Special public prosecutor Shishir Here during the wedding ceremony of Aishwarya from the Here family. Neighbors are groom's father Hemant Hire, Atul Mahajan and family. SYSTEM
नाशिक

Nashik News : ‘मांडवा’च्या परंपरेस ग्रंथतुलेची जोड! वऱ्हाडी मंडळीस औषधी वृक्षरोपांची भेट

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव शहर (जि. नाशिक) : लग्न समारंभ म्हटला म्हणजे कौटुंबिक आनंदाला उधाण असते. या आनंदातही सामाजिक बांधिलकी जोपासत नवा संदेश रूढ करण्याचा प्रयत्न काहीजण करतात. ‘कसमादे’ परिसर म्हटला की ‘मांडव’ ही परंपरा खूपच व्यापक असते. मात्र, या पारंपारिक पद्धतीला फाटा देऊन विशेष सरकारी वकील ॲड. शिशिर हिरे यांच्या कुटुंबियांनी मांडव समारंभात पुतणी ऐश्‍वर्या हीची ग्रंथतुला व उपस्थित पाहुणे, नातेवाईक, मित्र परिवाराला औषधी वृक्षांच्या रोपांचे वाटप करून आदर्शवत्‌ असा नवा पायंडा निर्माण केला. (granthtula instead tradition of Mandwa Gift medicinal saplings to bridegroom Nashik News)

खरं तर लग्न हा कौटुंबिक, नातेगोते व मित्र परिवारातील उत्सवी वातावरणाचा आनंददायी क्षण असतो. मात्र, सामाजिक जाण असलेल्या मंडळींची दृष्टी वेगळं काय करता येईल, याचा सातत्याने विचार करते. सद्यस्थितीत वाचन संस्कृती जोपासण्याची नितांत गरज असुन, उपस्थित वऱ्हाडी मंडळीस हा संदेश देत स्पर्धा परीक्षेच्या युगात असलेल्या नव्या पिढीला पुस्तके तारू शकतात.

या विचारांतून ग्रंथतुला उच्च शिक्षित नवदाम्पत्याला अनोखी आठवण राहणारी आहे. सदरची पुस्तके आनंदमंगल बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्ट संचलित डॉ. शिवाजीराव हिरे वाचनालय व लिलाताई हिरे महिला अभ्यासिका निमगाव या ठिकाणी देण्यात येणार आहेत.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

मांडवाच्या निमित्ताने आंब्याच्या पानांचे डगळे वापरले जातात. त्यामुळे कृतज्ञताही कृतीशील असावी. उपस्थित २५१ मान्यवरांना विविध औषधी वनस्पतींची रोपे या वेळी देण्यात आली. माजी मंत्री राजेंद्र मिरगणे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जयंत पवार, नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उदय वाघ, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, मर्चंट बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, कॉंग्रेस नेते प्रसाद हिरे, सतीश कलंत्री यांच्यासह वधूपिता हेमंत हिरे, आई नीता हिरे, काकू वृषाली व कुटुंबीय उपस्थित होते.

"परंपरागत पद्धती व रूढी जरूर जोपासा. मात्र, बदलत्या काळाची गरज ओळखून नवीन काही तरी करा. जे अनेक पिढ्यांना पुरक ठरेल. तंत्रज्ञानाच्या या धावत्या युगात वाचन खूप कमी होत आहे. त्यामुळे गावागावात वाचनालये समृद्ध व्हावीत, स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे."-ॲड. शिशिर हिरे, वधू ऐश्‍वर्याचे काका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT