happy farmer esakal
नाशिक

Nashik News: धनादेश न वटल्याने द्राक्ष व्यापाऱ्यास शिक्षा; दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यास मिळाला न्याय

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : निळवंडी (ता. दिंडोरी) येथील शेतकऱ्यास द्राक्ष पिकाच्या मोबदल्यात व्यापाऱ्याने दिलेला धनादेश न वटल्याने दिंडोरी न्यायालयात खटला दाखल केला होता. यामध्ये न्यायालयाने संबंधीत व्यापाऱ्यास चार महिने सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे. (Grape trader punished for not cashing cheque farmer of Dindori taluka got justice Nashik News)

निळवंडी येथील कैलास भिकाजी कांगणे यांनी थॉमसन जातीच्या द्राक्षाची लागवड केली होती. त्यांनी सदर माल नाशिक येथील निर्यातदार द्राक्ष व्यापारी सतीश विश्‍वासराव पाटील यास दिला होता. साधारणत: सहा लाखांपर्यंतचा हा माल असल्याचे सांगण्यात आले.

त्या पोटी व्यापाराने एक लाख रुपये रोख स्वरुपात दिले. तर, उर्वरित रक्कमेचा धनादेश दिला होता. मात्र, हा धनादेश बँकेतून न वटताच परत आल्याने कांगणे यांनी अॅड. फरहाद खान डी. पठाण यांच्या माध्यमातून पाटील यास नोटीस पाठविली होती.

तरीही पैसे न मिळाल्याने अखेर, त्यांनी खटला दाखल केला. त्यानुसार चौकशी होऊन दिंडोरी येथील दुसरे सह दिवाणी न्यायाधीश क- स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग- १ आश्‍विनी पंडित यांनी पाटील यास ४ महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

तसेच फिर्यादीस यास द्राक्ष मालाचे ५ लाख रूपये, त्यावर सहा टक्के दराने व्याजाचे १ लाख ८० हजार रुपये व दहा हजार रूपये खर्च दोन महिन्यांच्या आत द्यावेत. न दिल्यास आणखी एक महिना शिक्षा, असा आदेश दिला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

न्यायालयावर विश्‍वास

दिंडोरी तालुक्यात द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणुकीस सामोरे जावे लागण्याचे प्रमाणही मोठी आहे. त्यामुळे शेतकरीवर्गामध्ये संतापाची लाट पसरली असून, व्यापाऱ्यांविरुद्ध तक्रार केल्यास त्याची दखल घेतली जात नाही.

मात्र, न्यायालयाच्या निकालामुळे न्याय मिळाला असुन, न्यायालयवरचा विश्‍वास अधिक दृढ झाला आहे. शेतकऱ्याच्या बाजूने निकाल लागल्याने दिंडोरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, व्यापारी वर्गात मात्र अनेक तर्क-वितर्क सुरु आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT