Chief Executive Officer Ashima Mittal giving information about the stalls of the stalls at the Panchayat Samiti's premises to Rural Development Minister Girish Mahajan.  esakal
नाशिक

Nashik Girish Mahajan : बचत गटांचा फिरता निधी दुप्पट करणार : ग्रामविकासमंत्री महाजन

सकाळ वृत्तसेवा

Nashik Girish Mahajan : महिला बचत गट सक्षमीकरणासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून, बचत गटांना सुरवातीस भांडवल स्वरूपात दिला जाणारा फिरता निधी दुप्पट केला जाईल.

त्यामुळे आता बचत गटांना १५ हजारांऐवजी ३० हजार रुपयांचा निधी मिळणार असल्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. (Girish Mahajan statement working capital provided to self help groups will be doubled nashik news)

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अभियानांतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक पंचायत समितीच्या आवारात आयोजित रानभाज्या व राखी महोत्सवाला मंगळवारी (ता. १५) ग्रामविकासमंत्री महाजन यांनी भेट दिली.

महाजन यांनी महिला बचत गटांच्या प्रत्येक स्टॉलवर जात महिलांशी संवाद साधला. रानभाज्यांच्या असलेल्या स्टॉलवर भाज्यांची माहिती जाणून घेतली. बचत गटांचे जाळे दिवसेंदिवस वाढत असून, या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. बचत गटांनी तयार केलेला माल, वस्तू आयात झाल्या पाहिजेत.

गटाची प्रत्येक महिला ही या माध्यमातून लखपती करण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार असल्याचे महाजन यांनी या वेळी सांगितले. बचत गटांना मदतीसाठी ‘शासन आपल्या पाठीशी’ असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) वर्षा फडोळ, नाशिक लोकसभेचे समन्वयक केदा आहेर, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील बच्छाव, प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

मंत्रिमहोदयांकडून साडेबारा हजारांची खरेदी

महोत्सवाच्या उद्‍घाटनप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे यांनी महोत्सवातून सर्वांनी हजार रुपयांची खरेदी करावी, अशी ताकीद दिलेली असतानाही, एकाही पदाधिकाऱ्यांनी खरेदी केली नाही. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्येक स्टॉलवर जात रोख खरेदी केली. साडेतीन हजारांच्या पाणवेलीपासून बनविलेल्या वस्तूंची त्यांनी खरेदी केली.

तत्त्व या बॅण्ड अंतर्गत असलेल्या अडीच हजारांच्या बेडशीटची, नागली बिस्कीट, शेळीच्या दुधापासून बनविलेला साबण, विविध प्रकारचे मसाले, भाजीपाला अशी एकूण १२ हजार ५०० रुपयांची खरेदी केली. त्यांच्या पाठोपाठ इतर पदाधिकाऱ्यांनीही रोख खरेदी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT