मनमाड : इंधन कंपन्यांमुळे नावारुपास आलेल्या नागापूर ग्रामपंचायतीची अटीतअटीची निवडणूक शांततेत पार पडले. थेट सरपंच पदासाठी चुरस दिसून आली. राजकीयदृष्ट्या जागरूक असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (Gram Panchayat Election voting in Nagapur peaceful Directly for post of Sarpanch nashik news)
नागापूर ग्रामपंचायतीत एकूण २००९ पैकी १८३० मतदान झाले असून, यामध्ये पुरुष ९७१, तर ८७९ स्त्रीयांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९१ टक्के इतके मतदान झाल्याने उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.
सदस्यपदासाठी नाट्यमय घडामोडीच्या माघारीनंतर तीन सदस्य बिनविरोध निवडून आले. थेट सरपंच पदासाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असून, माजी आमदार संजय पवार यांच्या बाजूने माजी सरपंच अशोक पवार उमेदवार असून, त्यांच्या विरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार उमेदवार असून, रघुनाथ सोमासे तिसरे उमेदवार आहेत.
हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...
प्रभाग एकमध्ये अनुसूचित जाती राखीव जागेसाठी विजय नगे, रवींद्र नगे यांच्यात लढत होत आहे. सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी कावेरी पवार, केशरबाई पवार, कांचन पवार यांच्यात सामना होत आहे. प्रभाग दोनमध्ये सर्वसाधारण जागेसाठी प्रकाश जिरे, निलेश पवार, शोभाबाई पवार यांच्यात लढत होत आहे.
प्रभाग तीनमध्ये अनुसूचित जाती महिला राखीव जागेसाठी विद्या देवरे, मंगल नगे यांच्यात सरळ लढत होत आहे. तर सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी रंजना पवार, स्नेहल पवार यांच्यात सरळ सामना होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.