girish mahajan esakal
नाशिक

PM Modi In Nashik : मोदीमय वातावरणासाठी गिरीश महाजनांची शाळा; सभास्थळी नेतागिरी न करण्याचा पदाधिकाऱ्यांना सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त जाहीर सभेच्या ठिकाणी वातावरण मोदीमय करण्यासाठी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सभास्थळी पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली.

सकाळ वृत्तसेवा

PM Modi In Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त जाहीर सभेच्या ठिकाणी वातावरण मोदीमय करण्यासाठी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सभास्थळी पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली. सभेच्या ठिकाणी मोदीमय वातावरण करताना जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला.

पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ता म्हणून काम करावे, नेतागिरी करू नये, प्रभागातील नागरिकांना घेऊनच सभेला यायचे अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. (girish mahajan Advised to behave responsibly at meeting place of leader pm modi nashik news )

२७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव शुक्रवारी नाशिकमध्ये होत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा निश्चित झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून नियोजन केले जात आहे. सभेनिमित्ताने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा नारळ या सभेच्या माध्यमातून फुटला जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन तीन दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. सभेची, तसेच काळाराम मंदिर दर्शन व गोदाघाटावरील पाहणीचे नियोजन केल्यानंतर आज त्यांनी सभास्थळी पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली. त्यात त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या.

सभेला आठ हजार खेळाडू असले तरी लाखभर लोक जमविण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघातील नागरिकांना सोबत आणायचे, सभेत जिवंत वातावरण तयार करायचे आहे. मोदी यांच्या नावाच्या घोषणा द्यायच्या, अशा सूचना त्यांनी केल्या. सभेत कोणालाही गोंधळ करू देऊ नका, सभा सुरू असताना कोणाला उठू देऊ नका, प्रत्येकाने स्वयंसेवकाप्रमाणे वागण्याच्या सूचना महाजन यांनी दिल्या.

गर्दीचे टार्गेट व रॅलीचा पुरावा

सभेला एक लाखापेक्षा अधिक नागरिकांना गोळा करण्याची जबाबदारी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्हीआयपीसारखे बसू नये. प्रत्येकाने आपल्या प्रभागातील लोकांची रॅली काढून सभास्थळी आणायचे आहे. त्यासाठी व्हॉट्सॲपवर पुरावा देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. किती लोक रॅलीत सहभागी झाले याचा पुरावा व्हॉट्सॲपवर पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

सभेत ‘जय श्रीराम’चा नारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर त्यांचा जयघोष याबरोबरच सभेचे वातावरण श्रीराममय असावे, अशा सूचना दिल्या. प्रत्येकाच्या डोक्यावर ‘जय श्रीराम’ अशी टोपी असावी, भगवे मफलर सोबत आणावे, प्रत्येकाला स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. तसेच ‘जय श्रीराम, मोदी मोदी’ अशा घोषणा देण्याच्या सूचना महाजन यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

Sangli Election Results : 83 जणांचे 'डिपॉझिट' जप्त, मातब्बर नेत्‍यांचा समावेश; सोळा लढले, बाकीचे फक्त नडले

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

Latest Marathi News Updates : नागपूरमधील CM एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानासमोरील नावाची पाटी काढली

SCROLL FOR NEXT