डीजीपी नगर (नाशिक) : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणपाडा गावातील ऐतिहासिक हेमाडपंथी मंदिरे गावाची कचराकुंडी बनल्याने पुरातन वास्तूंना अवकळा आली आहे. पुरातन अलौकिक ठेवा शेवटच्या घटका मोजत असल्याने असा पौराणिक महत्व असलेला ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी प्रशासन, पुरातत्व विभागाने दखल घ्यावी अशी मागणी शिवदुर्ग संवर्धन भ्रमंतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पर्यटनमंत्री, जिल्हाधिकारी, खासदार तहसीलदार आमदार सर्कल ग्रामसेवक ठाणपाडा गावचे सरपंच यांच्याकडे मागणी केली आहे.
हा ऐतिहासिक वारसा जतन व्हावा
ठाणापाडा (ता. त्र्यंबकेश्वर) गावाला ऐतिहासिक वारसा असून याठिकाणी पौराणिक हेमाडपंथी मंदिरांची दुरावस्था झाली आहे. मंदिरांना कचऱ्यातून मुक्त करा. किमान तिथल्या देवीदेवतांची अप्रतिष्ठा करू नका. पाषाणात कोरलेल्या कलाकुसरीच्या मंदिरांची मुक्तता करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यातील ठाणपाडा गावची ओळख खैराई पाली किल्ला. समुद्रसपाटीपासून २२९६ फूट उंचीवर असलेला हा किल्ला रामनगर साम्राज्याचा भाग होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. या किल्ल्याप्रमाणेच ठाणपाड्यातील या तीन मंदिरांची ओळख जनतेला व्हावी अशी तीन मंदिरे आज कमालीची जीर्ण अवस्थेत आहेत.
त्यातील एक मंदिर पूर्णपणे चांगल्या अवस्थेत आहे. परंतु अंगावर शहारे येतात कारण त्यांचा उपयोग चक्क कचराकुंडी म्हणून म्हणून केला जात आहे बाकीचे दोन मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली असून त्यांच्यातील अनेक मूर्ती काळाच्या छत्रछायेखाली उघड्यावर ऊन वारा पाऊस खात आहेत. शासन प्रशासन पुरातत्त्व विभाग या सर्वस्वी जबाबदार असून याची सखोल चौकशी व्हावी, प्रशासन आणि पुरातत्त्व विभाग यांनी एकत्र येऊन मंदिराची पुनर्बांधणी करून ऐतिहासिक वारसा कायमस्वरूपी जतन करावा अशी मागणी या पत्राद्वारे शिवदुर्ग भ्रमंतीच्या सदस्यांनी सहाय्यक संचालक पुरातत्त्व विभाग नाशिक यांना प्रत्यक्ष पत्रव्यवहार करून केली आहे. यावेळी संस्थेचे शाम गव्हाणे, वैशाली गायकर, संतोष शिंदे, अनिल दाते आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.