नाशिक : भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन देशभर अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. अभियंत्यांच्या हक्काचा असलेल्या या दिवशी शुभेच्छा देण्याची प्रथा आहे. नाशिककरांनी सोशल मीडियावरून सर्वच अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या, मात्र गोविंदनगर बोगदा तयार करणारे अभियंते मात्र शुभेच्छांना अपवाद ठरले. (Govindnagar narrow tunnel trolled on social Media on Indian Engineers Day Nashik Latest Marathi News)
मुंबई नाका येथील अवाढव्य सर्कल बनवणारे अभियंता वगळता इतर सर्वांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सोशल मीडियाच्या माध्यमातून देत इंदिरानगर बोगद्याच्या निमित्ताने होत असलेली वाहतूक कोंडी व मानसिक त्रास या निमित्ताने प्रकट झाला. सकाळपासूनच सोशल मीडियावर अभियंत्यांवर विशेष दिनाचा वर्षाव सुरू आहे.
महापालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग अशा अन्य विभागात व खासगी कामकाज करणारे अभियंत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव पडला. या शुभेच्छा देत असताना मात्र गोविंदनगर येथील बोगदा तयार करणारे अभियंते अपवाद ठरले. या अभियंताबद्दल अपशब्द वापरले नसले तरी बोगदा तयार करणारे अभियंते वगळून सर्व अभियंत्यांना या भागातील नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
गरवारे पॉइंट ते क. का. वाघ महाविद्यालय दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू असताना गोविंदनगर येथे रॅम्प तयार करून नागरिकांना ये- जा करण्यासाठी बोगदा तयार करण्यात आला. सदरचा बोगदा अरुंद असल्याने दोन्ही बाजूने वाहतूक अशक्य झाली. येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले.
मात्र, वाहतूक पोलिसांना अपयश आले. या भागात चार ते पाच वाहतूक पोलिस कायमस्वरूपी तैनात करण्याची वेळ आली. याशिवाय रोजचा वाहतूक कोंडीचा त्रास या भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. गोविंदनगरच्या एका बोगद्याने अनेक समस्या निर्माण केल्याने नाशिककर वारंवार संताप व्यक्त करतात. अभियंता दिनाचे निमित्त साधून सोशल मीडियावर बोगदा तयार करणारे अभियंते व सल्लागार कंपनीचा शुभेच्छा न देता उल्लेख करून संताप व्यक्त करण्यात आला.
रस्त्यांवरील खड्ड्यांवरून संताप
महापालिकेच्या वतीने रस्त्यांवर करोडो रुपये खर्च करण्यात आले परंतु रस्त्यांची गुणवत्ता पावसाळ्यात उघड पडली रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहे. अभियंता दिनाचे निमित्त साधून महापालिकेच्या अभियंत्यांवर देखील सोशल मीडियावर टीका करण्यात आली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.