Additional Gram Rojgar Sevak : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कामांची संख्या वाढत असल्यामुळे त्या कामांचे नियोजन करणे व अंमलबजावणी करण्याचा ताण विद्यमान ग्रामरोजगार सेवकांवर पडत आहे.
यामुळे सरकारने ग्रामपंचायतस्तरावर अतिरिक्त ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नरेगाची कामे वेळात होण्यास मदत होणार आहे. (Gram Panchayats have additional village employment servants Order from government to complete MNREGA works on time nashik news)
ग्रामीण भागामध्ये मनरेगाची अंमलबजावणी केली जाते. यात ग्रामपंचायत हा शेवटचा घटक केलेला आहे. असे असले तरी राज्यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायती अंतर्गत गावांचा समूह त्याचप्रमाणे वाडी, वस्ती, तांडे हे विखुरलेल्या स्वरूपात आहेत.
त्यामुळे ग्रामपंचायती अंतर्गत मजुरांना मागणीनुसार विहित कालावधीत काम उपलब्ध करून देणे, कामाचे नियोजन करणे, योजनेची अंमलबजावणी करणे, त्याचप्रमाणे मजुरीचे वितरण व उत्पादक स्थायी मालमत्ता निर्माण करणे तसेच मजुराच्या मजुरीच्या अनुषंगाने नव्याने एन.एम.एम.एस. या अॅपवर मजुरांची हजेरी ग्रामरोजगार सेवकांनी नोंदविणे आदि कामांसाठी अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी होती.
मनरेगांतर्गत सदर कामांमुळे ग्रामरोजगार सेवकावर निश्चितच कामाचा ताण वाढलेला आहे. हा ताण कमी व्हावा यासाठी, राज्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये अतिरिक्त ग्राम रोजगार सेवकाची सध्या प्रायोगिक तत्त्वावर अतिरिक्त ग्राम रोजगार सेवकाची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
ज्या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात कामे कार्यान्वित असून, मजुरांची कामांची मागणी जास्त आहे, तसेच ज्या ग्रामपंचायती ज्या समूह ग्रामपंचायत आहेत, विखुरलेल्या स्वरूपात आहे. वाडे, वस्ती, तांडा यांचा समावेश आहे. अशा ग्रामपंचायतींमध्ये योजनेची गतिमान अंमलबजावणी व्हावी याकरिता अतिरिक्त ग्राम रोजगार सेवक उपलब्ध करून दिले जाणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अतिरिक्त ग्राम रोजगार सेवकाची उपलब्धता करून घेताना संबंधित मनुष्यबळाने निर्माण केलेले मनुष्य दिवस हाच घटक मानधनासाठी ग्राह्य राहणार आहे. यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारे अतिरिक्त मानधन दिले जाणार नाही.
ग्रामरोजगार सेवक व अतिरिक्त ग्रामरोजगार सेवक यांचे निर्माण झालेले मनुष्य दिवस स्वतंत्रपणे गणना करण्यात यावी. मात्र ज्या बाबी सामूहिक आहेत, अशा बाबी दोन्ही ग्रामरोजगार सेवकाने संयुक्तपणे एकत्रितपणे प्रभावीपणे पार पाडावी असे निर्देश आदेशात दिले आहेत.
महिलांना प्राधान्य
अतिरिक्त ग्राम रोजगार सेवकाची उपलब्धता करून घेताना प्राधान्याने महिला ग्राम रोजगार सेवकाची नियुक्ती करण्यात यावी. यामध्ये देखील उमेद मध्ये कार्यरत प्रेरिका, कृषी सखी, पशू सखी, मृद्संधारण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या अशासकीय संस्थेमधील कार्यरत महिलांना प्राधान्य देण्यात यावे.
या अतिरिक्त ग्रामरोजगार सेवकाची नियुक्तीचा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी काही विशिष्ट ग्रामपंचायतीमध्ये असणार आहे. याची फलश्रृती लक्षात घेऊन याची व्याप्ती शासनाकडून वाढविली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.