नाशिक : महाराष्टाचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज दुपारी पंचवटीत प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरास भेट देत दर्शन घेतले. पुजारी वर्गाच्या हातून संकल्प सोडल्यावर विश्वस्त मंडळातर्फे देवस्थानच्या प्रांगणात राज्यपालांचा श्रीरामाची प्रतिमा पूजन सत्कार करण्यात आला.
यावेळी राज्यपालांनी मंदिराचा इतिहासही उपस्थितांकडून जाणून घेतला. (Governor Ramesh Bais performed Mahapuja at Shri Kalaram Devasthan Worshiped Shri Ram by making various resolutions Nashik News)
संदीप युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभासाठी शहरात आलेल्या राज्यपाल रमेश बैस यांनी आज दुपारी पंचवटीतील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिर देवस्थानात प्रधान संकल्प करत श्रीरामरायांचे पूजन केले.
यावेळी आचार्य महामंडालेश्वर सुधीरदास पुजारी यांच्या हस्ते राज्यपालांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी विश्वस्त धनंजय पुजारी, मंदार जानोरकर यांनी राज्यपालांना रामरायाची प्रतिमा भेट दिली.
याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे डॉ. एकनाथ कुलकर्णी, ॲड. अजय निकम, पं. नरेश पुजारी, मंगेश पुजारी यांच्यासह राज्याचे युवक कल्यामंत्री संजय बनसोडे, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ निरिक्षक शिंदे आदी उपस्थित होते. सत्कारानंतर राज्यपालांनी उपस्थित विश्वस्तांकडून मंदिराचा इतिहास जाणून घेतला.
बळीराजासह जनता सुखी होवो : बैस
राज्यपाल रमेश बैस यांनी श्री काळाराम मंदिरात महापुजा करत प्रधान संकल्पही केला. पंडित प्रणव पुजारी,अद्वैत पुजारी व निनाद पुजारी यांनी पौरोहित्य केले.
यावेळी देशासह राज्यातील बळीराजा व सामान्य जनता सुखी होवो, असा प्रधान संकल्प करण्यात आला. देव निंदा कायदा त्वरीत करण्यात यावा, यासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत, अशी अपेक्षा महंत सुधीरदास पुजारी यांनी राज्यपालांकडे व्यक्त केली.
मोठा पोलिस बंदोबस्त
राज्यपालांचे सकाळी अकराला मंदिर परिसरात आगमन होणार होते. परंतु पोलिसांनी सकाळपासून मुख्य पूर्व दरवाजासह दक्षिण व उत्तर दरवाजाचा ताबा घेतला होता. राज्यपालांचे आगमन होईपर्यंत भाविकांनाही सुलभ दर्शन घेता आले.
सव्वाबाराच्या सुमारास राज्यपाल बैस यांच्या गाड्यांचा ताफा मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळ येताच भाविकांचे दर्शन थांबविण्यात आले. मंदिराच्या पूर्व दरवाजाकडे जेणारे रस्ते पोलिसांनी बॅरिकेटिंगद्वारे बंद केले होते. यावेळी उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्तांसह शंभरावर पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.