Sarpanch and members of Yashwantnagar Gram Panchayat cheering after the results of Gram Panchayat counting on Tuesday. esakal
नाशिक

Gram Panchayat Election : नाशिक तालुक्‍यात ठाकरे सेनेचा वरचष्मा; 13 ग्रामपंचायतींपैकी 5 मध्ये विजयी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक तालुक्‍यातील तेरा ग्राम पंचायतीच्‍या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी (ता. २०) जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या आवारातील नाशिक तालुका तहसीलदार कार्यालयात पार पडली. तेरापैकी पाच ठिकाणी सरपंचपदी ठाकरे गटाच्‍या उमेदवारांनी बाजी मारली, तर शिंदे गटाच्‍या दोन उमेदवारांनी सरपंचपद मिळविले.

भाजपचे दोन आणि अपक्ष दोन उमेदवारांसह राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रत्‍येकी एक उमेदवार सरपंचपदी निवडून आले. दरम्‍यान, जिल्‍हा परिषद माजी सदस्‍य शंकराव धनवटे यांना पराभव पत्‍कारावा लागला आहे. (Gram Panchayat Election results Thackeray Sena wins in Nashik Taluka Won in 5 out of 13 Gram Panchayats Nashik News)

नाशिक तालुक्‍यातील चौदा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया झाली होती. यामध्ये कोटमगाव ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडली होती. उर्वरित तेरा ठिकाणी मतदानाने उमेदवारांची निवड करण्यात आली. मंगळवारी तहसीलदार अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. बेळगाव ढगा निवडणुकीत फेरमोजणीची मागणी पराभूत उमेदवारांकडून करण्यात आली. त्‍यानुसार झालेल्‍या मोजणीनंतर निकाल जैसे थे राहिला.

थेट सरपंचपदी यांची सरशी

थेट सरपंच निवडणुकीत गिरणारेतून किरण कोरडे (शिंदे गट), महिरावणीतून कचरू वागळे (शिंदे गट), गणेशगावातून मालती डहाळे (ठाकरे गट), तळेगावातून रवींद्र निंबेकर (ठाकरे गट), यशवंतनगर येथून अगस्ती पडोळ (भाजप), बेळगाव ढगा येथून शरद मांडे (अपक्ष), सामनगाव येथून कविता जगताप (ठाकरे गट), देवरगावातून पर्वता पिंपळके (काँग्रेस), ओढा गाव येथून प्रिया पेखळे (ठाकरे गट), लाडचीतून रेखा कडाळे (अपक्ष), दुडगाव येथून एकनाथ बेझेकर (ठाकरे गट), एकलहरे येथून अरुण दुशिंग-(भाजप), साडगाव येथून सुरेश पारधी (राष्ट्रवादी) यांची सरपंचपदी सरशी लागली आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

धनवटे यांना पराभवाचा धक्‍का

एकलहरे गावात दुशिंग यांच्‍याविरुद्ध जिल्‍हा परिषद माजी सदस्‍य शंकरराव धनवटे रिंगणात होते. या लढतीत श्री. धनवटे यांना पराभवाचा धक्‍का बसला. यापूर्वी श्री. धनवटे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत खासदार हेमंत गोडसे यांचे चिरंजीव अजिंक्‍य गोडसे यांचा पराभव केला. जिव्‍हारी लागलेल्‍या या पराभवाचा वचपा काढल्‍याची चर्चा रंगली होती.

चिठ्ठीने झाली निवड, चिमुकल्‍याचे धरले पाय

निच्चांकी ५९ टक्‍के मतदान झालेल्‍या एकलहरे गावामध्ये अटीतटीची लढत बघायला मिळाली. सदस्‍य पदासाठी सचिन होलीन व सागर बारमाटे या प्रभाग क्रमांक दोनमधील उमेदवारांना २३० अशी समसमान मते मिळाली. त्‍यामुळे विजेतेपदाचा पेच निर्माण झाल्‍यानंतर तहसीलदारांनी चिठ्ठीचा पर्यायाचा अवलंब केला. सार्थक सरोदे या चिमुकल्यांच्या हातून काढलेल्‍या चिठ्ठीत ग्रामविकास पॅनलचे श्री. होलीन यांचे नाव निघाल्‍याने त्‍यांना विजेते घोषित करण्यात आले. यानंतर लागलीच होलीन यांनी चिमुकल्‍याचे पाय धरत अभिवादन केले व चिमुकल्‍याला बक्षिसही दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मानखुर्द विधानसभेत नवाब मलिक पिछाडीवर, अबू आझमी आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT