चंद्रकांत जगदाळे : सकाळ वृत्तसेवा
Nashik Success Story : गृहविभागाने घेतलेल्या पोलिस भरतीत गोंदेगाव (ता. निफाड) येथील आशा अरुण जगदाळे या युवतीची ठाणे शहर पोलिस दलात निवड झाली आहे. मुलीने घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे समजताच जगदाळे कुटुंबियांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. (Gondegaon Asha Jagdale became first female police officer nashik success story)
कुटुंबाची शैक्षणिक पार्श्वभूमी कमी असतानाही पोलिस होण्याचे स्वप्न बाळगून परिश्रम करणारी आशा गोंदेगावमधील पहिली महिला पोलिस ठरली आहे. त्यामुळे मेहनत घेऊन मिळालेल्या तिच्या यशाला झळाळी प्राप्त झाली आहे.
गोंदेगांव येथील अरुण जगदाळे यांचे तीन भावांचे एकत्रित मोठे कुटुंब. इतर भावंडांपैकी आशा जगदाळे हिनेच पदवी पर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. वडील अरुण निफाड पंचायत समितीच्या सार्वजनिक बांधकाम शाखेत कर्मचारी आहेत. आई गृहिणी असून इतर कौटुंबिक सदस्यांच्या सोबत शेती सांभाळतात.
आशा ही मुलींपैकी सर्वांत लहान असून लहानपणापासून तिने पोलिस होण्याचे स्वप्न बघितलेले होते. त्यासाठी हवी ती मेहनत घेण्याची तयारी असायची. दहावीपर्यंतचे शिक्षण गोंदेगावमध्ये झाले. त्यानंतर मात्र तिने भरती डोळ्यांसमोर ठेवून मेहनत सुरू केली. महाविद्यालयीन शिक्षण आणि पोलिस भरतीची तयारी सोबतच सुरू होती.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
लासलगाव महाविद्यालयातून शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर वर्दी मिळवायचीच या आशेने तिने नाशिक गाठले. या निर्णयास तिच्या वडिलांनी भक्कम पाठिंबा दिला. भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमीतील शिक्षकांच्या मार्गदर्शनात तिने मेहनत सुरू केली. मैदानी कसरतीसह लेखी परीक्षेचा देखील अभ्यास तिथेच सुरू केला.
पोलिस सेवेव्यतिरिक्त अन्य कोणत्याच सुरक्षा विभागात जाणार नसल्याचे तिचे ठाम मत होते. त्यामुळे इतर कोणत्याच परीक्षेची तयारी केली नाही. 'एकच पक्ष पोलिस भरती’ असे तिने मनोमन ठरवून घेतले होते. मैदानीसाठी ४३ व लेखी परीक्षेसाठी ८१ असे १२४ गुण मिळवून पहिल्याच प्रयत्नात यश संपादित केले. मेहनत, नियोजन, अभ्यासाची जोड दिल्यामुळे 'आशा' च्या आकांक्षेने गरुडझेप घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.