Officials present at the Grand Alliance meeting held on Sunday to prepare for the upcoming Lok Sabha elections. esakal
नाशिक

Nashik Political: लोकसभेत महायुतीचे 'मिशन 48'! घटक पक्षांच्‍या पदाधिकारी बैठकीत सर्व जागा जिंकण्याचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या निकालाने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्‍य आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत आता महाराष्ट्रातील सर्व जागा जिंकण्यासाठी महायुतीने ‘मिशन ४८’ हाती घेतले आहे.

महायुतीच्‍या घटक पक्षांच्‍या हॉटेल ‘एक्‍स्‍प्रेस इन’ येथे रविवारी (ता.१०) झालेल्‍या बैठकीत राज्‍यातील सर्व ४८ जागा जिंकण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला.

बैठकीत भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲड. राहुल ढिकले, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, विजय साने, बाळासाहेब सानप, गिरीश पालवे, रवींद्र पगार, रंजन ठाकरे आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला महायुतीच्‍या घटक पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्‍थित होते. (Grand Alliance Mission 48 in Lok Sabha Determined to win all seats in office bearers meeting of constituent parties Nashik Political)

प्रास्ताविकात शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा व पक्ष म्हणून निवडणुकांच्या अनुषंगाने आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांनी मते मांडत सूचना केल्‍या.

बैठकीस संपर्क प्रमुख जयंत साठे, सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, माजी आमदार धनराज महाले, भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, गणेश कदम, माजी नगरसेविका सुवर्णा मटाले, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, शहराध्यक्ष प्रशांत जाधव,

भाजप ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, केदा आहेर, गिरीश पालवे, विजय साने, माजी आमदार बाळासाहेब सानप, नाना शिलेदर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाना महाले, योगेश निसाळ, प्रेरणा बलकवडे, राजेंद्र सोनवणे, भूषण कासलीवाल, रघुनाथ पवार, गोरख बोडके, डॉ. योगेश गोसावी आदी उपस्थित होते.

एकत्रित मेळावा घेण्याची सूचना

रविवारी (ता.१०) पार पडलेली महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची महाराष्ट्रातील पहिलीच बैठक होती.

पुढील टप्‍यात महायुतीचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी एकत्र आहेत, पण महायुतीच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी एकत्रित मेळावा लवकरच घ्यावा, अशी सूचना अजय बोरस्ते यांनी मांडली.

लवकरच समन्‍वय समितीची स्‍थापना

केंद्र व राज्य सरकारच्या सर्व सरकारी योजना तळागाळापर्यंत पोचवणे. आगामी निवडणुकींच्या माध्यमातून सर्वसमावेश कार्यक्रमांचे नियोजन करणे. सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधने.

महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत महायुती पदाधिकारी पदाधिकारी मेळावा घेणे. महायुती पदाधिकारी एक वाक्यता असणे एक संघ राहावे. प्रलंबित सरकारी कामांचा पाठपुरावा करणे.

केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या झालेल्या कामांचे लोकार्पण करणे आदी विषयांवर चर्चा होऊन सूचना मांडल्‍या. लवकरच नाशिक जिल्हा लोकसभा, विधानसभानिहाय जिल्हा समन्वय समिती स्थापन करून यासंदर्भात पुढील कामे केली जाणार असल्याचा ठराव सर्वांनी मान्य केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nithin Kamath: भारतीय लोक श्रीमंतांचा द्वेष का करतात? नितीन कामथ यांनी सांगितलं कारण; म्हणाले, आपला समाज...

पुणे सोलापूर महामार्गावर विश्रांतीसाठी थांबलेल्या वाहनातील डिझेल चोरीच्या घटनांमध्ये वाढ

"ती गृहिणी म्हणजे तिला किंमत नाही हे चुकीचं" नवरात्रीनिमित्त स्नेहल तरडे यांचं डोळ्यात अंजन घालणारं वक्तव्य

धक्कादायक घटना! CM एकनाथ शिंदेंच्या बंदोबस्ताला जाताना मोठा अपघात, १२ पोलीस जखमी

Fake SBI Branch: बनावट बँक शाखेचा भांडाफोड; SBIच्या नावे गावकऱ्यांची फसवणूक, लाखो रुपयांना गंडा

SCROLL FOR NEXT