lpg cylinder esakal
नाशिक

Nashik News : गोबर गॅस कालबाह्य होण्याच्या मार्गावर; बहुतेकांचा कल LPG सिलिंडरकडे

सकाळ वृत्तसेवा

बिजोरसे (जि. नाशिक) : ग्रामीण भागात बैलांचा वापर कमी झाल्याने ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी, पशुधन व मजुरांअभावी ग्रामीण भागातील गोबरगॅस कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. (Gobar gas on way to expiration Most of them tend towards LPG cylinders Nashik Latest Marathi News)

एकेकाळी महत्वाचा घटक असणारा गोबर गॅस शेतकऱ्यांना संजीवनी ठरला होता. या गॅसची जागा इतर कंपन्यांच्या सिलिंडरने घेतली आहे. भारत आजही कृषीप्रधान म्हणून जगात ओळखला जातो. देशात ७४ टक्के शेती व्यवसाय केला जातो. पूर्वी ट्रॅक्टर नगण्य होते. प्रत्येक शेतकऱ्यांकडे शेतीसाठी उपयोगी असणारे बैल, गाई, म्हशी हमखास असायच्या. एकाही शेतकऱ्याकडे जनावरे नाही असे होत नव्हते. काळ बदलत गेला तसे तंत्रज्ञान, नवीन शोधामुळे सर्व काही बदलले.

ज्याच्या घरी जनावरे व शेती आहे त्या बहुतेक शेतकऱ्यांकडे गोबर गॅस सयंत्र असायचे. पाळीव जनावरांपासून दुध, तर शेणापासून बारीक कुटा करून शेण कालवून तो गॅससाठी वापरला जात असे. त्यामुळेच गॅस तयार होऊन तो स्वयंपाकाला मदत होत असे. कालांतराने मजूर टंचाई, पशुधनाचा अभाव, यांत्रिक शेतीमुळे ग्रामीण भागातील गोबरगॅस कालबाह्य झाला आहे.

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

मोठे कुटुंब असल्याने चुलीपेक्षा गोबर गॅसची मागणी त्याकाळी खूप होती. सरकारही अनुदान देत होते. त्यामुळे शेतकरी तयार होत असे.

"बैल, गाय व म्हशींकडे शेतकरी पूर्वी गरज म्हणून बघायचे. आता यांत्रिक पद्धतीने शेतीची अवजारे उपलब्ध झाल्यामुळे जनावरे कमी झाली. मी स्वतः २६ वर्षे गोबर गॅस वापरला. आता शेण कालवण्यासासाठी मजुरांची टंचाई आहे. त्यामुळे साहजिकच तो आता बंद पडला आहे."

- कैलास मोरे, बिजोरसे, गोबरगॅसधारक शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT