Mahayuti esakal
नाशिक

Gram Panchayat Election Result: महायुतीचा बोलबाला, अजित पवार गटाचा दबदबा; महाविकास आघाडीतील पक्षांना समान संधी

नाशिक जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल हाती आले असून या निवडणुकांमध्ये विलक्षण चुरस पाहायला मिळाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik District Gram Panchayat Election : लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यात सत्ताधारी महायुतीचा बोलबाला असताना नाशिक जिल्ह्यातही सत्ताधारी महायुतीने मुसंडी मारली आहे. ४५ पैकी तब्बल २२ ग्रामपंचायतींवर महायुतीने वर्चस्व मिळविले आहे.

यातही अजित पवार गटाने सर्वाधिक ११ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले आहे. त्यापाठोपाठ १५ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने वर्चस्व मिळविले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन ग्रामपंचायती काबीज करत जिल्ह्यात खाते उघडले आहे.

चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्के बसले असून, परिवर्तन घडविले आहे. निवडणुकीत मतदारांनी तरुणाईला पसंती दिली असून, सर्वाधिक तरुण उमेदवार विजयी झाले आहेत (Results of Nashik District Gram Panchayat Elections)

जिल्ह्यातील ४८ पैकी तीन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या. रविवारी (ता. ५) उर्वरित ४५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तसेच १५ ग्रामपंचायतींमधील सरपंच आणि सदस्यांच्या रिक्त १८ जागांसाठी मतदान झाले. सोमवारी (ता. ६) सकाळपासून तालुका मतमोजणी केंद्रावर मतमोजणी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नसल्याने स्थानिक नेतृत्वाची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. ४८ ग्रामपंचायतींचे निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर मागील निवडणुकांच्या तुलनेत अनेक ग्रामपंचायतीत परिवर्तन झाले आहेत. ४५ ग्रामपंचायत निवडणूक निकालात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सर्वाधिक ११ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळविला आहे. त्याखालोखाल शिंदे गटाने सहा ग्रामपंचायतींमध्ये बाजी मारलेली दिसते.

त्यानंतर भाजप, काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांनी समसमान प्रत्येकी पाच ग्रामपंचायतींमध्ये आपला झेंडा फडकावला आहे. मनसे पक्षाने दोन ग्रामपंचायतींमध्ये आपले वर्चस्व राखले आहे. अन्य आठ ग्रामपंचायतींमध्ये अपक्ष उमेदवारांचा दबदबा राहिला आहे. इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने तेथील निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे.

भुजबळांचे येवल्यात वर्चस्व कायम

येवला तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले आहे. शिरसगाव लौकी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, लौकीशिरस ग्रामपंचायत सरपंचपदी प्रदीप कानडे, तर खैरगव्हान ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत समाधान सावंत, देवीदास पिंगट विजयी झाले आहेत.

इगतपुरीत मनसेची एन्ट्री

इगतपुरी तालुक्यात मनसेने खाते उघडले असून, मोगरे ग्रामपंचायतीवर सरपंचपदी मनसेचे प्रताप विठ्ठल जाखेरे विजयी झाले आहेत, तर ओंडली ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा फडकला असून, सरपंचपदी प्रकाश वाळू खडके विजयी झाले आहेत. दौडत ग्रामपंचायतीवर काँग्रेसने बाजी मारली असून, सरपंचपदी पांडू मामा शिंदे विजयी झाले आहेत. कृष्णनगर ग्रामपंचायतीवर सरपंचपदी अपक्ष उमेदवार वैशाली सचिन आंबावने विजयी झाल्या आहेत.

या विजयाने विद्यमान आमदार हिरामण खोसकर व माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांना धक्का बसला आहे. कुशेगाव ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवार विजयी झाले असून, एकनाथ गुलाब कातोरे सरपंचपदी विराजमान झाले आहेत. लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाच्या सावित्री सोमनाथ जोशी सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. घोटी खुर्द ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला असून, सरपंचपदी काँग्रेसच्या माणिक निवृत्ती बिन्नर विजयी झाले आहेत. तर इगतपुरीच्याच टाके घोटी ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाची सत्ता आली आहे.

त्र्यंबकेश्वरला संमिश्र प्रतिसाद

त्र्यंबकेश्वरला सर्वच पक्षांना मतदारांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे. बहुतांश ग्रामपंचायतींवर काँग्रेसने पुन्हा ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. माकपनेही काही जागा जिंकल्या आहेत. याशिवाय ठाकरे, शिंदे गटानेही ग्रामपंचायतींत विजय प्राप्त केला आहे.

एकूण ग्रामपंचायत : ४५ (निकाल जाहीर : ४५)

महायुती

भाजप : पाच, शिंदे गट : सहा, अजित पवार गट : ११

महाविकास आघाडी

उद्धव ठाकरे गट : पाच, काँग्रेस : पाच , शरद पवार गट : पाच

मनसे : दोन, इतर : आठ, स्थगित : एक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT