Girish Mahajan statement on maratha reservation nashik news esakal
नाशिक

Girish Mahajan : जरांगे-पाटील यांना मुंबईला येण्याची वेळ येणार नाही : गिरीश महाजन

दोन-चार दिवस मागे-पुढे होतील. परंतु आम्हाला मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यायचे आहे.

सकाळ वृत्तसेवा

Girish Mahajan : दोन-चार दिवस मागे-पुढे होतील. परंतु आम्हाला मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. आम्ही त्यांना विनंती करू. त्यामुळे त्यांनी मुंबईला जाण्यासंदर्भात विचार करावा, जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभा केला आहे.

आता आरक्षण अंतिम टप्प्यात आहे. या प्रकरणाला वेगळे वळण मिळायला नको, कोणी भांडू नये, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देऊ, असे राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.(Girish Mahajan statement of Jarange Patil will not have time to come to Mumbai nashik news)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १२ जानेवारीला नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर स्थळपाहणी करण्यासाठी ते नाशिकमध्ये आले होते. त्यांनी तपोवनातील साधुग्राम मैदानाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, की आम्ही कोणाच्या आरक्षणाला धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण देऊ, त्रुटी दूर करून आरक्षण देऊ.

एकीकडे धारावीच्या मुद्यावर मोर्चे काढायचे, दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते शरद पवार अदानी यांची भेट घेतात. ते माझे मित्र असल्याचे सांगतात. आता उद्धव ठाकरे यांनीच ठरवावे. रात्री भेट होत आहे, वेगळी काही बोलणी करत आहे. परंतु मोर्चात सगळेच हजर दिसतात. त्यामुळे एकमत करावे. उद्धव ठाकरे यांना राममंदिर उद्‍घाटनाचे निमंत्रण मिळाले हे माहीत नाही. परंतु त्यांच्याकडून जे राजकारण सुरू आहे.

ते चांगले नाही. राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण आहे. ठाकरे गट राष्ट्रीय पक्ष राहिला नाही. त्यामुळे त्यांना निमंत्रण नसेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल बोलताना महाजन म्हणाले, की राज ठाकरे येत असतील, तर कुणाला हरकत घेण्याचे काहीच कारण नाही. आम्ही समविचारी आहोत, समविचारी पक्षांची युती होत आहे ही चांगली बाब आहे. राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्यामुळे ताकद वाढेल.

खडसेंच्या डोक्यावर परिणाम

राज्यात सर्वश्रुत असलेल्या एकनाथ खडसे व गिरीश महाजन वादाने आज टोक गाठले. राममंदिर आंदोलनावेळी गिरीश महाजन कोठे होते, असा सवाल खडसे यांनी केला होता. त्यावर बोलताना महाजन यांची जीभ घसरली. खडसे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून, त्यांच्यावर मलाच इलाज करावा लागेल. त्यांच्याकडे सध्या चप्पल घालायला पैसे नाहीत.

त्यांना १३७ कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. २७ कोटी रुपये भोसरी जमीन प्रकरणात भरावे लागणार आहेत. त्यामुळे ते भांबावले असून, त्यांना माझ्याशिवाय काही दिसत नाही. राममंदिर आंदोलनात मी जेलमध्ये गेलो. तेव्हाचा फोटो गाजला होता. हे त्यांनी माहीत आहे, असे असतानाही फालतू प्रश्‍न विचारतात. खडसे यांची अवस्था वाईट आहे.

नाशिकमधून निवडणुकीचे रणशिंग

मोदी यांचा राजकीय कार्यक्रम नसल्याचे सांगितले जात असले तरी नेहरू युवा केंद्राच्या कार्यक्रमाचे उद्‍घाटन व जाहीर सभा हे दोन स्वतंत्र कार्यक्रम असल्याने पंतप्रधान मोदी यांच्या जाहीर सभेनिमित्ताने नाशिकमधून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

गिरीश महाजन यांनी अप्रत्यक्षपणे तसे संकेत दिले. विकसित भारत संकल्पना घेऊन सरकारचे युवा धोरणे युवकांपर्यंत पोहोचविले जाणार असल्याचे ते म्हणाले, नाशिकला कार्यक्रम घेण्यासाठी आम्हीचं आग्रह धरल्याते ते म्हणाले.

खाद्यसंस्कृती दाखविण्याची संधी

१२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस असल्याने क्रीडा व युवा खात्यातर्फे युवा महोत्सव होईल. १६ जानेवारीपर्यंत तो चालेल. यात आठ हजार विद्यार्थी सहभागी होतील. पाच दिवस विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था, सांस्कृतिक, खाद्यमहोत्सव कार्यक्रम होईल. राज्याची संस्कृती दाखविण्याची संधी, स्पर्धा होतील, वक्तृत्व स्पर्धा, कथा-लेखन स्पर्धा असे उपक्रम होतील. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्‍घाटन होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray यांची बोंबाबोंब म्हणजे 'चोर के दाढी में तीनका', नेमकं कुणी केली अशी टीका?

Bombay High Court : तेलगोटे कुटुंबीयांची फाशीची शिक्षा रद्द, वडील-मुलाला सुनावली जन्मठेप,आईची निर्दोष सुटका

Arjun Tendulkar च्या संघाचा विक्रम! Ranji Trophy च्या ९० वर्षांच्या इतिहासात कुणीच केला नव्हता असा पराक्रम

Ulhasnagar Assembly Election : आयलानी यांचा जीव भांड्यात! योगी आदित्यनाथ यांची मीरा भाईंदरच्या सभेतून कुमार आयलानी यांच्यासाठी हाक

Narendra Modi: बाळासाहेबांची 'ती' इच्छा, पूर्ण कशी झाली सांगताना नरेंद्र मोदींचं 'मविआ'वर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT