chain snatchers esakal
नाशिक

शहरात सोनसाखळी चोरटे सुसाट; दिवसाआड लुटले जात आहे स्त्रीधन

कुणाल संत

नाशिक : शहरात मागील काही दिवसांपासून सोनसाखळी चोरट्यांनी (Goldchain Thief) उच्छाद मांडला असून, शहरातील उपनगरांमधून दिवसाआड सोनसाखळी चोरट्यांकडून विविध बहाण्याने महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र (Chain Snatching) ओरबाडले जात आहे. या सोनसाखळी चोऱ्यांमागे इराणी टोळी (Irani gang) असल्याने या टोळ्या आता पोलिसांच्या रडारवर आल्या असून, पोलिस त्यांच्या मागावर आहे. मात्र, असे असतानादेखील शहरातील सोनसाखळी चोरीचे सत्र थांबलेले नाही. (Gold chain thieves active in city Womens wealth is being looted during the day Nashik News)

शहरात मागील पाच महिन्यांमध्ये ३३ महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र ओरबाडून नेण्यात आले आहे. सध्या लग्नसराई असल्याने लॉन्सच्या बाहेर उभ्या असलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रावर चोरटे आपले हात साफ करत आहे. तसेच पत्ता विचारण्याच्या बहाण्याने, दुचाकीवरून महिलांच्या जवळ जात धूम स्टाईलने गळ्यातून मंगळसूत्र ओरबाडून नेली जात आहे. अवघ्या काही सेकंदात हे चोरटे मंगळसूत्र चोरून नेत असून पोलिसांच्या हातालादेखील लागत नाही. यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसत शहरात नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन राबविले. मात्र त्यानंतरही सोनसाखळी चोरट्यांनी दोन दिवस लागोपाठ महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी ओरबाडून नेत पोलिस यंत्रणेलाच आव्हान दिले आहे. यातच मार्च महिन्यानंतर हे प्रमाण अधिक वाढले आहे. २०१९ ते मे २०२२ या साडेतीन वर्षात शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आतापर्यंत २९० सोनसाखळ्या ओरबाडून नेण्यात आल्या आहे. यात तीन वर्षात केवळ ४५ टक्के सोनसाखळ्या चोरीची उकल करण्यात आली आहे.

इतर राज्यात पोलिसांचे पथक

शहरातील वाढत्या सोनसाखळी चोरीवर आळा बसविण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून ठोस कारवाई करण्यासाठी पावले उचलली जात आहे. या चोऱ्यांमागे इराणी टोळ्या असल्याने या टोळ्यांच्या शोधार्थ त्यांचे वास्तव्य असलेल्या इतर राज्यात नाशिक पोलिसांचे पथक आता सर्च मोहीम राबवीत आहे. त्यासाठी पोलिस आयुक्त तेथील पोलिस अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधत आहे. मात्र अद्यापही यात मोठे यश पोलिस यंत्रणेला मिळालेले नाही.

घडलेल्या घटना

वर्ष घटना

२०१९ ९४

२०२० ९८

२०२१ ६५

२०२२ (२३ मे पर्यंत) ३३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT