Fake documents esakal
नाशिक

Nashik Fraud Crime: ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून शासनाची फसवणूक; बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा अहवाल प्राप्त

पुणे, नगरनंतर नाशिकमध्येही बनावट प्रमाणपत्रांचा सुळसुळाट अखेर उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

घोटी : नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास अधिकाऱ्याकडे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र असल्याची बाब मुंबई येथील सर ज. जी. समूह रुग्णालयाकडून प्राप्त पत्रातून समोर आली आहे. (Government fraud by village development officials Report of submission of fake disability certificate received Nashik Fraud Crime)

खोटे स्टॅम्प व बनावट दस्तप्रकरणी संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियम (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या तरतुदीनुसार उचित कार्यवाही करण्याबाबत विशेष शिफारस करण्यात आली आहे.

यामुळे पुणे, नगरनंतर नाशिकमध्येही बनावट प्रमाणपत्रांचा सुळसुळाट अखेर उघडकीस आला आहे.

सर ज. जी. समूह रुग्णालय यांनी संजय भावसिंग पाटील यांना कोणत्याही प्रकारचा दृष्टिदोष नसल्याचे शून्य टक्के प्रमाणपत्र ३ जुलै २०१८ ला जावक क्र. ८६५/२०१८ दिले होते.

त्यावर पाटील यांनी बनावट ४० टक्के कायमस्वरूपी दृष्टिदोष असलेल्या प्रमाणपत्रावर बनावट शिक्का व सही केल्याचे पत्र सर ज. जी. समूह रुग्णालय यांच्याकडून अध्यक्ष आरती दिव्यांग संस्था व गटविकास अधिकारी, पंचायत समिती (दिंडोरी, जि. नाशिक) यांना देत तत्काळ कार्यवाही करण्याची शिफारस केली आहे.

पाटील यांची बनावट दिव्यांग प्रमाणपत्राची करामत पुढे आल्यावर ८ डिसेंबरला ऑनलाइन अर्ज करताना माझ्याकडे कोणतेही दिव्यांग प्रमाणपत्र नसल्याचे नमूद करून प्रशासनाची अधिक दिशाभूल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kashinath Date: पारनेरमध्ये लंकेंच्या गडाला सुरुंग लावणारे काशिनाथ दाते कोण? काय होती रणनीती?

Latest Marathi News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल

Weight Gain Problem : मुलांपासून प्रौढांमध्ये लठ्ठपणामुळे वाढती समस्या, आरोग्यावरील गंभीर परिणाम आणि उपाय...जाणून घ्या

Ahilyanagar Crime : पाळीव 'पोपट' मारला; तिघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, तीन महिन्याच्या शिक्षेसह 500 रूपये दंड

Maharashtra CM : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? ही आहेत ५ मोठी कारणे

SCROLL FOR NEXT