नाशिक : पिंपळगाव बसवंत येथील टोलच्या स्वच्छतागृहाशेजारी चक्क गांजाच्या झाडाला संरक्षण दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २४ तास टोल प्रशासन आणि पोलिसांचा राबता असताना याकडे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (ganja tree stands on toll plaza at Pimpalgaon Baswant administration ignores nashik Latest Marathi News)
नेहमीच या ना त्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात असलेल्या पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरील स्वच्छतागृहाशेजारी दिमाखात गांजाचे झाड उभे आहे. समोरच व्यावसायिकांची दुकाने आहेत. असे असताना या झाडाला अभय कुणाचे, असा प्रश्न पडतो. विशेष म्हणजे झाडाला इजा होऊ नये, यासाठी आधार देण्यात आला आहे. हे झाड काढले जाईल का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात गांजाचे झाड असले की पोलिस तत्काळ कारवाई करीत गुन्हा दाखल करतात. आता तर टोलच्या जागेतच गांजाचे झाड असताना पोलिस कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
"टोलनाक्याच्या जागेत गांजाचे झाड असताना ते टोल अथवा पोलिसांना दिसत नाही. त्यामुळे यामागील रहस्य काय, याचा शोध घेण्याची गरज आहे."
-राजा गांगुर्डे, जिल्हा कार्याध्यक्ष, भीमशक्ती संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.