वणी पोलिसांची साध्या वेषात पाळत ठेवत कारवाई Assistant Police Inspector Nilesh Bodkhe and the team arrested the suspects who stole pockets and jewelery while boarding the bus at the bus stand and took action. esakal
नाशिक

Nashik Crime: पाकिट, दागिने चोरणारी महिलांची टोळी गजाआड; सिन्नर, निफाड, मालेगाव येथेही गुन्हे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : वणी बसस्थानकावर संशयितरित्या वावरणाऱ्या सोनसाखळी चोरट्यांच्या टोळीस वणी पोलिसांनी पाळत ठेवून ताब्यात घेतले आहे. यात तीन महिलांसह एका पुरुषाचा देखील समावेश आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ही टोळी सक्रिय होती. बसस्थानकावर अनेकांचे दागिने पळविण्यात ही टोळी माहिर होती,मात्र पोलिसांनी गुंगारा देण्यात ती यशस्वी होत होती, त्यामुळे आजच्या कारवाईबद्दल वणी पोलिसांचे परिसरातून कौतुक होत आहे. (Gang of women steal wallets jewelery arrested at wani Crimes in Sinner Niphad Malegaon Nashik Crime)

वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वणी बसस्थानक येथे मंगळवारी (ता.३०) आठवडे बाजाराच्या निमित्ताने पंचक्रोशीतील खेड्यापाड्यावरील ग्रामस्थांची मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेत काही चोरटे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व इतर दागिने तसेच पाकिटे चोरण्याचे काम करत असतात.

मंगळवारी (ता.३०) पोलिसांनी साध्या गणवेशात वणी बसस्थानक व परिसरात पाळत ठेवली असता परिसरात संशयितरित्या वावरणारे सुलोचना वाल्मीक सोनवणे (४५, रा. लोहोनेर, ता. सटाणा), बेबीबाई रोहिदास कसबे (५०, रा. चाळीसगाव), रंजना माणिक लोंढे (४०, रा. सटाणा) आणि अकिल बशीर शेख (४९, रा. सटाणा) या चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यांची चौकशी केली असता, ही टोळी गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने तसेच पाकिटे चोरण्याचे काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळीने सिन्नर, निफाड, लासलगाव, मालेगाव तसेच चाळीसगाव येथे अशा प्रकारच्या चोऱ्या केल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ही कारवाई पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलिस अधिक्षिक माधुरी कांगणे- केदारे, उपविभागीय पोलिस अधिकारी पुरुषोत्तम सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे, उपनिरीक्षक प्रवीण उदे व पी. टी. जाधव, एच. के. चव्हाण, अण्णा जाधव, संजय दळवी, किरण गांगुर्डे, विजय खांडवी,

सुरेश चव्हाण, राहुल आहेर, मनीषा गायकवाड, वनिता आहेर तसेच महिला दक्षता समिती सदस्या कौशल्या पवार आदींनी केली. दरम्यान लासलगाव पोलिस ठाण्यात एका गुन्ह्याखाली या महिलांना अटक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT