Manoj Ghode Patil esakal
नाशिक

NMC Nashik: पदोन्नती ‘घोडे’ बाजारात 2 पदांचे गिफ्ट; मागील चार- साडेचार वर्षात केलेले कामकाजाचे पराक्रम बाहेर

सकाळ वृत्तसेवा

NMC Nashik : महापालिकेमध्ये पदोन्नतीचे कागदी घोडे नाचविताना ‘बाय वन गेट वन फ्री’ या फॉर्म्युलानुसार अभियंत्यांना दोन पदांचे गिफ्ट प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांच्याकडून देण्यात आले आहे. पदांचे वाटप करताना वरकरणी अभियंत्यांची कमतरता दाखवली जात असली तरी हीच संधी साधून घोडे- पाटील यांनी ज्येष्ठतेनुसार नव्हे तर पदानुसार पदोन्नती दिली आहे.

नगररचना व बांधकाम विभागात अभियंत्यांना पदोन्नती घेताना नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल हे मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे. (Gift of 2 Posts in Promotion at nmc Out of performance in last four four half years Nashik news)

महापालिकेचे प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांच्याऐवजी उपायुक्त पदावर शासनाकडून लक्ष्मीकांत साताळकर यांची नियुक्ती झाली आहे. मात्र अद्यापपर्यंत साताळकर हे रुजू झाले नाही तर विद्यमान प्रशासन उपायुक्त घोडे- पाटील यांनीदेखील अद्याप पदभार सोडलेला नाही.

अजूनही ते प्रशासन विभागात येऊन कामकाज करतात, मात्र बदली झाल्यानंतर अशीही बदली झाली आहे आपले कोण काय करणार, अशा प्रकारातले वर्तन दिसून येत आहे. त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे मागील चार ते साडेचार वर्षात त्यांनी केलेले कामकाजाचे पराक्रमदेखील बाहेर पडत आहे.

मुळात दोन वर्ष नियुक्ती असताना त्यांनी मंत्रालयातून कार्यकाळ वाढवून आणला. मंत्रालयात त्यांच्या डोक्यावर कोणी हात ठेवला हा संशोधनाचा भाग ठरेल. मात्र, ठाणे शहरात वाढलेल्या त्यांच्या चकरा त्यांच्या कामी आल्याची चर्चा आहे.

घोडे- पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या अनेक वादग्रस्त कामांपैकी पदोन्नती हा विषय सध्या अधिक चर्चेला येत आहे. पदोन्नती देताना ज्येष्ठतेचे निकष बाजूला ठेवून भेटेल त्याला पदोन्नती असे धोरण राबविल्याचे दिसून येते.

जम्पिंग प्रमोशनच्या या फंड्यामुळे अनेकांना आकाश ठेंगणे झाले असले तरी महापालिका निवडणुका झाल्यानंतर सदर प्रकरण नवनियुक्त लोकप्रतिनिधींकडून उकरून काढल्यानंतर अनेकांची अडचण होईल, त्या भीतीने मनोज घोडे- पाटील हे सध्या इतिवृत्त मंजूर करण्याच्या मागे लागले आहे.

इतिवृत्त मंजूर झाल्यानंतर कायदेशीर स्वरूप प्राप्त होऊन ज्यांनी चुकीच्या पद्धतीने पदोन्नती घेतली त्यांना अडचण येणार नाही. तर ज्यांच्या स्वाक्षरीने पदोन्नती झाली ते बदलून जाणार असल्याने त्यांचे कोणीच काही करणार नाही, या भावनेतून इतिवृत्त मंजूर करण्याची घाई सुरू आहे. इतिवृत्त मंजूर करतानादेखील व्यवहाराची बोली लावली जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

‘बाय वन गेट वन फ्री’

प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांनी पदोन्नती देताना पदोन्नतीचे सर्व निकष गुंडाळून ठेवले. ‘बाय वन गेट वन फ्री’ हा मार्केटचा फंडा त्यांनी अवलंबला. महापालिकेच्या बांधकाम विभाग, नगररचना विभाग व पाणीपुरवठा तसेच ड्रेनेज विभागात एका अभियंत्यांकडे दोन पदभार दिले आहे.

दोन पदभार देताना अभियंत्यांची कमतरता, असे वरकरणी दर्शविले जात असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. पाणीपुरवठा विभागाचा कार्यभार सांभाळून अतिरिक्त कार्यभार बांधकाम विभागाचा सांभाळून ड्रेनेज विभागाचा अतिरिक्त कार्यभार अभियंत्यांना देण्यात आला आहे.

पदभार देतानाही एकाच विभागात पदभार तिला असता तर, ही कामकाजाच्या दृष्टीनेदेखील परवडले असते. परंतु ज्या अधिकाऱ्याकडे पाणीपुरवठा विभागाचा पदभार आहे. त्याच अधिकाऱ्याकडे अन्य विभागाच्या बांधकाम विभागाचादेखील कार्यभार सोपविण्यात आला आहे.

कामकाजापेक्षा स्वहित

नगररचना विभागाच्या अभियंत्यांकडे पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाचे मूळ कार्यभार असताना त्यांच्याकडे नगररचना विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. हीच परिस्थिती बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसंदर्भात आहे.

पाणीपुरवठा विभागाचे प्रकाश निकम, नव्याने नगररचना विभागाच्या उपअभियंता पदाचा कार्यभार स्वीकारलेले एजाज काझी, ज्युनिअर इंजिनिअर घोलप, दप्तरे, मिळकत विभागाचे जयवंत राऊत यांच्यासह दहा ते बारा अभियंता

अशा पद्धतीने पदभार ठेवून महापालिकेच्या कामकाजापेक्षा स्वहित जपण्याचे काम प्रशासन उपायुक्त घोडे-पाटील यांनी केल्याची चर्चा आहे.

अग्रवाल- घोडे- पाटलांच्या संमतीने सेटिंग

महाभारतात रणांगणावर काय चालले, याची इत्थंभूत माहिती देणाऱ्या संजयप्रमाणेच महापालिकेच्या बांधकाम व नगररचना विभागात कुठल्या अभियंत्याला कोणत्या जागेवर बसवायचे यासाठी नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांची मोठी भूमिका असल्याचे बोलले जात आहे.

अग्रवाल व घोडे- पाटील यांच्या संमतीने अभियंत्यांच्या पदोन्नती व पदभाराची सेटिंग झाल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT