Dada Bhuse news esakal
नाशिक

NDCC Bankच्या चौकशीसाठी SIT : दादा भुसे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठे थकबाकीदार संचालकांना सोडून लहान लहान थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा नवा धंदा सुरू झाला आहे. त्यामुळे यात लक्ष घालून राज्य शासन विशेष चौकशी पथक (एसआयटी) लावून बँकेतील गैरव्यवहारांची पाळेमुळे खोदून काढेल, असा इशारा पालकमंत्री दादा भुसे यांनी दिला.

जिल्हा बँकेतील आर्थिक बेशिस्तीबाबत सोमवारी (ता. १०) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वादळी चर्चा झाली. शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली होत असल्याकडे आमदारांनी लक्ष वेधले. त्या वेळी श्री. भुसे यांनी हा इशारा दिला. (Guardian Minister Dada Bhuse statement about NDCC bank Investigation nashik Latest Marathi News)

जमिनी लाटण्याचा धंदा

ते म्हणाले की, बँक ही शेतकऱ्यांची आहे. मात्र सध्या शेतकऱ्यांची अडवणूक सुरू आहे. सक्तीने कर्जवसुली करण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर, जमिनी लाटण्याचा उद्योग सुरू झाला आहे. आधी पत नसतांना बोगस कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची कर्ज वाटली. कर्ज लाटणाऱ्या बोगस मोठ्या कर्जदारांकडून वसुली करण्याऐवजी लहान लहान शेतकऱ्यांच्या मालमत्ता हडपण्याचा नवा धंदा सुरू झाला आहे. हे सगळे अवैध आणि चुकीचे आहे. आधी आर्थिक गैरव्यवहार करून बँक खड्ड्यात घालायची त्यानंतर शेतकऱ्यांच्या जमिनी लाटायच्या, याची चौकशी केली जाईल.

पीककर्ज वाटपात घपला

बँकेची स्थिती वाईट झाली आहे. बँकेची स्थिती विचारात घेता शासनाने शेतकऱ्यांना कर्ज वाटण्यासाठी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतून बँकेला ९२० कोटी दिले. मात्र बँकेने त्यातील जेमतेम ३० ते ३५ कोटी रुपयेच शेतकऱ्यांना कर्जरूपाने वाटले. हे सगळ्या गैरव्यवहाराची विशेष चौकशी पथक (एसआयटी) लावून चौकशी केली जाईल. बँकेचा परवाना रद्द होणे, हे प्रगतशील नाशिक जिल्ह्यातील नेत्यांसाठी अजिबात भूषणावह नाही. त्यामुळेच जिल्हा बँकेतील गैरकारभाराची विशेष चौकशी करून पंचनामा करण्याचा इशारा दिला.

संचालकांच्या १६ कोटींचे काय?

बैठकीत श्री. भुसे यांनी बँकेच्या संचालकांकडे १६ कोटी थकीत आहे. त्याची वसुली कधी होणार, किरकोळ मालमत्तापोटी कोट्यवधींचे कर्ज दिली कशी, असा प्रश्न उपस्थित करीत जिल्हा बँकेच्या अडवणुकीबाबत बैठक घेण्याच्या सूचना श्री.भुसे यांनी प्रशासकांना दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT