पंचवटी - गोरक्षनगर हा मध्यवर्गीय लोकवस्तीचा भाग असून येथे मोकळ्या जागेत समाज मंदिर बांधण्यात आलेले आहे. या समाजमंदिराचा वापर समाजोपयोगी कामासाठी केला जात होता. त्यावेळी त्याची देखभाल होत होती.
नंतरच्या काळात ते दुर्लक्षित झाल्याने येथील समस्या वाढल्या. गेल्या काही महिन्यांपूर्वी तर या समाजमंदिराचे दरवाजे तोडण्याचा प्रकार घडला. काही दरवाजांच्या फळ्या तोडण्यात आलेल्या आहेत.
त्यांची अवस्था अजूनही तशीच आहे. त्यातून प्रवेश करीत मद्यपी थेट गच्चीवर बसत असल्याच्या खूणा अजूनही तशाच आहेत. येथे पाण्याच्या वापरलेल्या बाटल्या आणि दारुच्या बाटल्या यांचा खच पडून आहे. (Goraksha Nagar Samaj temple is in poor condition grass all around Nashik News)
पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. त्यात खाद्यपदार्थांच्या वापरलेल्या पिशव्यांसह इतर कचरा साचलेला आहे.तसेच आजूबाजूला गाजर गवत उगवलेले असून त्याचे अक्राळविक्राळ रूप दिसत आहे.
समाजमंदिराची संरक्षक भिंतीचा काही भाग दगडी बांधकामाचा आहेत. ते दगडी कामही अनेक ठिकाणी पडलेले आहेत. तेथून कुणीही या भागात प्रवेश करू शकत आहे. समाजमंदिराच्या गच्चीवर पावसाचे पाणी साचलेले आहे.
या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था नसल्याने साचलेल्या पाण्यावर प्रचंड प्रमाणात डास दिसत आहे. सध्या येथे अंगणवाडी भरत असल्यामुळे या वाढलेल्या डासांच्या अंगणवाडीत येणाऱ्या मुलांना त्रास संभवत आहे.
हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
समाज मंदिरालगत महादेव, हनुमान आणि गणेश अशी तीन मंदिरे आहेत. येथे भाविक दर्शनासाठी येत असतात. अशा ठिकाणी स्वच्छता असणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे.
येथील गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळाने या समाज मंदिराच्या तुटलेल्या दरवाजाच्या ठिकाणी गेट बसविल्याने सध्या इतर प्रवेश करीत आहे. समाज मंदिरात अंगणवाडीतील मुलांच्या बसण्याच्या जागेपूरती स्वच्छता होत असली तरी इतर भागात अजूनही धूळ आणि अस्वच्छता आहे. या स्वच्छतेकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
"पाण्याची हाफशी नादुरुस्त"
या समाज मंदिरा जवळच पाण्याची हाफशी बसविण्यात आलेली दिसून येत आहे.मात्र ,ती नादुरुस्त असून त्यांच्या अवतीभवती गाजर गवत उगवलेले आहे.त्यास केलेला सिमेंटचा गोलाकार तुटून गेलेला आहे.बऱ्याच वर्षापासून ही पाण्याची हाफशी बंद स्वरूपात असल्याचे निदर्शनास येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.