बाणगाव बुद्रूक/नांदगाव (जि. नाशिक) : नांदगाव तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदारराजाने प्रस्थापितांना ‘दे धक्का’ दिला आहे. निकाल लागलेल्या १४ ग्रामपंचायतींमध्ये आमदार सुहास कांदेंनी (शिंदे गट)वर्चस्व सिद्ध केले आहे. (Gram Panchayat Election shock to established in Nandgaon Taluka nashik news)
महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतो की सत्ताधारी शिंदे गट आणि तसेच, भाजप सर्वाधिक जागा जिंकते का याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. मंगळवारी निवडणुकीचा निकाल घोषित झाला. यामध्ये १५ पैकी १४ ग्रामपंचायतींवर सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदार सुहास कांदे गटाचा झेंडा फडकला आहे.
१५ ग्रामपंचायतील नवसारी, शास्त्रीनगर, कसाबखेडा या तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे व काही ग्रामपंचायत सदस्य पदाचे उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडले होते. बारा ग्रामपंचायतीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले.
बहुचर्चित मूळडोंगरी ग्रामपंचायतीत भाजप पदाधिकारी असलेल्या मिथुन पवार यांच्या मातोश्री मूळडोंगरी ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदी निवडून आल्या आहेत. परिवर्तन पॅनलचे सात उमेदवार निवडून आले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय पवार यांचे बंधू राजेंद्र पवार हे भाजपचे पदाधिकारी असले तरी त्यांनी समर्थन शिंदे गटाला दिले आहे. नागापूर ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदाचे उमेदवार राजेंद्र पवारांनी पॅनलचे उमेदवार निवडून आणले. तर माजी आमदार संजय पवार यांना फक्त एक जागेवर समाधान मानावे लागले आहे.
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीमध्ये भाजप माजी तालुकाध्यक्ष बापूसाहेब जाधव यांच्या पॅनलचा पराभव केला. पिंपरखेड, ग्रामपंचायतीमध्ये जीवन गरुड यांचे पॅनलने सत्ता मिळवली आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हा एकतर्फी लागला असून आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली१४ ग्रामपंचायतींमध्ये शिंदे गटाला सत्ता मिळविण्यात यश मिळाले आहे.
थेट जनतेतून सरपंच पदावर निवडून आलेले राजेंद्र पवार नागापूर, मंजूषा गरुड पिंपरखेड, सुनीता चव्हाण कसाबखेडा, शरद काळे धोटाणे खुर्द, भिका बिन्नर शास्त्रीनगर यांचेसह ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र देशमुख, सुधीर देशमुख, अनिल काळे यांचा सत्कार करण्यात आला. सर्व विजयी सरपंच व सदस्यांनी संपर्क कार्यालयात येऊन गुलाल उधळत जल्लोष केला.
विजयी सरपंच पदाचे उमेदवार (कंसात मते)
सुनीता चव्हाण (बिनविरोध, कसाबखेडा), अशोक व्हगळ (बिनविरोध, नवसारी), भिका बिन्नर (बिनविरोध, शास्त्रीनगर), जनाबाई सुरेश पवार (८८७, मूळडोंगरी), राजेंद्र पवार (९०३, नागापूर), बिन्नर श्रावण (२८५, हिरेनगर), ज्योती निकम (६७३, लोढरे), अनिता मार्कड (३३४, भार्डी), शीतल निकम (९०५, तळवाडे), मंजूषा गरुड (१३८०, पिंपरखेड), बबन शेरमाळे (४३५, बोयेगाव), मीराबाई उगले(१९३, लक्ष्मीनगर), शरद काळे (३८७, धोटाने), शांताराम पवार (६६२, हिसवळ), मनीषा वाघ (३५२, धनेर).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.