Garden of various fruits and flowers created in Zilla Parishad school premises. esakal
नाशिक

Nashik: शाळेत फुलवली नैसर्गिक पोषण परसबाग! नित्यानंदनगर प्राथमिक शाळेत पौष्टिक पालेभाज्या अन फळभाज्या बहरल्या

सकाळ वृत्तसेवा

येवला : विद्यार्थ्यांना पौष्टिक पालेभाज्या व फळभाज्यांची ओळख व्हावी, महत्त्व समजावे, या हेतूने नित्यानंदनगर (धामोडे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या कल्पकतेने अन्‌ विद्यार्थ्यांच्या मदतीने सेंद्रिय पद्धतीची परसबाग तयार करण्यात आली आहे. (garden of natural nutrition bloomed in school Nutritious leafy vegetables and fruits flourished in Nityanandnagar Primary School Nashik)

ग्रामीण भागातील छोट्याशा वस्तीवरील, द्विशिक्षकीय नित्यानंदनगर शाळेतील परसबाग आवर्जून पाहण्यासारखी आहे. परसबागेत शाळेतील दोन्ही शिक्षकांच्या मदतीने, तसेच नगरसूल बीटाचे विस्ताराधिकारी सुनील मारवाडी यांच्या संकल्पनेतून परसबागेत विविध प्रकारच्या पौष्टिक पालेभाज्या व फळभाज्यांची लागवड करण्यात आली.

यात वांगी, मिरची, टोमॅटो, भेंडी, गवार, शेपू, पालक, अंबाडी, दूधी भोपळा, गिलकी, दोडकी, तांबडा भोपळा आदी वेलींची लागवड करण्यात आली.

या वर्षी दुष्काळी परिस्थिती असूनही अत्यल्प पाण्यामध्ये शिक्षकांनी परसबागेसाठी स्वतः व विद्यार्थ्यांच्या उरलेल्या पिण्याच्या पाण्यातून पाणी उपलब्ध केले.

आजही ही परसबाग शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्वे व पौष्टिक घटक देत आहे.

या बागेचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने तयार केली असून, यासाठी कुठल्याही रासायनिक खताची अथवा रासायनिक औषधांची फवारणी केलेली नाही. जे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे आहे.

परसबागेतील विषमुक्त भाज्यांचा आस्वाद परिसरातील महिला घेत आहेत, तसेच विद्यार्थ्यांसाठी देण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पोषण आहारातही भाज्यांचा समावेश करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्यापन करताना परसबागेचा भरपूर उपयोग होतो. परसबागेसाठी मुख्याध्यापिका ललिता धनवटे, शिक्षक संतोष सोनवणे यांनी परिश्रम घेतले. कुसमाडी केंद्राचे केंद्रप्रमुख शांताराम काकड यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT