Girish Mahajan esakal
नाशिक

नाशिक : गिरीश महाजन यांच्या एंट्रीने पहिले पाढे पंचावन्न

विक्रांत मते

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भाजपमधील (BJP) पडझड थांबविण्यासाठी संकटमोचन म्हणून उल्लेख होणारे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडे प्रभारी पदाचा कार्यभार सोपविल्यानंतर आतापर्यंत गडप झालेल्या पडछाया पुन्हा एकदा गडद होण्यास सुरवात झाल्याने पहिले पाढे पंचावन्न असेल तर भाजपला कसे यश मिळेल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महाजन यांच्या धडाकेबाज निर्णयांचा यापूर्वी पक्षाला लाभ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची खेचाखेची सुरू आहे. त्यात मागील आठवड्यात भाजपचे तीन व अपक्ष अशा चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीने गिरीश महाजन यांची नाशिकच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली. तर जयकुमार रावल यांच्याकडे सहप्रभारी कार्यभार सोपविण्यात आला. महाजन व रावल यांच्या कामाची बेरीज-वजाबाकी करताना महाजन यांनी यापूर्वी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयाचा लाभ पक्षाला करून देण्याचा उद्देश आहे. मागील निवडणुकीत महाजन यांनी शिवसेना (Shivsena), मनसेला (MNS) खिंडार पाडले. पोट निवडणुकीत तीन जागा निवडून आणल्या. त्यानंतर महापालिकेत पूर्ण बहुमताने सत्ता आणली. ग्रामिण भागातही भाजपचा विस्तार केला. जिल्हा बॅंका, सहकार क्षेत्रात भाजपचे कमळ फुलविले. विशेष म्हणजे माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या समर्थकांनी स्वतंत्र गट तयार करून भाजपला धक्का देण्याचे जवळपास निश्‍चित झाले. त्यावेळी फुटलेल्या सर्व नगरसेवकांना माघारी आणण्याचे महाजन यांचे कसब सार्थकी लागेल. परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गिरीश महाजन यांचा संपर्क कमी झाला.

जळगावमधील राजकारण व त्यांच्या समर्थकांवर आलेले संकट दूर करण्यात महाजन यांचा वेळ खर्ची पडू लागल्याने जयकुमार रावल यांच्याकडे नाशिकचा कार्यभार सोपविण्यात आला. रावल यांचा मितभाषी व शांत स्वभाव, अपुरा संवाद, नगरसेवकांवर अडचण येऊनही मदतीला धावून जाणे, यामुळे पक्षांतर्गत दुही माजण्यास सुरवात झाली. परिणामी नगरसेवक फुटू लागल्याने भाजपने पुन्हा संकटमोचकाचा धावा केला.

पडछाया गडद

गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पद होते. त्याकाळात त्यांच्या नावे सरकारी कार्यालयांमध्ये विशिष्ट व्यक्तींचा वावर असायचा. पालकमंत्र्यांची पडछाया म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जायचे व ते सुद्धा स्वतःला त्याचं पद्धतीने सादर करायचे. आता महाजन पुन्हा नाशिकमध्ये येणार असल्याने गायब झालेल्या पडछाया पुन्हा दिसू लागल्या असून, तेच लोक सूत्रे हलविण्याच्या तयारीत आहेत. महापालिका निवडणुकांमध्ये उमेदवार कोण ठरवायचा येथपासून सर्वच गोष्टी ताब्यात घेण्याची लगबग सुरू झाल्याने पहिले पाढे पंचावन्न म्हणत पक्षातील जुनेजाणते दूर जाण्यास सुरवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT