागृहात कैदीबांधव श्रम घेत आहेत.

अर्धा फुटापासून तर चार ते पाच फुटांपर्यंत मूर्ती तयार केल्या जात आहे. गरजेनुसार मूर्ती बनविल्या जातात. नागरिक आवडीने कारागृहातील मूर्ती विकत घेऊन आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करीत असतात. या वर्षी कारागृहाच्या विक्री केंद्रात मूर्ती लावण्यात आलेले असून, मोठ्या प्रमाणावर विक्री होईल व महसूल मिळेल, असा अंदाज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT