garlic ( file photo ) esakal
नाशिक

Garlic Rates Hike: लसूण 600 रुपये किलो! भाजीची फोडणी झाली जड

कसमादेसह परिसरात गेल्या काही महिन्यांपासून लसूण दरातील तेजी कायम आहे. गृहिणींना अवघ्या पावशेर लसणाला १५० रुपये मोजावे लागत असल्याने फोडणी जड झाली आहे.

रवींद्र मोरे

Garlic Rates Hike : कसमादेसह परिसरात गेल्या काही महिन्यांपासून लसूण दरातील तेजी कायम आहे. गृहिणींना अवघ्या पावशेर लसणाला १५० रुपये मोजावे लागत असल्याने फोडणी जड झाली आहे.

गृहिणींचे भाजीपाल्याचे आर्थिक बजेट बिघडले आहे. नवीन लसूण हंगाम सुरू होणार असला तरी काही दिवस लसूण महागच राहणार आहे. घाऊक बाजारात लसणाचा तुटवडा जाणवत आहे. (Garlic 600 per kg in kasmade area in malegaon nashik news)

शहरात परराज्यातूनही लसूण येतो. ही आवक राजस्थान व गुजरातमधून होत असूनही कमी पडत आहे. बाजार समितीत लसूण आवक कमी झाली आहे. लसणाचा हंगाम थंडी ओसरल्यानंतर सुरू होतो. जुन्या लसणाच्या प्रतवारीवर परिणाम झाला असून मागणीच्या तुलनेत बाजारात लसणाची आवक कमी आहे.

त्यातच यावर्षी पाऊस कमी झाल्याने दुष्काळाची परिस्थिती असल्याने त्याचाही फटका लसणाच्या उत्पादनावर झाला आहे. नवीन हंगाम सुरू होण्यास किमान अजून २५ ते ३० दिवस लागतील. किरकोळ बाजारात एक किलो लसणाची सहाशे रुपये किलो दराने होत आहे.

प्रतवारीनुसार पाचशे ते सहाशे रुपये किलो दराने लसूण विक्री होत आहे. चांगल्या प्रतीचा लसूण व गावठी लसूण ६०० ते ६५० किलो दराने मिळत आहे. गृहिणींचे बजेट कोलमडले असून येणाऱ्या काळात अशीच महागाई राहिली तर करायचे काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. काही शेतकरी भाव असल्याने लसूण बाजारात आणत आहेत. पण तो कच्चा व परिपक्व नसल्याने त्याला फारशी मागणी नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT