Guardian Minister dada bhuse statement about Shri Saptshringigarh Development Plan to Chief Minister nashik news esakal
नाशिक

Nashik Dada Bhuse : श्री सप्तशृंगगड विकासाचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे : पालकमंत्री

सकाळ वृत्तसेवा

Nashik Dada Bhuse : साडेतीन पिठांपैकी एक असलेल्या श्री सप्तशृंगगडाच्या विकास आराखड्याच्या अंतिम मंजुरीसाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे स्पष्ट करीत येत्या काही दिवसांत अंतिम मंजुरी होऊन कामांना सुरवात होणार असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले. (Guardian Minister dada bhuse statement about Shri Saptshringigarh Development Plan to Chief Minister nashik news)

श्री. भुसे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने सप्तशृंगगड ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र स्थळाच्या मूलभूत व पायाभूत सुविधांसाठी विकास आराखडा शासनास सादर केला होता. उच्चाधिकार समितीने दिलेल्या सूचनांप्रमाणे मूळ आराखड्यात बदल करून सुधारित आराखडा अंदाजपत्रक १२ जुलैला ग्रामविकास विभागाला सादर केला.

श्री सप्तशृंगगडावर मोठ्या संख्येने भाविक येतात, त्यामुळे सुधारित आराखड्यात नमूद केलेल्या मूलभूत व पायाभूत सुविधा पुरविणे अत्यंत आवश्यक असल्याने सुधारित आराखड्यास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मंत्री भुसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

काही नवीन कामांचाही समावेश

श्री सप्तशृंगगडावर यात्रेकरिता २५ ते ३० लाख भाविक येतात. या क्षेत्राला ‘ब’ वर्ग दर्जा आहे. क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेता या ठिकाणी भाविकांसाठी मूलभूत व पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी तीर्थक्षेत्राचा २३ कोटींचा विकास आराखडा शासनाला सादर करण्यात आला.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने मूळ आराखड्यात बदल करून एकूण २० कोटी २५ लाखांचा सुधारित आराखडा शासनास सादर केला. आराखड्यात प्रस्तावित काही कामे इतर योजनांतून सुरू करण्यात आल्यामुळे संबंधित कामे वगळून, तसेच भाविकांच्या गरजा, मागणीनुसार काही नवीन कामांचा समावेश करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे धागेदोरे पुण्यापर्यंत; कर्वेनगरमधून अटक केलेल्या चौघांची नावे काय?

Vidhansabha Election 2024: "पुतण्याला पुढे करून काकांनी मिळवली उमेदवारी," सोशल मीडियावर नेमकी कुठल्या चुलत्याची चर्चा?

Family Shares Dispute: माजी मुख्यमंत्र्यांच्या घरात शेअर्सवरून वाद! आई-बहिणीविरुद्ध कायदेशीर लढाई, नेमकं प्रकरण काय?

Latest Maharashtra News Updates : सुप्रीम कोर्टातील न्यायदेवेतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवण्याला वकील संघटनेचा विरोध

Hockey IND vs GER: विश्‍वविजेत्यांकडून भारतीय हॉकी संघाचा पराभव; मालिकेतही घेतली आघाडी

SCROLL FOR NEXT