Crime News esakal
नाशिक

Nashik Crime : मालेगाव बसस्थानकावरून 2 लाख 15 हजाराचे सोने लंपास

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : येथील नवीन बसस्थानकावर भडगाव (जि. जळगाव) येथील वृध्द दाम्पत्याला चकवा देत त्यांच्याकडील पिशवीतून दोन लाख १५ हजार रुपयाचे सोने चोरट्यांनी लांबविले.

याप्रकरणी प्रशांत कोतकर (वय ४७, रा. नाशिक) यांच्या तक्रारीवरून आयशानगर पोलिसात ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे. बसस्थानकात प्रवाशाच्या बॅगा, पर्स, मोबाईल व इतर वस्तू चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे.

सातत्याने घडणाऱ्या या प्रकारांमुळे बसस्थानकावरील प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. (Gold worth 2 lakh 15 thousand looted from Malegaon bus stand Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्री. कोतकर यांचे आई, वडील ५ जूनला पाचोरा ते पालघर या बसने प्रवास करीत होते. सदर बस येथील नवीन बसस्थानकावर आली असता बाळकृष्ण कोतकर हे कामानिमित्त खाली उतरले.

ते पुन्हा बसमध्ये परत आले असता त्यांना शीटखाली ठेवलेली बॅग मागे सरकलेली दिसली. त्यांनी तत्काळ बॅगेची तपासणी केली असता बॅगेतून चोरट्यांनी दोन लाखाचे ४४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १० हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे कानातील कुंडल व पाच हजाराचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी असा एकूण २ लाख १५ हजाराचा ऐवज चोरुन नेल्याचे लक्षात आले. सकाळी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान हा प्रकार घडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT