Nashik Ganeshotsav 2023 esakal
नाशिक

Nashik Ganeshotsav 2023: मौल्यवान गणपतीसाठी कडेकोट सुरक्षा! आयुक्तांकडून सुरक्षिततेबाबत तंबी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Ganeshotsav 2023 : नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीत यंदा ३१ मौल्यवान गणपतींची स्थापना झाली आहे. या गणपतीच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर आहेच.

शिवाय, पोलिसांच्या बंदोबस्तासह मंडळांच्या स्वयंसेवकांचाही कडेकोट पहाराही सज्ज आहे. दरम्यान, पोलिस आयुक्तांनी मौल्यवान गणपतीच्या सुरक्षिततेसंदर्भात मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सुरक्षिततेच्या उपाययोजनांसह मंडळांच्या स्वयंसेवकांच्या नेमणुका करण्याच्या सूचना केल्या आहेत.

पोलिस गस्तीवेळी या मंडळांच्या सुरक्षितेमध्ये हलगर्जीपणा निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्याची तंबीही दिली आहे. (Ganeshotsav 2023 Tight security for precious Ganesha Tambi on safety from Commissioner nashik)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

शहरात यंदा ८०५ मंडळांनी लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. यामध्ये ३१ मौल्यवान गणपतीचा समावेश आहे. मौल्यवान गणपतींवर सोन्या-चांदीची दागदागिने असून आकर्षक गणपती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होते.

आयुक्तालय हद्दीमध्ये सर्वाधिक मौल्यवान ८ गणपती भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहेत. तर मुंबई नाका आणि नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक-एक मौल्यवान गणपती आहेत. आकर्षक गणेशाला सोन्या-चांदीचे दागदागिने घालून आकर्षक वेशभूषा केली जाते.

त्यामुळे नाशिकमधीलच नव्हे तर जिल्हाभरातून भाविक गणेशोत्सव पाहण्यासाठी येतात. त्यामुळे मौल्यवान गणरायाच्या सुरक्षिततेची मुख्य जबाबदारी पोलिसांसह संबंधित गणेश मंडळांवर आली आहे.

मौल्यवान गणपतीच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर ठेवली आहे. याशिवाय दिवस-रात्र पोलिसांकडून गस्ती, सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत पोलिस कर्मचारी, होमगार्डची नियुक्ती केली आहे.

सुरक्षितासंदर्भातील जबाबदारी मंडळांवर सोपविली असून, पोलिसांच्या सूचनेनुसार मंडळांच्या स्वयंसेवकांचा जागता पहारा ठेवला आहे. याशिवाय पोलिसांच्या दिवस-रात्र गस्ती पथकांमार्फत सातत्याने गस्त असणार आहेच.

तसेच, क्युआर कोड मौल्यवान गणपतीच्या ठिकाणी लावण्यात आलेले असल्याने गस्तीवरील पोलिस पथकांना तर तासाने त्याठिकाणी जावे लागते. यामुळे कडेकोट सुरक्षिततेचे नियोजन करण्यात आलेले आहे.

शहरातील मौल्यवान गणपती

पोलिस ठाणे : संख्या

उपनगर : ०२

मुंबई नाका : ०१

सातपूर : ०२

नाशिकरोड : ०१

अंबड : ०२

भद्रकाली : ०८

सरकारवाडा : ०६

देवळाली कॅम्प : ०६

पंचवटी : ०३

एकूण : ३१

"मौल्यवान गणपतीसाठी पोलिसांकडून सुरक्षा पुरविण्यात आलेली असली तर मंडळांनी त्यांच्या स्वयंसेवकांचीही नियुक्ती करणे बंधनकारक आहे. तशा सूचना संबंधित मंडळांच्या प्रमुखांना देण्यात आलेल्या आहेत. रात्रंदिवस पोलिसांची गस्ती असणार आहे. यात हलगर्जीपणा निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल."- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT