Gram Panchayat Election 2022 esakal
नाशिक

Gram Panchayat Election : नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये चुरशींच्या लढतींत कही खुशी कही गम!

सकाळ वृत्तसेवा

Gram Panchayat Election Results 2022 : राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान पार पडलं. या ग्रामपंचायतींचा निकाल 20 डिसेंबरला जाहिर करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या लढतीमध्ये काही ठिकाणी प्रस्थापितांची सरशी तर काही ठिकाणी प्रस्थापितांच्या सत्तेला डावलून तरुणांनी आपले वर्चस्व काबीज केले आहे. एकूणच शहरी भाग तसेच गाव खेड्यांमधील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये काही खुशी कही गम असं वातावरण बघायला मिळत आहे.

(Gram Panchayat Election results of nandgaon tandulwadi dindori kasbe sukene nandur shingote eklahare baglan Nashik district news)

नांदगाव तालुक्यात शिंदे गटाचे वर्चस्व

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळाले. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हा एकतर्फी लागला असून आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये शिंदे गटाला सत्ता मिळविण्यात यश आले आहे.

अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टांगणीला होत्या. नांदगाव तालुक्यातील एकूण १५ ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुका पार पडल्या या निकालात सर्व पंधरा ग्रामपंचायतीत शिंदे गटाने बाजी मारली आहे. नांदगाव तालुक्यात आमदार सुहास कांदे यांनी विकास कामांचा सपाटा लावलेला असून तालुक्यात विकास पर्व सुरू आहे. याचाच परिणाम आजच्या ग्रामपंचायत निकालातून दिसून आला. आज झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर आमदार सुहास कांदे यांच्या दमदार विकास कामांच्या जोरावर तालुक्यातील राजकीय वर्चस्व सिद्ध झाले आहे.

या विजयाचा जल्लोष आज आमदार सुहास कांदे यांचे नांदगाव संपर्क कार्यालयात करण्यात आला. थेट जनतेतून सरपंच पदावर निवडून आलेले राजेंद्र सयाजी पवार नागापूर, मंजुषा जीवन गरुड पिंपरखेड, सुनीता कांतिलाल चव्हाण कसाबखेडा, शरद अशोक काळे धोटाणे खुर्द, भिका ठका बिन्नर शास्रीनगर यांचे सह ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र देशमुख, सुधीर देशमुख, अनिल काळे यांचा सत्कार करण्यात आला. सर्व विजयी सरपंच व सदस्यांनी संपर्क कार्यालयात येऊन गुलाल उधळत जल्लोष केला.

आमदार सुहास कांदे यांनी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे अभिनंदन केले. तसेच, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किरण देवरे, गुलाब भाबड, नंदू पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख सागर हिरे, शहर प्रमुख सुनील जाधव, आय्याज शेख, प्रकाश शिंदे, महेंद्र गायकवाड आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

तांदुळवाडीत संघर्ष पॅनेलच्या आशाबाई भामरे सरपंच

तांदूळवाडी (ता. बागलाण) येथील ग्रामपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत संघर्ष पॅनेलने सर्वाधिक जागा जिंकून प्रतिस्पर्धी ग्रामविकास पॅनेलचा धुव्वा उडविला. थेट सरपंचपदाच्या लढतीत आशाबाई भामरे यांनी ७२४ मते मिळवून प्रतिस्पर्धी उमेदवार दीपाली भामरे यांचा २३३ मतांच्या फरकाने पराभव केला.

तांदूळवाडी राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार. याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून होते. सुरवातीला दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यात कल्पना गायकवाड, गंगाबाई माळी यांचा समावेश होता. उर्वरित आठ जागांसाठी घेण्यात आलेल्या मतदान प्रकियेत संघर्ष पॅनेलने सात जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. संघर्ष पॅनेलच्या विजयी झालेल्या उमेदवारांत उज्ज्वला शिंदे, सुनंदा भामरे, किशोर भामरे, स्वाती भामरे, प्रमोद भामरे, भगवंत पवार यांचा समावेश आहे.

प्रतिस्पर्धी पॅनेलच्या मंगला भामरे या एकमेव उमेदवार विजयी झाल्या. संघर्ष पॅनेलच्या विजयात संजय भामरे, सचिन भामरे, नीलेश भामरे, संदीप भामरे, मनोहर भामरे, अशोक शिंदे, रावसाहेब भामरे, राकेश भामरे, रमाकांत भामरे, केदा शिंदे, चंद्रशेखर भामरे, अतुल भामरे, युवराज बोरसे, अजित भामरे, मनोहर ह्याळीज, अनिल भामरे, प्रशांत भामरे, जगदीश भामरे, योगेश भामरे, जितेंद्र भामरे आदींनी परिश्रम घेतले. "थेट सरपंचपदाच्या लढतीत सुजाण नागरिकांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी विकासकामांना अग्रक्रम दिला जाईल. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे." -आशाबाई भामरे, सरपंच, तांदूळवाडी

बागलाणमध्ये आठ सरपंच अल्पमताने विजयी

बागलाण तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. बहुतांश ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत नवोदितांनी मुसंडी मारल्याचे चित्र आहे. आठ सरपंचपदाचे उमेदवार अल्प मतांच्या फरकाने निवडून आले. एकूणच आजचा निकाल पाहता कोणत्याही राजकीय पक्षाला आपले थेट वर्चस्व सिद्ध करता आलेले नाही. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे बागलाण तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांनी २२ तर भाजपचे तालुकाध्यक्ष संजय देवरे यांनी २४ ग्रामपंचायतीवर आपले उमेदवार निवडून आल्याचा दावा केला आहे.

प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आराई ग्रामपंचायतीत दिलीप सोनवणे यांचा अवघ्या ३० मतांनी विजय झाला. तर जायखेडा सरपंचपदाच्या निवडणुकीत शोभा गायकवाड यांचा ५३ मतांनी विजय झाला. तळवाडे दिगरच्या सरपंच पदासाठी काटेकी टक्कर होऊन जनाबाई शंकर पवार २६ मतांनी विजयी झाल्या. तळवाडे दिगर ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत दिलीप ठाकरे यांचा अवघ्या एका मताने विजय झाला.

तळवाडे दिगर प्रमाणेच सटाणा शहराला लागून असलेल्या मोरेनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वैशाली देवरे यांचाही २६ मतांनी विजय झाला. गोराणे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत पुतण्याने चुलत्याचा ५४ मतांनी पराभव केला असून डॉ. दिनेश देसले विजयी झाले. पश्चिम आदिवासी पट्ट्यातील बहुचर्चित डांगसौंदाने ग्रामपंचायतीवर सिंधूबाई निकम ३९५ मतांनी विजयी झाल्या.

मुंजवाड ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी यशश्री जगताप निवडून आल्या असून त्यांना १७१० मते मिळाली आहेत. माळीवाडेच्या सरपंचपदी केशव गवळी तर तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या चौंधाने ग्रामपंचायतीवर विमल मोरे यांचा ३५८ मतांनी विजय झाला. चौगाव ग्रामपंचायतीत सुलकणबाई पांडुरंग पवार विजयी झाल्या. तिळवण ग्रामपंचायतीवर विमलबाई बोरसे, आसखेडा ग्रामपंचायतीवर दीपक कापडणी,वनोली ग्रामपंचायतीवर शरद भामरे २६४मतांनी, टेंभे खालचे येथील सरपंचपदी बेबीबाई चव्हाण, गोळवाड ग्रामपंचायतीवर गंगूबाई अहिरे, कातरवेलला सुवर्णा चव्हाण २५७ मतांनी, मुंगसे ग्रामपंचायतीत भगवान पिंपळसे, तांदूळवाडी ग्रामपंचायतीवर आशाबाई भामरे, मुल्हेरला निंबा भानसे यांनी विजय खेचून आणला आहे.

वटार ग्रामपंचायतीवर मछिंद्र खैरनार,मळगाव तिळवनच्या सरपंचपदी योगेश ठोके, डोंगरेजला बापू खैरनार, औंदाने ग्रामपंचायतीवर भरत पवार यांनी २४६ मतांनी बाजी मारली. खीरमानीच्या थेट सरपंचपदी बाबाजी भदाणे, निकवेलच्या सरपंचपदी दीपक मोरे, वाघांबा सरपंचपदी सुशीला सूर्यवंशी, आनंदपुरच्या सरपंचपदी रोहिणी पवार, तळवाडे भामेरच्या सरपंचपदी दिनेश गायकवाड, वरचे टेंभे सरपंचपदावर किरण वाघ, मानूरच्या सरपंचपदी पंडित मोरे, देवठाण दिगरच्या सरपंच सोनी ठाकरे तर जाखोडच्या सरपंचपदावर शंकर पवार यांनी बाजी मारली आहे.

दिंडोरीत ठाकरे गटाचे वर्चस्व

तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला तीन, राष्ट्रवादी दोन, तर भाजपला एक जागा मिळाली. तालुक्यातील निळवंडी येथे सत्ता परिवर्तन झाले असून उमराळे बु., वनारवाडी, रामशेज, कोकणगाव खुर्द, जालखेड येथे सत्ताधाऱ्यांनी सत्ता कायम राखली आहे.

निळवंडी येथे ‘परिवर्तन’ पॅनलचे नेतृत्व पोपट भगवंत पाटील, अंबादास पाटील, कचरु पवार, उत्तम पाटील, गुलाब पाटील यांनी परिवर्तन पॅनलचे नेतृत्व करीत ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन घडवून आणले. त्याचबरोबर उमराळे बु., येथे जी.डी.केदार, रामदास धात्रक, पुंडलिक धात्रक यांनी जनसेवा पॅनलने कायम राखली आहे. रामशेज येथे भाजपचे नेते शामराव बोडके व माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषा बोडके यांच्या नेतृत्वाखाली रामशेजची सत्ता राखत वर्चस्व कायम ठेवले.

कोकणगाव खुर्द येथे संदीप शेळके यांच्या नेतृत्वाखाली शिवशक्ती पॅनलने निर्विवाद वर्चस्व राखून सत्ता कायम ठेवली आहे. जालखेड येथे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नाना मोरे व जीवन मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायत बिनविरोध पार पडली होती. परंतु एक जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असली तरी सत्ता मात्र त्यांनी कायम राखली आहे.

वनारवाडी येथे सहा जागा बिनविरोध झाल्या होत्या. सरपंच पद व एक सदस्यपदासाठी निवडणूक लागली असता दत्तू भेरे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलने सरपंचपदासह सदस्य पदावर बाजी मारत ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे.

निळवंडीत परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

परिवर्तन पॅनल : सरपंचपदी मनीषा चारोस्कर (७४८) तर सदस्य भाऊसाहेब पाटील (३१८), शंकर पाटील (३१९), भास्कर गवारी (२४२), रोशनी बोंबले (बिनविरोध), ग्रामविकास पॅनल सदस्यपदी शैला पाटील (२२७), एकनाथ डंबाळे (२११), रेखा वायंकडे (२००), शांता गवारी (२७०), कविता गवारे (बिनविरोध) विजयी झाले.

कोकणगावला शिवशक्ती पॅनलचे वर्चस्व कायम

शिवशक्ती पॅनल :सरपंच परशराम डंबाळे (२८६), सदस्यपदी पांडूरंग गांगोडे (१५४), सविता डंबाळे (१४९), अर्चना शेळके (१५०), निर्मला चौधरी (बिनविरोध), नंदकुमार शेळके (२११), खंडू गांगुर्डे (१०१), संगीता गायकवाड (बिनविरोध),

उमराळे बु.ला जनसेवा पॅनलचे वर्चस्व

जनसेवा पॅनल : सरपंच वसंत भोये (११८५), संजय केदार (२६६), भारती केदार (२७३), बाळू जाधव (३८२), अनिता आहिरे (२४७), सकुबाई कडाळी (४४९), गणपत भोये (बिनविरोध), नवनाथ धात्रक (३६३), काळूबाई माळेकर (३६५), बेबीबाई सोनवणे (३८१), ग्रामविकास पॅनल : सदस्य दिनकर जाधव (२७९), हिराबाई रेहरे (२४४),

जालखेडला सत्ता कायम

सरपंच ताईबाई झनकर (बिनविरोध), सदस्यपदी संगीता मोरे (२२९), बिनविरोध तानाजी झनकर, आक्काबाई झनकर, जीवन मोरे, कृष्णा डगळे, रत्ना झनकर, सोनाली मोरे, एकनाथ मोरे, मनीषा गांगोडे.

रामशेजला सत्ता कायम

सरपंच - साहेबराव माळेकर (९५०), सदस्यपदी लता कापसे (३८२), संजय बोडके (१८१), स्वाती चारोस्कर (३०८), शारदा बोडके (३००), गोविंद धोंगडे (२२३), कैलास सानप (२००), वंदना बेंडकूळे (२८१), सुनीता गीते (४४९).

वनारवाडी ग्रामविकास पॅनल

ग्रामविकास पॅनल : सरपंच संगीता मोरे (५१५), सदस्यपदी रवींद्र गुंबाडे (१६८), बिनविरोध : दत्तू भेरे, वंदना डमाळे, मोनाली चव्हाण, रत्ना गवारी, बाळू मिसाळ, हिराबाई मिसाळ.

कळवण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

कळवण तालुक्यातील १४ थेट सरपंचसह १५ ग्रामपंचायतींमधील ७९ ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या १५२ ग्रामपंचायती सदस्य विजयी उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून येत आहे. मतदारांनी धक्कादायक निकाल देत स्थानिक नेत्यांना चपराक दिली असून विद्यमान सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

१६ ग्रामपंचायत मधील थेट सरपंचसह व १५२ ग्रामपंचायत सदस्यांमधील बहुतांशी सरपंच व सदस्य हे आमदार नितीन पवार यांचे समर्थक असून सर्वच ठिकाणी सर्वाधिक युवक वर्गाची सरशी झाली आहे. कळवण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या मानूर ग्रामपंचायत निवडणुकीत कळवण बाजार समितीचे माजी उपसभापती व कळवण शिक्षण संस्थेचे संचालक हेमंत बोरसे यांच्या उत्कर्ष पॅनलने थेट सरपंचसह १० जागांवर विजय मिळवीत ग्रामपंचायतीची सत्ता काबीज केली आहे. कळवण पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय पवार यांच्या ग्रामविकास पॅनलला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले.

देसराणे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण हिरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे यांच्या नेतृत्वाखाली साधकेश्वर पॅनलने थेट सरपंचसह ७ जागांवर विजय मिळविला. सरपंचपदावर राष्ट्रवादीचे भगवान वाघ विजयी झाले तर राज्य सहकार परिषदेचे माजी सदस्य महेंद्र शिवाजी हिरे यांच्या परिवर्तन पॅनलला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले.

पाळे खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली अष्टभुजा ग्रामविकास पॅनलने थेट सरपंचसह ७ जागांवर विजय मिळविला. तर ग्रामदेवता ग्रामविकास पॅनलला २ जागांवर समाधान मानावे लागले असून विद्यमान उपसरपंच कडू पाटील हे पुन्हा विजयी झाले आहे.

पिळकोस ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील जाधव, भालचंद्र वाघ, समाधान आहेर, दीपक जाधव, रवींद्र वाघ यांनी थेट सरपंचसह ३ जागांवर निवडणुकीत बाजी मारत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला वाघ यांना विजयी केले. भादवण ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेशमाबाई पवार यांनी बाजी मारली. यात पुष्कराज पाटील गणेश खैरनार, आबा पवार

राणूबाई सोनवणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भादवण ग्रामपंचायत सदस्यांची मात्र बिनविरोध निवड झाली आहे.

कळवण खुर्द ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले. थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप शिंदे यांचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मण पवार (पेंटर) विजयी झाले.

कोसुर्डे ग्रामपंचायतच्या थेट सरपंचपदी सविता चव्हाण यांनी विजय संपादन केला. जयदर ग्रामपंचायतच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे देवीदास भोये विजयी झाले. गोळाखाल ग्रामपंचायतच्या थेट सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर गायकवाड विजयी झाले.

कळवण तालुक्यात लक्ष लागून असलेल्या विविध आरोप प्रत्यारोप झालेल्या निवडणुकीत निवाणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देऊन नव नेतृत्वाने साथ देत थेट सरपंचपदावर जयश्री आहेर विजयी झाल्या. चुरशीच्या निवडणुकीत भाजपच्या संगीता आहेर, माजी उपसरपंच संदीप पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला.

कसबे सुकेणे सरपंचपदी आनंदा भंडारे

निफाड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या लक्षवेधी समजल्या जाणाऱ्या कसबे सुकेणे ग्रामपंचायत सरपंचपदी सत्ताधारी शिवसेना गटाचे छगन जाधव (१ हजार ३९८) व विरोधी परिवर्तन पॅनल राष्ट्रवादीचे सदाशिव शेवकर (१८७७) यांचा दणदणीत पराभव करत अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या आनंदा गोपाळराव भंडारे (२ हजार १७३) सरपंचपदी विराजमान झाले.

१७ सदस्य असलेल्या जागांपैकी सत्ताधारी शिवसेना पुरस्कृत ग्रामविकास पॅनलला ४ जागा, विरोधी राष्ट्रवादी पुरस्कृत परिवर्तन पॅनलला ९ जागा तर अपक्ष ३ जागा मिळाल्या तर १ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आली आहे.

या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे नेतृत्व माजी निसाका संचालक बाळासाहेब जाधव व सोसायटी अध्यक्ष विश्वास भंडारे यांच्याकडे तर विरोधी परिवर्तन पॅनलचे नेतृत्व माजी सरपंच नाना भंडारे व भाऊसाहेब भंडारे यांच्याकडे होते. परिवर्तन पॅनलची स्थिती म्हणजे गड आला पण सिंह गेला अशी झाली. त्यांचे सरपंचाचे उमेदवार सदाशिव शेवकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.

विजयी उमेदवार (कंसात मते)

वॉर्ड १ : सोनाली घोरपडे (७२६), वॉर्ड २ : निर्मला भोईर (२५६), वॉर्ड ४ संग्राम भंडारे (७९९), वॉर्ड ६ अनुपमा जाधव (२९९) मते मिळवत विजयी झाले. विरोधी परिवर्तन पॅनलमधून वॉर्ड १ प्रवीण पाटील (८३४), शीतल नळे (८५०), वॉर्ड २ ललित कर्डक (२६२), वॉर्ड ४ शरद भंडारे (७८१), वॉर्ड ५ रामभाऊ डंबाळे (४६९), सोमनाथ भागवत (५०८), सुरेखा औसरकर (४५३), वॉर्ड ६ राजेंद्र देशमुख (५०५), मते मिळवत विजयी झाले तर अपक्ष उमेदवारांमध्ये वॉर्ड २ शीतल भंडारे (२०४), वॉर्ड ३ असिफा पिंजारी (६२१), वॉर्ड ४ कल्याणी उगले (बिनविरोध), वॉर्ड ६ मधून माधुरी जाधव (२८२) मते मिळवत विजयी झाले. सरपंचपदी अपक्ष आनंदा भंडारे यांचा विजय झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला.

निवाणे सरपंच जयश्री आहेर तीन वॉर्डातून विजयी

तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी (ता.२०) मतमोजणी पार पडली. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. कुंडाणे (ओ) ग्रामपंचायतीच्या माई गांगुर्डे दोन ठिकाणी निवडून आल्या आहेत. तर निवाणे ग्रामपंचायत सरपंच जयश्री आहेर तीन वॉर्डातून ग्रामपंचायत सदस्य म्हणून विजयी झाल्या आहेत.

कुंडाणे (ओ ) ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी संगीता जाधव (४५९) विजयी झाल्या. ग्रामपंचायत सदस्य म्हणून छाया सोनवणे (१७९) संगीता निकम (१४५) विजयी झाले. छाया सोनवणे दोन वॉर्डातून निवडून आल्या आहेत. कोसूर्डे ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचपदी सविता बागूल (६२१) तर ग्रामपंचायत सदस्यपदी अंबादास गायकवाड (१८४), ज्योती पवार (१९०), संजीवनी वाघ (१८६), विजयी झाले. गोळाखाल ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचपदी प्रभाकर गायकवाड (८८७) तर ग्रामपंचायत सदस्यपदी चंद्रभान बागूल (४३१), मंगल गवळी (४०६), बायजाबाई महाले (४०७) विजयी झाले.

जयदर ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचपदी देवीदास भोये (५१४) तर ग्रामपंचायत सदस्यपदी मन्साराम गायकवाड (२८७), सुनील गायकवाड (१७७), धनराज चौधरी (१८९), देवीदास भोये (२६० ) हे विजयी झाले. देसराणे ग्रामपंचायत थेट सरपंचपदी भगवान वाघ (६२२) तर ग्रामपंचायत सदस्यपदी सचिन बहिरम (३४१), कुंदन हिरे (३५२), शिवदास पवार (२२२), माई गांगुर्डे (१९८), वर्षा हिरे (२२२), मंगेश सोनवणे (१७७), स्वप्ना खरे (२११), विजयी झाल्या.

निवाणे ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचपदी जयश्री आहेर (१५७७) विजयी झाल्या. ग्रामपंचायत सदस्यपदी पांडुरंग निकम (६०५), दिनकर आहेर (५०५), सुनीता आहेर (६१४), योगेश पगार (५०६), राजूबाई पाटील (५४५), राहुल आहेर (२५४), जयश्री आहेर (२९१), बाबूराव माळी (२३३), जयश्री आहेर (२८६), नानाजी माळी (२१७), रीमा थोरात (१७३), जयश्री आहेर (१८५), विजयी झाल्या. पाळे खुर्द ग्रामपंचायत थेट सरपंचपदी अंजना पवार (१०२९) तर ग्रामपंचायत सदस्यपदी सोमनाथ पवार (३१२), कडू गांगुर्डे (३१२), दुर्गा आहेर (३४१), भरत पाटील (३५३), कविता सोनवणे (३४४), सरला पाटील (३४२), तुषार हळदे (३१३), अश्विनी सोनवणे (३३४), दीपाली सोनवणे (३२६) हे विजयी झाले.

पिळकोस ग्रामपंचायत थेट सरपंचपदी उज्ज्वला पवार (६९६) तर ग्रामपंचायत सदस्यपदी मधुकर जाधव (१८८) अनिता माळी (२३१) रामदास पवार (२१६) शोभा वाघ (२०४) कौतिक मोरे (२५२) मंगलबाई आहेर (२८२) हे विजयी झाले. बगडू ग्रामपंचायत सदस्यपदी रेखा चव्हाण (१६९) व सतीश अहिरे (१४६) विजयी झाले. भादवण ग्रामपंचायत थेट सरपंचपदी रेशमाबाई पवार (४७९) विजयी झाल्या.

मानूर ग्रामपंचायतच्या थेट सरपंचपदी वैशाली चव्हाण (९७७) तर ग्रामपंचायत सदस्यपदी गोविंद पवार (१६२) सीमा गांगुर्डे (२३७) काँग्रेस नेते परशुराम पवार (२७०) सोनाली पीठे (२८३) विद्यमान सरपंच योगेश चव्हाण (३०२) नितीन पवार (२६७) राणी पीठे (३२२) साहेबराव पवार (२१५) भुराबाई पवार (२०६) कमलबाई पवार (२०९) रामदास बागूल (१२९) रंजना कुवर (१२१) पूनम बोरसे (११४) विजयी झाले. विद्यमान उपसरपंच रवींद्र बोरसे व माजी उपसरपंच सोनाली बोरसे या बोरसे दांम्पत्याला पराभव स्वीकारावा लागला तर थेट सरपंच वैशाली चव्हाण व योगेश चव्हाण या चव्हाण दांम्पत्याला विजयश्री मिळाली.

वाडी बु ग्रामपंचायतच्या थेट सरपंचपदी दुर्गा पवार (५९०) तर ग्रामपंचायत सदस्यपदी रामराम पगार (१९६) उषा निकम (२३८) विलास चौरे (२०२) प्रशांत बच्छाव (२००) गायत्री बच्छाव (२६४) चंद्रभागा बोरसे (२५९) विजयी झाले. शिरसमणी ग्रामपंचायतच्या थेट सरपंचपदी उखा गांगुर्डे (५८१) तर ग्रामपंचायत सदस्यपदी ओंकार पवार (२११) संजय पवार (२७२) प्रशांत वाघ (१९७) श्रीकांत वाघ (२९३)अलका नहीरे (२७३) विजयी झाल्या. सुळे ग्रामपंचायतच्या थेट सरपंचपदी भारती चव्हाण (८०७) तर ग्रामपंचायत सदस्यपदी दिलीप पवार (३७३) ज्ञानदेव गांगुर्डे (१७०) अशोक बर्डे (१६१) सुरेश पवार (१६४) विजयी झाले.

थेट सरपंचपदी पुन्हा बेबीनंदा खंबाईत

ग्रामविकास आघाडीची निर्मिती करून थेट सरपंच निवडणुकीच्या रिंगणात खुल्या जागेवर विरोधकांना धोबीपछाड देत निरगुडे (क) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्राम विकास आघाडीच्या बेबीनंदा खंबाईत विराजमान झाल्या आहे. त्यांनी अवघ्या १५ मतांनी विजय संपादन केला.

तालुक्यातील प्रतिष्ठेची आणि राजकीय वारसा लाभलेली माजी खासदार सीताराम भोये यांचे गाव असलेल्या निरगुडेच्या [क ] ग्रामपंचायत निवडणूकीसाठी चौरंगी लढत झाली. तालुक्यातील बहुचर्चित निरगुडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बेबीनंदा खंबाईत यांनी अटीतटीची लढत देत माजी खासदार कै. सीताराम भोये यांचे पुतणे व कॉंग्रेस नेते विठोबा भोये यांचा मुलगा कैलास भोये यांना १५ मतांनी पराभूत केले.

बेबीनंदा सुरेश खंबाईत यांनी यापूर्वीही सरपंचपद भूषविलेले होते. सात सदस्य असणारे ग्रामपंचायतीत एक जागा रिक्त असून वॉर्ड ३ मधून सदस्य बेबीनंदा या बिनविरोध निवडून आलेले आहेत. तसेच जनतेने थेट सरपंच पदाचा मुकुट बेबीनंदा यांच्या डोक्यावर चढविल्याने त्यांना वॉर्ड ३ मधील सदस्यपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. एकूण दोन सदस्य रिक्त असलेल्या ग्रामपंचायतीला पुन्हा दोन वॉर्डाच्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे

उमेदवार व मिळालेली मते

- बेबीनंदा खंबाईत २९८ (विजयी)

- भोये कैलास २८३

- पुंडलिक भुसारे १७०

- मयुर खंबाईत ६१

- नोटा ०२

नांदूर शिंगोटे सरपंचपदी शोभा बर्के

सिन्नर तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या व परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत जनसेवा पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार आणि माजी पंचायत समिती सभापती शोभा बर्के याचा अवघ्या ५३ मतांनी विजय झाला. या विजयाने त्या थेट सरपंचपदी विराजमान झाल्या. शेवटच्या फेरीपर्यंत सरपंच पदाच्या निकालाची उत्कंठा ताणली होती. सदस्य पदाच्या अकरा जागांपैकी ग्रामविकास पॅनलला सहा, जनसेवा पॅनलला चार तर एका प्रभागात अपक्षाने बाजी मारली.

नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदासाठी सुरवातीपासून रस्सीखेच होती. लोकनियुक्त सरपंच पदासाठी शोभा बर्के, लंकावती सानप, अनिता शेळके यांच्यात तिरंगी लढत झाली. पाच प्रभागात सदस्यपदाच्या पंधरा जागांपैकी चार जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित अकरा जागांसाठी एका अपक्षासह २३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. जनसेवा व ग्रामविकास पॅनलमध्ये समोरासमोर लढत झाली. सरपंचपदासाठी जनसेवा पॅनलच्या शोभा दीपक बर्के (१८५७) यांनी ग्रामविकास पॅनलच्या लंकावती सानप (१८०४) यांचा अवघ्या ५३ मतांनी पराभव केला.

प्रभाग एकमध्ये अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गातून ग्रामविकास पॅनलच्या आशा आढाव (४४२) यांनी तर सर्वसाधारण महिला गटातून सरला दराडे (३७१) ९ मतांनी विजयी झाल्या. प्रभाग दोनमध्ये सर्वसाधारण जागेवर ग्रामविकास पॅनलचे शिवराम शेळके (५०८) यांनी माजी उपसरपंच संजय शेळके (३७५) यांचा १३३ मतांनी पराभव केला. ओबीसी महिला गटातून जनसेवा पॅनलच्या ज्योती शेळके (४३९) यांनी संगीता शेळके (४३५) यांचा अवघ्या चार मतांनी पराभव केला.

प्रभाग तीनमध्ये दोन्हीही जागांवर जनसेवा पॅनलने बाजी मारली. जनसेवा पॅनलचे योगेश शेळके (५६३) व शोभा बर्के (४२३) हे विजयी झाले तर ग्रामविकास पॅनलचे युवराज सानप (२७१) व सिंधू शेळके (४०८) यांचा पराभव झाला. प्रभाग चारमध्ये सर्वसाधारण गटाच्या एका जागेवर तिरंगी लढत होवून जनसेवा व ग्रामविकास पॅनलचे उमेदवारांचा पराभव करत अपक्ष उमेदवार सुदाम आव्हाड (४५२ ) हे १८० मतांनी विजयी झाले.

अनिल शेळके (२७२) व नागेश शेळके (१५०) यांचा पराभव झाला. तर अनुसूचित जाती गटातून ग्रामविकास पॅनलचे सुरेश कुचेकर (४६७) यांनी जनसेवा पॅनलचे निलेश कर्डक (३९९) यांचा ६८ मतांनी पराभव केला. प्रभाव पाचमध्ये ग्रामविकास पॅनलचे ओबीसी प्रवर्गातून माजी उपसरपंच संजय शेळके (४३२), सर्वसाधारण महिला

गटातून लक्ष्मीबाई नवले (३४४), सायरा सय्यद शैय्यद (५२०) हे विजयी झाले. तर जनसेवा पॅनलचे दत्तात्रेय सानप (२५८), आशा पठारे (३०५), ज्योती शेळके (२१०) यांचा पराभव झाला. सरपंचपदाच्या विजयी उमेदवार शोभा बर्के समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

अपक्ष लढत मिळवला विजय

प्रभाग चार मध्ये अपक्ष उमेदवार सुदाम आव्हाड हे विजयी झाले. आव्हाड यांच्या मागे कुठल्याही प्रकारचा गट नसताना सुद्धा त्यांनी मोठे मताधिक्य घेतले. तत्पूर्वी दोन्ही पॅनलने आव्हाड यांची उमेदवारी नाकारली होती अखेरीस आव्हाड यांनी अपक्ष निवडणूक लढवून नांदूर शिंगोटे गावामध्ये एक वेगळी छाप निर्माण केली.

भास्कर बनकरांची सरपंचपदाला गवसणी; आमदार बनकरांना धक्का

जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ११३ मतांनी थेट सरपंचपदाच्या लढतीत निसटत्या मतांनी विजयश्री खेचत भास्करराव बनकर हे चौथ्यांदा पिंपळगावच्या सरपंचपदी विराजमान झाले. सतीश मोरे यांनी कडवी झुंज दिली. भास्करराव बनकर यांच्या दिव्यविकास पॅनलच्या लाटेत आमदार दिलीप बनकर यांना सत्ता गमवावी लागली आहे. सरपंच बनकर व १२ उमेदवार विजयी झाले. तर संघर्ष पॅनलचे चार उमेदवारांनी विजय मिळवत मोरे यांच्या संघर्ष पॅनलने जोरदार मुसंडी मारली.

पिंपळगाव ग्रामपंचायतीची सत्तेसाठी आमदार दिलीप बनकर यांच्या शहरविकास आघाडी, माजी सरपंच भास्करराव बनकर यांच्या दिव्यविकास पॅनल व भाजपाचे युवा नेते सतीश मोरे यांच्या संघर्ष पॅनल मध्ये तिरंगी लढत रंगली होती. यात भास्करराव बनकर यांना आठ हजार ३३५, सतीश मोरे यांना आठ हजार २२२ मते तर गणेश बनकर यांना ६ हजार मते मिळाली.

सरपंच पदाबरोबरच काही वॉर्डातील सदस्यपदाच्या लढतीत अटीतटीच्या झाल्या. तर कुठे नवख्या उमेदवारी दिग्गजांना पराभवाची धुळ चारत जायंट किलर ठरले. मोरे यांच्या संघर्ष पॅनलच्या उमेदवार यांनी जोरदार मुसंडी मारली. वॉर्ड एकमध्ये माजी पंचायत समिती सभापती राजेश पाटील यांच्या बालेकिल्ल्याला पुन्हा खिंडार पडले .सर्वसाधारण महिलांच्या दोन जागेवर संघर्ष चे नेते सतीश मोरे यांच्या पत्नी शीतल मोरे(१८२० मते),तर छाया पाटील(१७९२ मते) विजयी झाल्या.

अनुसुचित जमातीच्या लढतीत भारत मोगल (१६०१) या नवख्या चेहराने प्रतिस्पर्धी उमेदवारांना धोबीपछाड दिली. वॉर्ड दोन मध्ये दिव्यविकास पॅनलला संघर्ष पॅनलच्याच उमेदवारांनी टक्कर दिल्याचे दिसले.सर्वसाधारण पुरूषाच्या लढतीत केशव बनकर (१३७६ मते) यांनी अल्पेश पारख यांचा ८३ मतांनी निसटता पराभव केला. लक्षेवधी ओबीसीच्या लढतीत विनायक खोडे (१२७६ मते) यांच्या समोर बापूसाहेब पाटील यांचा ७६ मतांनी पराभव झाला. महिलाच्या लढतीत अपेक्षेप्रमाणे सोनाली जाधव (१४९५ मते) यांनी माजी सदस्य सोनाली विधाते यांचा ३२० मतांच्या फरकाने धुळ चारली.

वॉर्ड तीन मध्ये संघर्ष पॅनलचा बोलबाला राहिला. सत्यजीत मोरे (९८१ मते) यांनी बलाढ्य सुहास मोरे यांचा तब्बल ४३७ मतांच्या फरकाने धोबीपछाड दिले.सावित्रीबाई गांगुर्डे( ७५३ मते)यांनी विजय मिळविला.भास्करराव बनकर यांचा गड मानल्या जाणाऱ्या वॉर्ड चार मध्ये तीन जागा दिव्य विकास पॅनलच्या उमेदवारांनी मोठ्या फरकाने पटकावल्या. माजी सदस्या रेखा लभडे (२ हजार ४७७ मते) यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा दुप्पटीच्या मतांनी विजय मिळविला. अमोल बागुल (२ हजार ५३४ मते) यांनी एकतर्फी लढत जिंकली. दत्तात्रेय मोरे (२ हजार ४८९ मते) यांनी दणदणीत विजय मिळविला.

वॉर्ड ५ मध्ये किशोर मोरे (२ हजार १४५) यांनी बाळासाहेब बनकर यांच्यावर ४९२ मतांच्या फरकाने मात केली. महिला राखीव लढतीत प्रतिभा बनकर (२ हजार ४१६ मते) यांनी माजी सदस्य रुक्मिणी मोरे यांचा तब्बल एक हजार १०० मतांच्या फरकाने पाडाव केला. हिराबाई दळवी (२ हजार २९१ मते) यांनी माजी सदस्य अलका वारडेचा ९५२ मतांनी पराभव केला. वॉर्ड ६ मध्ये संमिश्र कौल मिळाला. बलाढ्य उमेदवार माजी उपसरपंच संजय मोरे यांना अवघ्या २८ मतांनी पराभवाची नामुष्की ओढवली. दशरथ मोरे (एक हजार ५०८ मते) घेऊन विजयाचा चमत्कार घडविला. सपना बागूल (एक हजार ४६२ मते) यांनी एकतर्फी विजय मिळविला. तर शहर विकास आघाडीच्या एकमेव उमेदवार माजी सदस्या सत्यभामा बनकर ( एक हजार ४५० मते) यांनी विजय मिळविला.

भास्करराव बनकर यांच्या दिव्यविकास पॅनलने दणदणीत विजय मिळविताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्याची आतीषबाजी करून जोरदार जल्लोष केला.

एकलहरेत सत्तापालट

नाशिक तालुक्यातील सर्वात मोठी असलेली एकलहरे ग्रामपंचायतीच्या निकालाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते. येथे अटीतटीच्या लढतीत थेट सरपंचपदाच्या शर्यतीत विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शंकर धनवटे यांचा अरुण दुशिंग यांनी पराभव केला. निर्मलग्राम विकास पॅनल धनवटे गटाचे १० सदस्य, तर परिवर्तन पॅनल विशाल संगमनेरे, दुशिंग गटाचे ७ सदस्य निवडून आले.

सरपंच पदाचे उमेदवार अरुण दुशिंग यांना २५३२, तर शंकरराव धनवटे यांना १७७८ मते प्राप्त झाली. प्रभाग एकमधून अनुसूचित जमाती जागेसाठी झालेल्या लढतीत संदीप जाधव ८७८, सर्वसाधारण जागा मधुकर कापसे ८३८, तर अनुसूचित जमाती स्त्री जागेसाठी निर्मला इंगळे ८७२ मते मिळून विजयी झाले. प्रभाग दोनमधून अनुसूचित जमाती जागेसाठी लढतीत सागर बारमाठे यांना २३० व सचिन होलीन यांना २३० पडल्याने चिठ्ठी काढून होलीन यांना विजयी घोषित केले. सर्वसाधारण जागांसाठी झालेल्या लढतीत नीलेश धनवटे २५६, सर्वसाधारण स्त्री जागेसाठी सुवर्णा धनवटे २६४ मते मिळवून विजयी झाल्या.

प्रभाग तीनमध्ये अनुसूचित जमाती स्त्री गटात मधुकर महाले २३४, अनुसूचित जाती स्त्री गटात सुजाता पगारे २४० मते मिळून विजयी झाल्या. प्रभाग चारमधून सर्वसाधारण जागेसाठी दिलीप राजोळे ४८६, अनुसूचित जाती स्त्री जागेसाठी सविता पगारे ४७२ मते मिळवून विजयी, तर सर्वसाधारण स्री जागेसाठी सविता पवळे ४६० मते मिळवून विजयी झाल्या. प्रभाग पाचमधून सर्वसाधारण जागेसाठी श्रीराम नागरे २४९, अनुसूचित जमाती स्त्री जागेसाठी राणी सिंगूमारे २८३, तर सर्वसाधारण जागेसाठी शोभा म्हस्के ३२९ मते मिळवून विजयी झाल्या. प्रभाग सहामधून सर्वसाधारण जागेसाठी संजय ताजनपुरे ३३२, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री जागेसाठी सुशीला घुगे २८८, तर सर्वसाधारण जागेसाठी झालेला लढतीत निर्मला जावळे ३१९ मते मिळवून विजयी झाल्या.

मुंढेगावला ठाकरे तर वासाळीत राष्ट्रवादीचे वर्चस्व

तालुक्यातील २ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल मंगळवारी ( ता.२० रोजी ) घोषित करण्यात आला. काही वर्षांपूर्वी सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांना थेट हेलिकॉप्टरने गावी आणणाऱ्या मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रचंड चुरस दिसून आली. हेलिकॉप्टरमुळे प्रसिद्ध झालेल्या मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगला गतीर निवडून आल्या.

तर वासाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता कोरडे विराजमान झाल्या. दोन्ही ग्रामपंचायतीचे निकाल पाहता युवकांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. मुंढेगाव ग्रामपंचायतीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने सत्ता संपादन केली तर वासाळी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला.

मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे गाजलेले दिवंगत हायटेक सरपंच चंद्रकांत गतीर यांच्या त्या पत्नी आहेत. वर्षभरापूर्वी चंद्रकांत गतीर यांचे निधन झाले होते. मुंढेगाव ग्रामस्थांनी त्यांच्या परिवारावर मोठा विश्‍वास टाकला आहे. आदिवासी क्षेत्रात असणाऱ्या वासाळी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी सुनीता कोरडे विराजमान झाल्या आहेत. या सह एकनाथ खादे, सखुबाई कोरडे, अनुसया खादे, बाळू कचरे, भरत कोरडे, ताराबाई झोले, भरत जाधव, सुगंधा जाखेरे, मोनिका भालेराव हे सदस्यपदी निवडून आले.

बहुचर्चित मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी सुनील गतीर, सोमाबाई हंबीर,अलका तांगडे, नितीन हंबीर, हितेश हंबीर, मंगाबाई हंबीर, कृष्णा दुभाषे, ललिता गतीर, जनार्दन गतीर, पद्माबाई दळवी हे निवडून आले आहेत. दोन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी जल्लोष केला. इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी कामकाज झाले.

समान मते पडल्याने चिठ्ठी

वासाळी ग्रामपंचायतीच्या प्रभाग तीनच्या ग्रामपंचायत सदस्य पदाच्या उमेदवार प्रतिभा कचरे आणि मोनिका भालेराव यांना २३९ समसमान मते पडली. कस्तुरी बोरकर या शालेय मुलीने चिठ्ठी काढली असता त्यात मोनिका भालेराव या विजयी

झाल्या. निकाल जाहीर झाल्यावर मोनिका भालेराव यांनी आनंदाश्रू अनावर झाले. त्यांनी चिठ्ठी काढणाऱ्या मुलीला मिठी मारून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

एरंडगावच्या सरपंचपदी योगिता खापरे

एरंडगाव, ता. २० : येवला तालुक्यातील एरंडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मयूर नगरी ग्रामविकास पॅनलच्या योगिता शिवाजी खापरे यांनी थेट सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. योगिता खापरे यांनी परिवर्तन पॅनलच्या आरती उराडे यांचा पराभव केल्याने त्यांची सरपंचपदी वर्णी लागली.

नऊ सदस्य व एक सरपंच पद अशी कार्यकारिणी असलेल्या एरंडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनल व मयूर नगरी ग्रामविकास पॅनल यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली होती. दोन्ही गटाच्या नेतृत्व करणाऱ्या मातब्बरांनी या निवडणुकीत ताकद पणाला लावल्याने निवडणूक लक्षवेधी ठरली होती.

मयूर नगरी ग्रामविकास पॅनलने या निवडणुकीत बाजी मारली असून ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकवला आहे. निकाल हाती येताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे. यावेळी वसंत पाटील,लक्ष्मण खापरे,बबन घोरपडे, कचरू गाढे, दौलत गाढे, रामदास ढेरंगे, भीमा मोरे, राजू पडोळ, गणपत मोरे, दीपक गाढे, गोरख आहेर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

- मयूर नगरी ग्रामविकास पॅनल उमेदवारांना मिळालेली मते

सरपंच पदाच्या विजयी उमेदवार योगिता खापरे (३६७), अतुल पडोळ (१३०), भास्कर पडोळ (१५६), रेणुका पाटील (१३१) या पॅनलचे सिंधुबाई मोरे, चंद्रकला गाढे, इंदूबाई आहेर हे सदस्य बिनविरोध झाले आहे.

- परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना मिळालेली मते

आरती उराडे (३५२, पराभूत) राजेंद्र घोरपडे (९४, पराभूत), शोभा ढेरंगे (९४, पराभूत), सोमनाथ भालनुर (७७, पराभूत) या पॅनलचे तात्या सूर्यवंशी, प्रतिभा गरदे, मंदाकिनी भिसे बिनविरोध झाले आहे.

"जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी जनतेची सेवक म्हणून काम करणार आहे. मी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहे."- योगिता खापरे, थेट सरपंच, एरंडगाव खुर्द

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT