नाशिक : तीन वर्षांचा चिमुकला त्याच्या मामासोबत मंगळवारी (ता. २९) शहरात आला. अन् दुसऱ्या दिवशी सकाळी तो आजीच्या घरातून बेपत्ता झाला. दरम्यान, दुपारी काठे गल्ली परिसरात अनवाणी पायांनी डोळ्यात अश्रू, अशा अवस्थेत तो फिरत होता. पोलीसांच्या तत्परतेमुळे अखेर त्या चिमुकल्या नातवाची आणि आजीची भेट घडली. आणि उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले.(Grandson-grandmother-met-due-to-police-promptness-nashik-marathi-news)
अनवाणी पायांनी डोळ्यात अश्रू, नातूची अवस्था
शिर्डी येथील परशुराम अशोक पवार त्याच्या मामासह मंगळवारी (ता. २९) शहरात आला. बुधवारी (ता.३०) सकाळी तो आजीच्या घरातून बेपत्ता झाला. दरम्यान, दुपारी काठे गल्ली परिसरात अनवाणी पायांनी डोळ्यात अश्रू, अशा अवस्थेत तो फिरत होता. गस्तीवरील भद्रकाली पोलिस ठाण्याचे बीट मार्शल यांना तो आढळला. त्यांनी चिमुरड्यास जवळ घेत आपुलकीने विचारपूस केली. परशुराम केवळ तुटक्या-फुटक्या भाषेत शिर्डीचा उल्लेख करत होता. त्यास अन्य काही बोलता येत नव्हते. शेवटी त्यांनी त्यास पोलिस ठाण्यात आणले. गुन्हे शोध पथकाचे निरीक्षक दत्ता पवार यांनीही चिमुकल्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यास काही बोलता येत नसल्याने त्यांनी शिर्डी येथील त्यांच्या ओळखीच्या लोकप्रतिनिधींशी संपर्क साधत परशुरामचे वर्णन सांगितले. त्या परिसरातून तीन ते चार वर्षांचा मुलगा नाशिकला आला आहे का, याची माहिती घेण्यास सांगितले. परशुराम नावाचा मुलगा मामा बरोबर गेला असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांनी त्याची आजी पंचवटी येथील निलगिरी बाग भागात राहात असल्याची माहिती दिली. पवार यांनी गुन्हे शोध पथकास त्या मुलाच्या आजीचा शोध घेण्यासाठी पंचवटी येथे रवाना केले.
पोलिस घेताहेत मुलाच्या बेपत्ता होण्याच्या कारणाचा शोध
कुटुंबीयांपासून दुरावलेला तीनवर्षीय चिमुकला भद्रकाली पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासांत सुखरूप घरी पोचला. यामुळे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करीत भद्रकाली पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले. निलगिरी भागातील म्हाडा कॉलनीत आजी राहत असल्याचे समजताच हवालदार युवराज पाटील, नाईक कय्यूम सय्यद, मन्सूर शेख, अंमलदार संजय पोटिंदे, रोहिणी भोईर यांनी निलगिरी बागेतील सर्व म्हाडा कॉलनीतील इमारती शोधून आजीचा तपास लावला. त्यानंतर परशुराम यास आजी कांताबाई पाटील यांच्या ताब्यात दिले. तो औरंगाबाद रोडवरील निलगिरी बाग भागातून काठे गल्ली भागात आला कसा, असा प्रश्न पोलिसांना सतावत आहे. त्याला जरी आजीच्या ताब्यात दिले असले, तरीदेखील पोलिस त्याच्या बेपत्ता होण्याच्या कारणाचा शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.