Goda Mahaarti : वाराणसीच्या धर्तीवर नाशिकमध्ये गोदाआरती सुरू करण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने ११ कोटी ४५ लाखांचा अंतिम आराखडा सादर केला.
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी (ता. १०) रात्री साडेनऊला गोदाआरती संदर्भात ऑनलाइन आढावा बैठक घेतली. (Goda aarti proposal at 11 crore by pwd nashik news)
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पहिल्या टप्प्यात गोदाआरती सुरू करण्याचे आदेश मंत्री मुनगंटीवार यांनी सोमवारी (ता. २९) जिल्हा प्रशासनाला दिले. प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबवली जाणार आहे. मात्र, गोदाआरतीचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे. गोदाआरतीचा मूळ आराखडा ५६ कोटी ४५ लाखांचा असून, त्यात अनेक बाबींचा समावेश आहे.
मात्र, एवढा मोठा आराखडा लोकसभा निवडणुकीपूर्वी मंजूर करणे शक्य होणार नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात आवश्यक बाबींचा समावेश करून दहा कोटींचा आराखडा तयार करण्याचे आदेश मंत्री मुनगंटीवार यांनी दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने अकरा कोटी ४५ लाखांचा आराखडा तयार करून गुरुवारी तो सादर केला.
येत्या तीन दिवसांत हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केला जाणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रशासकीय मान्यता द्यावी आणि आठ दिवसांची निविदा प्रक्रिया राबवून ५ मार्चपूर्वी कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले. साधारणतः १५ ते १७ मिनिटांची गोदाआरती होणार आहे.
१९ फेब्रुवारीचा मुहूर्त
नाशिकचा पुरोहित संघ व रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे गंगादशरा अर्थात गोदावरी जन्मोत्सवाच्या मुहूर्तावर गोदाआरती सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. दोन्ही संघांच्या समन्वयातून ही आरती होणार असल्याचे आता सांगण्यात येते.
पहिल्या टप्प्यातील कामे
- रामतीर्थावर घाट निर्माण करण्यात येतील
-लाइटची व्यवस्था
-साउंड सिस्टिम
-एलईडी स्क्रीन
-भाविकांच्या सोयीसाठी मूलभूत सुविधा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.