Chain Snatching Crime esakal
नाशिक

Nashik Chain Snatching : शहरात सोनसाखळी चोर सुसाट! 14 दिवसात 6 घटना, वृद्ध महिला भामट्यांचे टार्गेट

नरेश हाळणोर

Nashik Chain Snatching : शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये पुन्हा सोनसाखळी चोरट्यांनी डोके वर काढले असून, गेल्या १४ दिवसांमध्ये सहा महिलांच्या सौभाग्याचं लेणे या चोरट्यांनी ओरबाडून नेले आहे.

या भामट्यांकडून सकाळी व रात्री शतपावलीसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण असताना, गेल्या चार महिन्यात भामट्यांनी तब्बल ३९ सोनसाखळी ओरबाडल्या आहेत. तर दुसरीकडे पोलिस यंत्रणा सुस्त असल्याचेच दिसून येत आहे. (Gold Chain Snatching in city 6 incidents in 14 days targeting elderly women nashik crime news)

सध्या शहरात उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे दिवसा निर्मनुष्य असलेले रस्ते रात्री मात्र गारव्यात फेरफटका मारण्यासाठी नागरिक घराबाहेर पडतात. यात प्रामुख्यांना महिलांचा समावेश लक्षणीय असतो.

नेमका याचा फायदा सोनसाखळी चोरट्यांनी उठविला आहे. उपनगरी परिसरात कॉलनी रस्त्यावर युवती- महिलांसह वयोवृद्ध महिलाही शतपावली करतात. अशा रस्त्यावर फारशी रहदारी नसल्याने सोनसाखळी चोरट्यांना आयतीच संधी मिळत असल्याचे काही घटनांतून समोर आले आहे.

१४ दिवसांमध्ये शहरात ६ गुन्हे घडले आहेत. यातील बहुतांशी घटना या रात्री घडलेल्या आहेत. मुंबई नाका व उपनगर ठाण्याच्या हद्दीत प्रामुख्याने दोन-दोन घटना घडलेल्या आहेत. तर, पंचवटी व म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक-एक घटना घडल्या आहेत.

या सहा गुन्ह्यांमध्ये चोरट्यांनी तब्बल ३ लाख ५७ हजार रुपयांचा सोन्यावर डल्ला मारला आहे. तर, गंगापूर हद्दीतील होरायझन ॲकॅडमीसमोर एका ७१ वर्षीय वृद्धाला बतावणी करून त्यांच्याकडील ८० हजारांचे सोन्याचे दागिने हातचलाखीने दोघा भामट्यांनी लंपास केल्याचाही प्रकार घडला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यंत्रणा सुस्तावली

सध्या उन्हाळ्याचे दिवस आणि त्यात आमरसाचा सीझन असल्याने पोलिस यंत्रणा सुस्तावलेली असल्याच्या शेलकी भाषेत तक्रारदार महिलांनी शहर पोलिसांवर आपला रोष व्यक्त केला आहे. एकापाठोपाठ एक सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने घडत असतानाही कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.

शहरभर सीसीटीव्हीचे जाळे उभे राहिले आहे. तरीही पोलिसांच्या हाती संशयित अद्याप लागलेले नाहीत. गुन्हा दाखल करून घेण्याचे सोपस्कर पोलिसांकडून पार पाडली जाते. पोलिस ठाण्यासह शहर गुन्हे शाखांची पथकेही आळा घालण्यात अपयशी ठरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

१४ दिवसांतील सहा घटना

१) मुंबई नाका : ५ मे रात्री साडेसात : विनयनगरमध्ये ७७ वर्षीय वृद्धेची ८० हजारांची सोन्याची पोत ओरबाडली
२) म्हसरुळ : ७ मे दुपारी पावणेतीन : कलानगरमध्ये ५८ वर्षीय महिलेची ९० हजारांचे मंगळसूत्र खेचले.
३) पंचवटी : ९ मे रोजी रात्री पावणेनऊ : मखमलाबाद रोडवर ६६ वर्षीय वृद्धेची २५ हजारांचे मंगळसूत्र खेचले
४) उपनगर : १० मे रात्री साडेअकरा : गंधर्वनगरी, जेलरोडला ४७ वर्षीय महिलेचे ४५ हजारांचे मंगळसूत्र खेचले
५) मुंबई नाका : ११ मे रात्री सव्वासात : पखाल रोडला ७० वर्षीय वृद्धेचे ७२ हजारांचे मंगळसूत्र खेचले
६) उपनगर : १३ मेस सकाळी साडेआठ : टाकळी रोडला ४८ वर्षीय महिलेची ४५ हजारांचे मंगळसूत्र खेचले

चार महिन्यातील घटना

जानेवारी ते एप्रिलअखेरपर्यंत : ३९ चैनस्नॅचिंग
१४ मेपर्यंत : ६ चैनस्नॅचिंग
एकूण : ४५ चैनस्नॅचिंग

"सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या असल्या तरी पोलिसांकडून संशयितांचा माग काढला जात आहे. लवकरच ते जेरबंद होतील. तसेच, शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून तपासणी केली जात आहे. महिलांनीही मौल्यवान वस्तू बाळगू नये. जेणेकरून चोरट्यांना संधी मिळेल."

- वसंत मोरे, सहायक पोलिस आयुक्त, शहर गुन्हे शाखा नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पराभवानंतर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, राजीनाम्याची केली मागणी

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT