Health Update esakal
नाशिक

Nashik Health News : थंडीतील दुखणे व्‍यायामाने करा दूर!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आरोग्‍य संवर्धनासाठी हिवाळा अत्‍यंत उपयुक्‍त मानला जातो. परंतु हाडांशी निगडित शस्‍त्रक्रिया झालेले, अस्‍थी विकाराच्या रुग्‍णांसह ज्‍येष्ठ नागरिकांचे या काळात थंडीमुळे दुखणे वाढत असते.

हा त्रास टाळण्यासाठी नियमित व्‍यायामासह आहारात योग्‍य बदल करण्याचा सल्‍ला तज्‍ज्ञांकडून दिला जातो आहे.

सध्या ढगाळ वातावरणामुळे वातावरणातून थंडी गायब झालेली असली तरी ती लवकरच परतणार आहे. काही दिवसांपासून वातावरणात गारवा निर्माण होत आहे. काही दिवस नाशिकच्‍या विविध भागांतील तापमान पाच अंश सेल्सिअसपर्यंत खालावले होते. (Get rid of cold pain with exercise Nashik Health News)

अशा वातावरणात अस्‍थीविकाराच्‍या तक्रारींमध्ये वाढ होत असते. साध्या, सोप्‍या घरगुती उपाययोजनांतून चांगले आरोग्‍य राखता येऊ शकते, असे जाणकारांचे म्‍हणणे आहे. त्‍यासाठी व्‍यायाम व आहारात उचित बदल करण्याची आवश्‍यकता व्‍यक्‍त होते आहे. उपाययोजना करूनही दुखणे कमी झाले नाही, तर अंगावर न काढता अस्‍थिविकारतज्‍ज्ञांचा सल्‍ला घेण्याचे आवाहन केले जाते आहे.

जखडण्याची समस्या

विविध प्रकारच्‍या शस्‍त्रक्रिया झालेले रुग्‍ण, ज्‍येष्ठ नागरिक यांच्‍यामध्ये सांधे जखडण्याची समस्‍या वाढलेली असते. अशी तक्रार असलेल्‍या व्‍यक्‍तींनी सकाळी उठल्‍यावर अंथरुणात हलके-फुलके व्‍यायाम व शरीराच्‍या हालचाली करत मांसपेशी सैल करून घ्याव्‍यात. तसेच यानंतर गरम पाण्याचा शेक घ्यावा. उठल्‍यानंतर थोडे चालावे.

प्रोटिनयुक्‍त आहार घटवावा

युरिक ॲसिड वाढल्‍यानेही सूज वाढणे व अन्‍य आरोग्‍यविषयक तक्रारी वाढत असतात. अशा परिस्थितीत डाळीसाळी व प्रोटिनयुक्‍त पदार्थांचे सेवन घटवावे. त्रास उद्‍भवत असेल तर युरिक ॲसिडची पातळी तपासून घेण्यासाठी रक्‍ताची चाचणी करून घ्यावी, असा सल्‍ला दिला आहे.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

दिनचर्येत बदल गरजेचा

दुखणे कमी करण्यासाठी पायात मोजे घालणे, पायांचे संरक्षण करावे. रक्‍तवाहिन्‍या आकुंचन पावण्याची शक्‍यता लक्षात घेता, हलकी मालिश करताना शरीराच्‍या पेशींवरील ताण कमी करण्याचा सल्‍ला दिला आहे.

वेदांमध्येही सुदृढ आरोग्‍याचे महत्त्व विशद केलेले आहे. खाली नमूद श्‍लोकामध्ये व्‍यायामाचे महत्त्व सांगितलेले आहे.

‘व्यायामात् लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखं।

आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्॥’’

त्‍यानुसार व्‍यायाम केल्‍याने चांगले आरोग्‍य, दीर्घ आयुष्य, बल आणि सुखाची प्राप्ती होत असते. निरोगी असणे हे परम भाग्‍य आहे आणि स्‍वास्‍थ्‍य चांगले राहिल्‍याने अन्‍य सर्व कार्य सिद्ध होऊ शकतात, असे म्हटले आहे.

"हिवाळ्याच्‍या दिवसांत सांधे जखडणे व अन्‍य विविध प्रकारचे दुखण्याच्‍या तक्रारींमध्ये वाढ होत असते. सौम्‍य व्‍यायाम, गरम पाण्याचा शेक घेताना आहारात उचित बदल करून त्रास कमी करता येऊ शकतो. असह्य दुखणे असल्‍यास घरगुती स्‍तरावर औषधोपचार न घेता अस्‍थिविकारतज्‍ज्ञांच्‍या मार्गदर्शनाखाली योग्‍य उपचार घ्यावेत."

-डॉ. प्रकाश पाटील, अस्‍थिविकारतज्‍ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT