Fraud Marriage esakal
नाशिक

Nashik Wedding Fraud : ‘नवरी मिळेना नवऱ्याला’; लग्न जुळविण्याऱ्या एजंटाच्या टोळ्यांचा निफाड तालुक्यात धुमाकूळ

एस. डी. आहिरे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जन्माआधीच मुलींचा गळा घोटण्याचे भीषण दुष्पपरिणाम आता सर्वच समाजाला भोगावे लागत आहेत. जवळ पैसा, जमीन जुमला, घरदार, असे तरी काही बहुजनापासून अल्पसंख्याक समाज घटकांत लग्नासाठी मुली मिळणे अतिशय कठीण झाले आहे.

‘नवरी मिळे नवऱ्याला’, असा एक मराठी चित्रपट खूप गाजला होता. (Gangs of matchmaking agents on the rampage in Niphad taluk nashik fraud crime)

आता त्या उलट ‘नवरी मिळेना नवऱ्याला’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्याचाच गैरफायदा घेत मागील दहा वर्षांत निफाड तालुक्यात लग्न जुळविण्याऱ्या एजंटांच्या टोळ्या अस्तित्वात आल्या आहेत. एजंटांना मिळणाऱ्या कमिशनच्या लालसेने कधी मुलीच्या, तर कधी मुलांच्या मंडळीचा विश्‍वासघात होत आहे.

निफाड तालुका आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे, पण मुलींचे प्रमाण घटल्याने निफाड तालुक्यात वयाची पंचवीशी-तिशी उलटूनही मुलांचे लग्न होताना दिसत नाही. निफाड तालुक्यात आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ५०० हून अधिक तरुणांचे वय २८ ते ४० वर्षे असून, त्यांना अजून वधू न मिळाल्याने बोहल्यावर चढता आलेले नाही.

मुलांचे लग्न व्हावे, यासाठी आई-वडील शादीराम घरजोडे अर्थात एजंटाच्या आधार घेतात, पण हे एजंट त्या कुटुंबियांच्या गैरफायदा घेऊन गंडा घालतात, असे अनेक प्रकार घडले आहेत. ‘बदनामी होईल’, या भीतीने कुणी पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला धजावत नाही.

दावचवाडी (ता. निफाड) येथील एका युवकाने मराठवाड्यातील वधूशी लग्न केले. त्यासाठी वधूच्या घरी तब्बल तीन लाख रुपयांचा हुंडा दिला. अंगभर सोन्यानी मढविले. मात्र, तोतया वधूने घराचा उंबरा ओलांडून रात्रभर मुक्काम केला अन्‌ सकाळी पसार झाली.

एजंटांच्या माध्यमातूनच ही फसवणूक झाली. मुलगा धनाढ्य असल्याचे भासविले जाते. वधूकडील मंडळींना बोलावून नसलेला द्राक्षबाग वराच्या कुटुंबीयाची असल्याचे बनावट चित्र एजंटामार्फत उभे केले जाते, असे ही प्रकार घडत आहेत.

मुलांच्या लग्नाची मोठी समस्या

निफाड तालुक्यात मुलांच्या लग्नाची मोठी समस्या आई-वडीलांना भेडसावत आहे. शेतकरी नवरा नको, बेरोजगारी, गरिबीमुळे लग्नासाठी मुली मिळणे अवघड झाले आहे. काही समाजात तर नाईलाजाने आंतरजातीय विवाह केला जात आहे.

दहा वर्षांपासून उद्धभवलेली या समस्येची दाहकता अधिकच तीव्र होत आहे. बिनलग्नाचा मुलगा ही पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विवाहावरून विवंचनेत असलेल्या पालक व मुलांच्या याच मानसिकतेचा फायदा घेणाऱ्या टोळ्यांनी निफाड तालुक्यात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

लग्न जुळवून देण्याच्या बदल्यात मुलाच्या वडिलांकडून लाखो रुपये उकळले जात आहेत. एजंटाकडून कमिशनसाठी वधू-वरांच्या आई-वडीलांना भूलथापा दिल्या जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT