Nashik News : संसाराच गाडा हाकताना डोक्यावर पक्के छत असावे म्हणून प्रधानमंत्री घरकुल योजनेत अर्ज केला. घरकुलही मंजूर झाले. मात्र अद्यापही प्रतिक्षा यादीतून लाभार्थी यादीत नाव न आल्याने मेशी (ता. देवळा) येथील बोरसे कुटुंबीयांना घरकुल न मिळाल्याने घरकुलासाठी प्रतिक्षा करण्याची वेळ आलेली आहे.
यातच काही दिवसावर मॉन्सून आल्याने बोरसे कुटुंबीयांचे पावसाळ्यात हाल होऊ नये म्हणून गावातील आजी, माजी सैनिक आणि पोलिस दलातील भूमिपुत्र यांनी त्यांना घरावर टाकण्यासाठी ताडपत्री देत सामाजिक बांधिलकी दाखविली. (Gharkul approved but still waiting Grandmother ex servicemen and policemen lend helping hand to Borse family Nashik News)
मेशी येथील कौतिक आणि विठ्ठल मोतीराम बोरसे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे त्यांना मोडक्या घरातच राहावे लागत आहे. आपल्या डोक्यावर देखील इतरांच्या घराप्रमाणे पक्के छत असावे म्हणून बोरसे यांनी प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी अर्ज केला होता.
त्यांना घरकुल देखील मंजूर झाले. मात्र प्रतिक्षा यादीतून त्यांचे नाव सर्वसाधारण गटातील लाभार्थींच्या यादीत त्याचे नाव असल्याने त्यांना अद्यापही घरकुल न मिळाल्याने मोडक्या घरात राहण्याची वेळ आलेली आहे.
त्यामुळे पोटाची भूक भागवितांना कुटुंबाचे घरकुलाचे स्वप्न मागील काही वर्षापासून स्वप्नच राहिल्याचा प्रत्यय त्यांना येत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आता लवकरच पावसाला सुरवात होणार आहे. या पावसाळ्यात त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जाऊ लागू नये म्हणून गावातील आजी, माजी सैनिक आणि पोलिस दलातील भूमिपुत्र यांनी बोरसे कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.
या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. या आर्थिक मदतीतून दोघा कुटुंबांच्या घरावर टाकण्यासाठी दोन ताडपत्री देण्यात आल्या आहेत.
यावेळी माजी सैनिक दामू कापसे, प्रवीण बोरसे, अखिल भारतीय मराठा छावा संघटनेचे प्रवक्ते विष्णू जाधव, विशाल पाटील यांनी घरी जाऊन त्यांना मदत केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.