esakal
नाशिक

Nashik Crime News : द्वारका बसस्थानकावरून सोन्याचे दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : द्वारका बसस्थानकावरून वृद्ध महिलेच्या गळ्यातील पर्समधून सोन्याचा हार आणि पोत असे सुमारे २ लाख १० हजारांचे दागिने चोरी गेले. शनिवार (ता.२०) दुपारी पावणेतीनच्या सुमारास घटना घडली. (Gold ornaments stolen from Dwarka bus stand nashik crime)

महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात संशयितांविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सिंधू गायधनी नातीसह पिंपळगाव येथे विवाह सोहळ्यास जाण्यासाठी द्वारका बसस्थानकावर आले होते. द्वारकावर बसची वाट पाहत थांबले होते.

सुमारे पावणेतीनच्या सुमारास बस आली. बसमध्ये चढत असताना प्रवाशांनी गर्दी केली. त्याची संधी साधत संशयितांनी पर्सची चैन उघडून त्यात प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये असलेले सोन्याचे दागिने काढून घेतले. बसमध्ये बसल्यानंतर त्यांना पर्सची चैन उघडी असल्याचे लक्षात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दागिन्यांची तपासणी केली असता, हार आणि पोत मिळून आले नाही. त्यांनी भद्रकाली पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

यापूर्वीही या बसस्थानकावरून अशाच प्रकारे गर्दीची संधी साधत पर्समधून सोन्याचे दागिने लंपास झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raosaheb Danve: महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा अन् रावसाहेब दानवेंची दिल्लीत धावपळ...नेमकं काय सुरू आहे?

Latest Marathi News Updates : नवाब मलिकांंना पराभूत केल्यानंतर 'सपा'चे आमदार अबू आझमी देवगिरीवर अजित पवारांच्या भेटीला

Eknath Shinde: ठाणे जिल्ह्याला हवा फुलटाइम ‘ठाणेदार’; कोणाला मिळणार संधी?

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 'ट्रॅव्हल्स'च्या दरातच आता चक्क विमानप्रवास; 'या' कंपनीकडून संभाव्य दर प्रसिद्ध

मी पूर्ण प्रयत्न केले, तरी तू जाण्याचा निर्णय घेतलास...! Rishabh Pant ने दिल्लीची साथ सोडल्यानंतर मालक पार्थ जिंदाल स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT