Chhatrapati Shahu Maharaj, MP Dr. while gifting an electric bicycle to Samarth. Amol Jadhav. esakal
नाशिक

Nashik News: ऊसळविक्रेत्या समर्थला इलेक्ट्रीक सायकल भेट; खासदार अमोल कोल्हेंकडून सुखद धक्का

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : उसळ विकून कुटुंबाचे ओझे वाहणाऱ्या तेरा वर्षाच्या समर्थ ईश्वर जाधवला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते इलेक्ट्रिक सायकल आणि इलेक्ट्रिक भोंगा भेट देऊन सुखद धक्का दिला.

समर्थ आणि त्याच्या कुटुंबीयांना खासदार कोल्हे यांनी ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या शुभारंभप्रसंगी खास आमंत्रित केले होते. (Gift of electric bicycle to usal seller Samarth from MP Amol Kolhe Nashik News)

पुणे ‘सकाळ’ चे विशेष प्रतिनिधी संतोष शाळिग्राम यांनी काढलेली समर्थच्या संघर्षाची चित्रफीत आणि २ मार्चला ‘सकाळ’ मध्ये ‘चिमुकल्या समर्थ च्या खांद्यावर कुटुंबाचे ओझे’ या शीर्षकाने प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत खासदार कोल्हे यांनी समर्थसह मधुमेह आणि संधिवाताने आजारी असलेले वडील ईश्वर, मूकबधिर असलेली आई अनिता, आजी पुष्पाबाई, लहान भाऊ स्वामी, आत्या शैला शिंदे यांच्यासह कुटुंबाला कोल्हापूर येथे बोलावून घेतले.

महानाट्य सुरू होण्याच्या प्रारंभी कुटुंबाचे ओझे वाहण्यासाठी सुरू असलेला संघर्ष त्यांनी श्रोत्यांना सांगितला. एवढंस मूल दररोज १४ ते १५ किलोमीटर सायकलवर उसळ विकून कुटुंबाचा गाडा ओढत आहे.

हे कळल्यावर उपस्थित हजारो कोल्हापूरकरदेखील भावुक झाले होते. कोवळ्या वयातील त्याची ही दमछाक कमी करण्यासाठी खासदार कोल्हे यांनी पुढाकार घेत मुक्त विंग्ज सायकल कंपनीतर्फे तयार करण्यात येणारी इलेक्ट्रिक सायकल त्याला भेट दिली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

शिवाय इलेक्ट्रिक भोंगादेखील त्याला दिला. जेणेकरून ‘उसळ घ्या उसळ’ हा ओरडून साद घालण्याचा त्याचा त्रासदेखील काहीसा कमी होईल. छत्रपती शाहू महाराजांनीदेखील समर्थचे कौतुक केले. विशेष म्हणजे बारामतीमधील या कंपनीच्या या सायकलचे खासदार कोल्हे यांच्या हस्तेच नाशिक येथे झालेल्या महानाट्याच्या प्रयोगात अनावरण करण्यात आले होते.

कंपनीचे संचालक अनंत तावरे, गोकुळ पाटील आदी सदस्यदेखील या वेळी उपस्थित होते. दरम्यान, समर्थसाठी शासकीय योजनांच्या माध्यमातून घरासाठीदेखील प्रयत्न करणार असल्याचे खासदार कोल्हे यांनी सांगितले असून, नाशिक भेटीदरम्यान त्याच्या घरी ते स्वतः भेट देणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT