येवला : उत्सवप्रिय असलेल्या येवल्यात बाप्पाची विसर्जन मिरवणूक आगळीवेगळी ठरते. या मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे, तसेच सौदार्याचे प्रतीक दिसून आले.
मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी मिरवणुकीत सहभागी मंडळांच्या अध्यक्षांचा सत्कार करत परंपरेचे जतन केले. (Ganeshotsav 2023 Symbol of Hindu Muslim Unity in Immersion Procession at yeola nashik)
शहरातील आझाद मैदानात मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी मंडळांना कसरती व खेळ सादर करण्यासाठी वेळ दिला जातो. या ठिकाणीच मिरवणुकीत सहभागी मंडळाच्या अध्यक्षांसह उपस्थित पदाधिकाऱ्यांचा मुस्लिम समाजातर्फे शहर काझी सलीमुद्दिन, ग्रीन कँडल ग्रुपचे अध्यक्ष अन्सार शेख, श्री. शेख आदींनी सत्कार केला.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, विद्यार्थी प्रदेश उपाध्यक्ष शाहू शिंदे, शहराध्यक्ष योगेश सोनवणे, सुदाम सोनवणे आदींनी सहभागी सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा घड्याळ देऊन सत्कार केला.
भुजबळ संपर्क कार्यालयातर्फे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक लोणारी, सचिन सोनवणे आदींनी अध्यक्षांचा सत्कार केला, तर भाजपतर्फे जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे, शहराध्यक्ष मीननाथ सोनवणे, युवराज पाटोळे, नीलेश परदेशी, संतोष नागपुरे, भीमा मांजरे, भूषण भावसार आदींनी अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
प्रशासनातर्फेही सर्वच मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, पोलिस उपअधीक्षक सोहेल शेख, तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी सत्कार केले.
कुणाल दराडे फाउंडेशनकडून सत्कार
कुणाल दराडे फाउंडेशन व शिवसेनेतर्फे माजी नगराध्यक्ष रामदास दराडे व जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी सर्व मंडळाच्या अध्यक्षाचा विठ्ठल मूर्ती देऊन सत्कार केला.
ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, बाळासाहेब लोखंडे, आनंद शिंदे, शहर काजी सलीमाउद्दीन, प्रांताधिकारी गाढवे, पोलिस उपअधीक्षक सोहेल शेख, तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी किरण देशमुख आदींचा कुणाल दराडे यांनी सत्कार केला.
फाउंडेशनचे कल्पेश पटेल, नितीन काबरा, किरण कुलकर्णी, विजय गोसावी, मकरंद तक्ते, योगेश सोनवणे, व्यंकटेश दोडे, आत्मेश विखे, मोहफीज अत्तार, अक्षय राजपूत, राहुल राठी, ऋषिकेश करहेकर, संजय कासार, भाऊ भागवत आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.