senior-citizen 1234.jpg 
नाशिक

धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आजोबा वृद्ध असल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे सांगून ते विनाकारण घराबाहेर किंवा मंदिरात जातात म्हणून त्यांना कित्येक दिवस नातू किरण हा लोखंडी साखळीने घरात बांधून ठेवत असल्याचा प्रकार तपासात समोर आला आहे. नातवाच्या त्रासाला कंटाळून आजोबांनी पोलीस ठाण्यात जाऊन महिनाभरापूर्वी तक्रारही दिली होती. पण त्यानंतर विकृत नातवाची करतूत समोर आली आहे. त्यातून धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. 

विकृत नातूची अंगावर काटा आणणारी करतूत

नातवाच्या त्रासाला कंटाळून रघुनाथ यांनी हरसूल पोलीस ठाण्यात जाऊन महिनाभरापूर्वी तक्रार दिली होती. आजोबांनी तक्रार केल्याचा राग अनावर झाल्याने संशयित आरोपी किरण याने गेल्या रविवारी रात्री आजोबा रघुनाथ यांना रात्री उशिरा घराबाहेर झोपलेले असतांना तोंडाला घट्ट चिकट पट्टी लावून तसेच हातापायाला लोखंडी साखळी बांधून त्यांना मारुती ओमनीत टाकून क्रमांक (एम एच 15 इबी 3919) गाडी धोंडेगाव मार्गे मखमलाबाद येथून आडगाव शिवारातील ओढा गावात असलेल्या नाल्याकडे आणली व तेथे मृतदेह नाल्यात फेकला. दुसऱ्या दिवशी ओढाच्या नाल्यात एका वृध्द इसमाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान खान यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, हवालदार सुरेश नरवाडे, दशरथ पागी, गणपत ढिकले, देविदास गायकवाड आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर हा प्रकार हा घातपाताचा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.  पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आणि पोलिसांच्या तपासाला यश आले वृद्ध इसमाचा खून झाल्याची खात्री पटली. आडगाव पोलिसांनी त्यानुसार सुरुवातीला अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन पुढे तपास सुरु ठेवला. 

अखेर खुनाचा झाला उलगडा  
धोंडेगावात राहणाऱ्या रघुनाथ बेंडकुळे यांचा खून केल्यानंतर नातू किरणयाने त्यांचा मृतदेह चारचाकीतून ओढा शिवारात असलेल्या नाल्यात फेकून दिला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर मृतदेहाचा फोटो काढून या इसमाला कोणी ओळखते का? याबाबत माहिती जमा करत होते. इसमाला फोटो दाखविल्यानंतर एका जागरूक नागरिकाने ओळखून मयत व्यक्ती ही धोंडेगाव येथील असून त्यांचा खून हा त्याच्याच नातवाने केला असावा अशी गोपनीय माहिती आडगाव पोलिसांना दिली. या माहितीनुसार पोलिसांनी संशयित आरोपी किरण याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने आजोबांचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. याप्रकरणी किरणविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT