Nashik Grapes Export : द्राक्षपंढरी नाशिक जिल्ह्यातून गेल्या वर्षी एप्रिलच्या पहिल्या (Nashik News) आठवड्यात एक लाख १२ हजार ५१५ टन द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदाच्या हंगामात गेल्या आठवड्यापर्यंत २० हजार टनांनी अधिक म्हणजे, एक लाख ३३ हजार १७९ टन निर्यात झाली आहे. (grapes exports increased by 20 thousand tons from nashik news)
शिवाय द्राक्षांचे भाव किलोला ३० रुपयांच्या खाली घसरल्याने शेतकरी बेदाण्यासाठी द्राक्षे विकण्याकडे वळाले आहेत. त्यामुळे यंदा राज्यात बेदाण्याचे उत्पादन ५० हजार टनाने वाढण्याची चिन्हे आहेत. राज्यातून १०० दिवसांमध्ये १५ लाख टन द्राक्षांची विक्री होते. अडीच लाख टनापर्यंत निर्यात होतात.
हा अनुभव लक्षात घेता, सद्यःस्थितीत राज्यातून दिवसाला १५ हजार टन द्राक्षे बाजारात विक्रीसाठी येत आहेत. मात्र द्राक्षांचा खप अपेक्षित नसल्याने भाव घसरत आहेत. त्यामुळे द्राक्षांच्या खरेदीसाठी व्यापाऱ्यांना बोलावूनही ते येत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांची आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातून गेल्या वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात युरोपमध्ये ८५ हजार ३४४, तर युरोप व्यतिरिक्तच्या देशांमध्ये १७ हजार १६९ टन द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदा गेल्या आठवड्यापर्यंत युरोपमध्ये एक लाख चार हजार ७४०, युरोप व्यतिरिक्तच्या देशांमध्ये २८ हजार ४३९ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
द्राक्षांची देशांतर्गत बाजारपेठेसाठी सद्यःस्थितीत १७ ते ३० रुपये आणि निर्यातीसाठी ५५ ते ७० रुपये किलो, असा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. रशियासाठी विकली जाणाऱ्या द्राक्षांच्या भावात किलोला दहा रुपयांनी घसरण होऊन किलोला ४० रुपये या भावावर शेतकऱ्यांना समाधान मानावे लागत आहे.
छाटणीवेळी घ्यावा लागतो निर्णय
द्राक्षांना भाव मिळत नाही म्हटल्यावर शेतकरी बेदाणा आणि वाइनसाठी द्राक्षे विकली जावीत यासाठी प्रयत्न करतात. मात्र वाइनसाठी ३० हजार टन द्राक्षे घेतली जात असल्याने वाइनसाठी द्राक्षे घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांची वणवण सुरू झाली आहे. शिवाय ‘प्रिमियम’ बेदाणासाठी द्राक्षबागा छाटणीवेळी ठरवावे लागते.
बेदाणा खाण्यासाठी की बेदाण्यासाठी बाग तयार करावी लागते. ही सारी परिस्थिती पाहता, आता भाव मिळत नसताना किती शेतकऱ्यांची बेदाण्यासाठी द्राक्षे खरेदी केला जाईल, याबद्दलचे प्रश्नचिन्ह कायम आहे. राज्यात सर्वसाधारण दीड लाख टनाच्या आसपास बेदाणा तयार होतो. मुळातच, हवामानातील बदलामुळे शेतकरी बागेतील द्राक्षे तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे बाजारातील आवक वाढत चालली आहे.
युरोपमध्ये भावात घसरण
युरोपमध्ये पाच किलो द्राक्षांना १३ युरो भाव मिळत होता. हा भाव आता नऊ युरोपर्यंत घसरला आहे. मात्र युरोपमधील आयातदार द्राक्षे घ्यायला तयार नाहीत, असा निर्यातदारांना अनुभव आहे. तसेच युरोप आणि रशियामध्ये थॉमसन वाणाला मागणी राहिली आहे.
पण बांगलादेश, चीन, आखाती देशांमध्ये थॉमसन वाणाला आयातदारांकडून प्रतिसाद मिळण्यात अडचणी येत आहेत. याशिवाय इजिप्तची द्राक्षे मेच्या अखेरीस बाजारात दाखल होण्यास सुरवात होताच, भारतीय द्राक्षांचा परदेशी बाजारपेठांमधील हंगाम संपलेला असेल.
"भारतीयांनी मध्यंतरी जपानमध्ये २५ हजार रुपये किलो द्राक्षे या आशयाची चित्रफीत पाहिली असेल. हे उदाहरण सांगण्याचे कारण म्हणजे, मुहूर्ताच्या द्राक्ष विक्रीवेळी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही ‘मार्केटिंग’ची संकल्पना मांडली गेली.
अशा पद्धतीने बाजारपेठीय संकल्पनांचा, तंत्रज्ञानाचा वापर करून विक्री वाढविण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. भारतीय वर्षाला सरासरी एक किलो ९०० ग्रॅम द्राक्षे खातात. युरोपमध्ये हेच प्रमाण ५२ किलो आहे. त्यामुळे देशातील ग्राहकांना द्राक्षे खाण्यासाठी प्रवृत्त करावे लागेल. अर्थात, द्राक्षशेती भांडवली हे गृहीत धरल्यास मार्केटिंगवरील खर्चाचा विचार करावा लागेल." - विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी
"नाशिक जिल्ह्यात ३० ते ३५ टक्के द्राक्षे विकायची बाकी आहेत. युरोप व्यतिरिक्तच्या देशांमधील द्राक्षांचे भाव घसरले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षे विकण्यासाठी व्यापाऱ्यांना बोलावले तरीही ते येत नाहीत. अशा दुहेरी संकटात द्राक्ष उत्पादक सापडलेले आहेत." - कैलास भोसले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्षबागायतदार संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.