Gram Panchayat Election esakal
नाशिक

Gram Panchayat Election : पिंपळगावात भास्करराव बनकरांची त्सुनामी!

एस.डी.आहीरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : आजच्या ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्हासाठी प्रतिष्ठेची असलेली पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच भास्करराव बनकर यांची त्सुनामी पहावयास मिळाली. भास्कराव बनकर यांच्या विजयाने आमदार दिलीप बनकर यांना ग्रामपंचायतीमधील सत्ता गमवावी लागली आहे.

पण या निवडणुकीत हिरो ठरले ते भाजपचे सतीश मोरे. मोरे यांनी मुसंडी मारताना सरपंचपदाच्या अगदी जवळ जाऊन पोचले. पण पुन्हा एकदा त्यांना हुलकावणी मिळाली. अवघ्या पाच वर्षात परिवर्तन घडवीत भास्करराव बनकर यांचा राजकीय सूर्योदय झाला आहे. भास्करराव बनकर यांच्या विजयापेक्षा सतीश मोरे यांच्या संघर्षाची अधिक चर्चा असल्याने भविष्यातील राजकीय दावेदार ते ठरू शकतील. (Gram Panchayat Election Bhaskarrao Bunkar established in Pimpalgaon nashik news)

निवडणुकीच्या प्रारंभी पिंपळगावच्या शहरातील राजकारणाने कुस बदलण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. पण आमदार बनकर यांनी दिग्गज नेते व व्यापाऱ्यांची मोट बांधून शहर विकास आघाडी पॅनलची निर्मिती केली होती. तर दिग्गज व मुरब्बी नेते भास्करराव बनकर यांनी सहा महिन्यापासूनच पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची व्यूहरचना आखत तगडे उमेदवार देऊन मोर्चे बांधणीत आघाडी घेतली होती.

नगरपरिषदेसाठी बहिष्काराचे मार्ग यशस्वी न झाल्याने सतीश मोरे यांनी सवतासुभा उभारला. आमदार बनकर यांच्या काडीमोड घेत मोरे यांनी नवख्या उमेदवारासह दिलेला पर्याय येथेच भास्करराव बनकर यांच्या विजयाची भक्कम पायाभरणी झाली. दहा वर्षात एकसंघ असलेला गट दुभंगला गेला. शिवाय आमदार बनकर यांच्या सत्ता हाकणारे गणेश बनकर यांच्या कार्यपद्धतीवर मोठी नाराजीची लाट होती.

८० कोटीची विकासकामे साकारताना सुहास मोरे, अल्पेश पारख हे गटाचे सदस्य दुरावले. निवडणूकीसाठी आमदार बनकर व गणेश बनकर यांना पॅनलचे उमेदवार देताना दमछाक झाली.

निफाड एज्युकेशन व पिंपळगाव सोसायटीच्या निवडणुकीतील यशाने भास्कर बनकर यांच्या नावाचा पिंपळगाव शहरात अंडर करंट सुरू झाला. त्यांच्या बदललेल्या स्वभावामुळे लोकप्रियता व सहानुभूती अधिक वाढली होती.

आमदारांपुढे आव्हान

आपल्या घरच्या मैदानावर आमदार दिलीप बनकर यांना ग्रामपंचायतीमधील सत्ता राखण्यात अपयश आले आहे. या पराभवाने त्यांच्यापुढे आता पुन्हा

नागरिकांशी नाळ जोडण्याचे आव्हान आहे. कारण शहर विकासचे सरपंचपदासह बहुतांश उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आहे. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आमदार बनकर यांनी केलेली सर्व गणिते व गृहीतके सपशेल चुकली आहे. या पराभवाने आमदार बनकर यांच्यापुढे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व विधानसभेच्या निवडणुकीसाठी आव्हान असेल.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

पराभव होऊन चर्चा मोरे यांचीच

हार कर जितने वाले को बाजीगर कहते है...बाजीगर चित्रपटातील हा डायलॉग सतीश मोरे यांच्यासाठी आज फिट बसला आहे. २३ हजार मतांमध्ये दोन बलाढ्य शक्तीचा सामना करताना सतीश मोरे यांना अवघा ११३ मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. मोरे यांचा हा जनाधार पाहता पराभव होऊन ही इतरापेक्षा सतीश मोरे यांचीच अधिक चर्चा शहरात राहीली. सामान्य उमेदवारांना सोबत घेऊन सतीश मोरे यांनी उभारलेल्या संघर्ष यात्रेला पिंपळगावकरांनी भरभरून पसंती दिली.

चारही वॉर्डात त्यांनी दोन्ही बनकरांच्या तुलनेते भोवळ आणणारे मताधिक्क्य घेतले. पण वॉर्ड ४ व ५ मध्ये ते मोठ्या फरकाने मागे पडल्याने त्यांना सरपंचपदाने हुलकावणी दिली. परंतु पत्नी शीतल मोरे यांच्यासह त्यांचे सदस्य पदाचे चार उमेदवार विजयी होऊन ग्रामपंचायतीत स्वबळावर दमदार प्रवेश केला.

"पाच वर्षाच्या काळात झालेली विकासकामे जनतेला ती रुचली नसावी. जनतेचा कौल मान्य असून पराभव स्वीकारला आहे. पिंपळगाव शहरासाठी विकास कामाचा ओघ राज्य शासनाच्या माध्यमातून सुरूच ठेवणार."- आमदार दिलीप बनकर

"जनतेला अपेक्षित असलेला विकास पर्वाला शहरात उद्यापासून आरंभ होईल."

-भास्करराव बनकर, नवनिर्वाचीत सरपंच

"चार वॉर्डात मताधिक्क्य मिळाल्याने हा माझा नैतिक विजय आहे. जनतेच्या ऋणात कायम राहून त्यांच्या सेवेचे व्रत अखंड सुरू ठेवणार आहे." -सतीश मोरे नेते, संघर्ष पॅनल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT