A queue to buy mutton on Sunday on the eve of Gutari Amavasya esakal
नाशिक

Gatari Amavasya 2023: नाशिककरांकडून आदल्या दिवशीच गटारी! रविवार ठरला खवय्यांसाठी पर्वणी

सकाळ वृत्तसेवा

Gatari Amavasya 2023 : सोमवती अमावस्येला सोमवार आल्याने नॉनव्हेज खवय्यांनी रविवारीच नॉनव्हेजला पसंती दिली.

त्यामुळे शहरासह उपनगरातही मटण, चिकन खरेदीसाठी सकाळपासून चक्क रांगा लागल्या होत्या. अनेकांनी चिकनला पसंती दिल्याने तेथेही खरेदीसाठी झुंबड उडाली होती. (Gatari Amavasya 2023 Sunday feast for non veg foodies nashik)

दीप अमवस्यानंतर अधिक मासाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे खवय्यांनी रविवारीच मटण चिकण, मासे, अंडे यावर ताव मारला. त्यामुळे शहरातील मटण, चिकनच्या दुकानावर चांगलीच गर्दी झाल्याचे चित्र होते.

यंदा महागाईचा फटका मासांहाराला बसला आहे. मटण प्रति ७५० ते ८०० रुपये किलोप्रमाणे विकले जात होते. तर तर चिकन २५० ते ३०० रुपये किलो प्रमाणे विकले जात होते. यंदा दीप अमावस्या सोमवारी आल्याने खवय्यांनी रविवारचा मुहूर्त साधत मांसाहारावर ताव मारला.

तसेच मासांहाराप्रमाणे मद्यपींची मद्य खरेदीसाठी ठिकठिकाणच्या बिअर बार व दारू दुकानात गर्दी झाली होती. रविवारचा वार खवय्यांसाठी पर्वणी ठरला. हॉटेल व्यवसायिकांसह मांसाहार विक्रेत्यांची दुकाने गर्दीने फुलली होती.

देशी-विदेशी मद्याच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. काहींनी शहराच्या आसपासचे पर्यटनस्थळ व पिकनिक स्पॉट निवडून तेथे कुटुंबासह मांसाहाराचा आस्वाद घेतला. सायंकाळी नाशिकच्या ढाबा व बारमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली.

नाशिकच्या प्रसिद्ध मांसाहारी खानावळी सोमवारी बंद असतात. मात्र रविवारीच त्यांनी छप्पर फाडके व्यवसाय केल्याची चर्चा ग्राहकांमध्ये होती. दरम्यान, सायंकाळी मच्छीचे भाव गगनाला भिडले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मुंबईहून येणारी वांब, पापलेट, कोळंबी, ओले बोंबील, सुकट, सुके बोंबील यांनाही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. पर्यटन आणि मांसाहार नाशिककरांनी रविवारीच अनुभवल्यामुळे सोमवारी गटारी कशी साजरी होते, याकडे लोकांचे लक्ष लागून आहे.

"प्रत्येक रविवारच्या तुलनेत या रविवारी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी गर्दी केली होती. सोमवारची गटारी रविवारीच साजरी करण्यासाठी अनेकांनी मासे खरेदी केले. मच्छीला मागणी मोठ्या प्रमाणावर होती." - लखन चव्हाण, मासे विक्रेते

मांसाहाराचे किलोचे भाव

मटन ७००-८००, गावठी कोंबडी- ४००-६००, कटला-३००, कोंबडा मासा- ३२०, मरळ नदीतील - ५००, मरळ समुद्रातील - १२००, वांब गावठी ६००, वांब समुद्रातील १२००, पापलेट -५००-७००, तिलापिया - १६०-१८०, रोहू -४००,चोपडा -४००-५००, सुरमई -५००-६००, मुऱ्या नदीतील - ६००-७००, खेकडा (प्रकारानुसार)- ३००-६००,कोळंबी - ३००-४५०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT