Medical Education Minister Girish Mahajan releasing the MBBS syllabus at the convocation ceremony of maharashtra University of Health Sciences. esakal
नाशिक

MUHS Convocation Ceremony | कटप्रॅक्‍टिस नको, सेवाभावाने रुग्‍णसेवा करा : गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : समाज व्‍यवस्‍थेतील प्रतिष्ठीत घटक असलेल्‍या डॉक्‍टरांना आजही देवाचे दुसरे रूप मानले जाते. वैद्यकीय क्षेत्र हा व्‍यवसाय नसून सेवा करण्याचे माध्यम आहे. परंतु या क्षेत्रास कटप्रॅक्‍टिसच्‍या रुपी कीड लागली आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील पदवी, पदव्‍युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या स्‍नातकांवर सुधारणा घडविण्याची जबाबदारी आहे. युवा डॉक्‍टरांनी कटप्रॅक्‍टिस न करता कर्तृत्‍वाने मोठे होत सेवाभावाने रुग्‍णसेवा करावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (ता.१३) केले. (Girish Mahajan statement on MUHS Convocation Ceremony nashik news)

महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाचा बाविसावा दीक्षांत समारंभ विद्यापीठ प्रांगणात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आंतरविद्याशाखीय आरोग्‍य विज्ञान विद्यालयाचे प्रा.डॉ.भूषण पटवर्धन, विद्यापीठाच्‍या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ.माधुरी कानिटकर,

प्रति-कुलगुरू डॉ.मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ.राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ.संदीप कडू, विद्यापीठाच्‍या व्‍यवस्‍थापन परिषदेचे सदस्‍य डॉ.अजित गोपछडे आदी उपस्‍थित होते. याप्रसंगी स्‍नातकांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. तत्‍पूर्वी विद्यापीठ प्रांगणातून स्‍नातकांची विधिवत पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली.

श्री.महाजन म्‍हणाले, की रुग्‍ण-डॉक्‍टर यांच्‍या नात्‍यात तणाव वाढला असून, केवळ सुसंवाद साधतांना हा कमी करता येऊ शकतो. फॅमिली डॉक्‍टर ही संकल्‍पना पुन्‍हा रुजविण्याची आवश्‍यकता आहे. विद्यापीठ स्‍थापनेपासून कर्मचाऱ्यांचे काही प्रलंबित प्रश्‍न असून, त्‍याच्‍या पूर्तीसाठी प्रयत्‍न करणार असल्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.

प्रास्‍ताविकात कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर म्‍हणाल्या, की विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षातील दीक्षांत समारंभात विद्यापीठाची वाटचाल तंत्रज्ञान व प्रगतीच्या दिशेने सुरु आहे. व्हीजन डॉक्युमेंटनुसार निर्धारित कामे जलद गतीने होत आहेत.

येत्‍या दोन वर्षांत विद्यापीठाचा संपूर्ण कारभार पेपरलेस करण्यावर भर असेल. सेंटर फॉर एक्सलन्सकरीता विद्यापीठाकडून मोठे काम सुरू आहे. उत्तरपत्रिका स्कॅन करून ऑनलाइन पद्धतीने गुणांकन केले जात असून, यामुळे जलदगतीने निकाल जाहीर करणे शक्‍य झालेले आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी चेअर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली असून संशोधन, तंत्रज्ञानावर भर दिला जातो आहे. जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन तर परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी आभार मानले.'

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

संवेदनशीलता जपत करा रुग्‍ण सेवा : डॉ. पटवर्धन

संसर्गजन्‍य आजारांसोबत बदलत्‍या जीवनशैलीमुळे अनेक असंसर्गजन्‍य आजारांचा धोका वाढलेला आहे. अशा परिस्थितीत डॉक्‍टरांवरील जबाबदारी मोठी आहे. वैद्यकीय व्‍यवसायात कार्यरत राहातांना संवेदनशीलता जण्यास भावी डॉक्‍टरांनी प्राधान्‍य द्यावे, असे आवाहन डॉ.भूषण पटवर्धन यांनी केले.

ते म्‍हणाले, की रोबोट व आर्टिफिशियल इंटेलिजन्‍ससारख्या तंत्रज्ञानामुळे अन्‍य क्षेत्राप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रावरही धोका निर्माण झालेला आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशात याचे परिणाम दिसू लागले आहेत.

त्यामुळे रुग्‍णांसोबत सुदृढ नाते निर्माण करत या क्षेत्राचे महत्त्व अबाधित ठेवावे. डॉक्‍टराइतकेच महत्त्वाचे परिचारिका व आरोग्‍य व्‍यवस्‍थेतील प्रत्‍येक घटक आहे. त्‍यांनाही उचित सन्‍मान दिला पाहिजे.

सतरा स्‍नातकांना पीएच.डी. प्रदान

समारंभात सतरा स्‍नातकांना पीएच.डी. प्रदान केली. यात शिवानंतद तोंडे, मोहिनी नखाळे, अश्‍विनी भोसले, तुषार राठोड, धनराज राऊत, सारिका चोपडे, दिनेश वशिष्ठ, प्रज्ञा साबडे, सौदामिनी चौधरी, प्रतिभा विसावे, रवींद्र धिमधिमे, अस्‍मिता कुबेर, सुषमा डोंगरे, विभा महाजन, कुमार सुमन, नचिकेता राऊत यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

सुवर्णपदकाने ९६ विद्यार्थ्यांचा सन्‍मान

पदवी, पदविका, पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्‍या व आंतरवासियता पूर्ण केलेल्‍या आरोग्‍य शाखांच्‍या बारा हजार ७२७ स्‍नातकांना समारंभात पदवी प्रदान करण्यात आली. ९६ विद्यार्थ्यांना १२४ सुवर्णपदक प्रदान केले.

यात मुंबईच्‍या सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजमधील अमेय माचवे याने ५, सौमित्र गिनोडिया याने ३, श्रीविद्या व्‍यंकटेश्‍वरन हिने ३ सुवर्णपदक पटकावले. याशिवाय लोकमान्‍य टिळक मेडिकल कॉलेजच्‍या अमिया पुरकरने २, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेजच्‍या ईश्‍वरी यादवला दोन, नाशिकच्‍या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातील मानसी गुजराथीला दोन, औरंगाबादच्‍या सीएसएमएसएस डेंटल कॉलेजच्‍या यशश्री देशमुखला दोन, सांगलीच्‍या अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाच्‍या संयोगिता पाटीलने दोन सुवर्णपदक पटकावले.

कोल्‍हापूरच्‍या एसजेपीईएस होमिओपॅथी महाविद्यालयातील नासिरा खानला तीन सुवर्णपदक, नाशिकच्‍या मोतीवाला होमिओपॅथी महाविद्यालयातील प्राप्ती कालडा हिने दोन सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT