नाशिक : अनेक महिने नाशिकच्या राजकारणापासून दूर राहिलेल्या माजी पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे शनिवारी (ता. ५) शहरात भाजपकडून जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी झालेल्या मेळाव्यात महाजन यांनी महापालिकेवर पुन्हा भाजपची (BJP) सत्ता आणण्याचे आवाहन केले. त्यामुळे पक्षाच्या सर्वच कार्यकर्ते, नेत्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले.
''नाशिकशी माझे जवळचे संबंध'' - महाजन
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांची नाशिकच्या प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. आज महाजन यांनी पक्ष कार्यालयात पदभार स्वीकारला. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, भाजपच्या सत्ताकाळात महापालिकेत मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्याने नाशिककर समाधानी आहे. सत्तेच्या पहिल्या अडीच वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. परंतु शिवसेनेचे सरकार आल्यानंतर पालिकेच्या विकास कामांमध्ये खोडा घालण्याचे काम झाले. परंतु केंद्रात भाजपची सत्ता असल्याने त्या माध्यमातून मोठे प्रकल्प दिले. त्यामुळे नाशिकमध्ये पुन्हा भाजपची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र लढण्यासाठी शिवसेनेकडून संजय राऊत (Sanjay Raut) व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) लक्ष देत आहे. परंतु असे असेल तरी नाशिककरांच्या मनामध्ये कमळ आहे. राज्य सरकार विविध स्तरावर अपयशी ठरले आहे.
नाशिकशी माझे जवळचे संबंध असल्याने प्रत्येकाला ओळखतो त्यामुळे कामगिरी लक्षात घेऊन उमेदवारी देईन असे सांगितले. शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी दीड वर्षानंतर भाजप कार्यकर्त्यांचा हुरूप वाढल्याचे सांगितले. ज्येष्ठ नेते विजय साने यांनी गुणवत्तेनुसार उमेदवारी देण्याची सूचना केली. लक्ष्मण सावजी यांनी आमच्याकडे दुर्लक्ष करू नका, असा टोमणा मारला. आमदार प्रा. देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले, सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, बाळासाहेब सानप, विजय साने यांची भाषणे झाली.
निवडणुका लांबणीवर मात्र गाफीलपणा नको
ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) निवडणुका घेऊ नये भाजपची भूमिका आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून मे महिन्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक लांबणीवर पडणार असली तरी गाफील राहू नका, असा सल्ला महाजन यांनी दिला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.