Teacher Gorakh Sanap and students performing Deep Puja at Vainteya Primary School  esakal
नाशिक

Gatari Amavasya 2023 : 'गटारी' नाही रे भाऊ, 'गतहारी अमावस्या'! जाणून घ्या गतहारी अमावस्येचा अर्थ...

सकाळ वृत्तसेवा

Gatari Amavasya 2023 : आषाढ अमावस्येला दिपपूजनाची प्राचीन परंपरा आहे.

दिव्याच्या तेजाने जीवन तेजोमय करण्याच्या उत्सवाला गटारी अमावस्या नावाने संबोधून भावी पिढीसमोर जाणारा चुकीचा संदेश टाळण्यासाठी निफाड येथील वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी दीपपूजनाचे आयोजन केले. (gatari amavasya 2023 meaning of gatahari amavasya nashik news)

शिक्षक गोरख सानप यांनी विद्यार्थ्यांना पणती, कंदील, निरांजन, मशाल, समई, दिवटी, लामणदिवा, पंचारती, नंदादीप, दगडी दिवे, कणकेचे दिवे अशा विविध दिव्यांची ओळख करून दिली तसेच दीपपूजनाचे महत्त्व समजावून सांगितले.

प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांनी कणकेचे दिवे तयार करून त्यापासून शाळेचे वैनतेय नाव साकारले. पुठ्ठयावर रंगकाम करून रंगीबेरंगी दिवे तयार केले. दिव्यांची पाटावर मांडणी करून त्याभोवती मुलींनी रांगोळी काढली. फुलांची सजावट करून दिव्या दिव्या दिपत्कार..., शुभंकरोती सारखे श्लोक म्हटले.

"रोज दिवा प्रज्वलित करून त्याला नमस्कार करण्याची थोर परंपरा आहे. भारतीय संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा आहे. चिमुकल्यांनी केलेला दीपपूजनाचा उपक्रम आषाढ अमावस्येला व्यसनाधीन होऊन गटारी अमावास्येचे स्वरूप देणाऱ्या आजच्या तरुण पिढीच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे." - वि. दा. व्यवहारे, कार्यकारी अध्यक्ष, न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळ निफाड.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तिन्ही सांजेला संस्कारी घराघरांमध्ये शुभंकरोतीचे मंजूळ स्वर कानी पडावे, विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती व परंपरेची माहिती व्हावी या हेतूने राबविलेल्या या उपक्रमाचे न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळ निफाड संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष वि. दा. व्यवहारे, संस्थेचे संस्थापक विश्वस्त ॲड. आप्पासाहेब उगांवकर, सचिव रतन वडघुले, किरण कापसे, राजेंद्र राठी, ॲड दिलीप वाघावकर, राजेश सोनी, प्रभाकर कुयटे, मधुकर राऊत, विश्वास कराड, नरेंद्र नांदे यांनी स्वागत केले. गटशिक्षणाधिकारी प्रिती पवार, विस्तार अधिकारी एल. के. भरसट, मुख्याध्यापिका सुजाता तनपुरे, केंद्रप्रमुख नीलेश शिंदे व पालकांनी कौतुक केले. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

जाणून घ्या गतहारी अमावस्येचा अर्थ

गटारी या शब्दाची उत्पत्ती ही 'गतहारी' या शब्दापासून झाली आहे. गत म्हणजे मागे सोडलेला / त्यागलेला आणि हारी म्हणजे आहार. म्हणजेच त्यागलेला आहार. पावसाळ्यात पचनशक्ती कमकुवत झालेली असते.

जड अन्न पचत नाही तसेच हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो म्हणून मासे खाणे टाळले जाते. या कालावधीत अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक भाज्या आपोआप खाल्ल्या जातात. वर्षभरात केला जाणारा आहार मागे सोडून चातुर्मासात वेगळ्या पद्धतीचा आहार घेण्याची ही सुरवात म्हणून ही अमावस्या 'गतहारी अमावस्या' या नावाने ओळखली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT