Guardian Minister Dada Bhuse next to a dog while giving human salute in the Maharashtra Day ceremony on Monday at the police drill ground. esakal
नाशिक

Dada Bhuse : जिल्ह्याची सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल : पालकमंत्री भुसे

सकाळ वृत्तसेवा

Dada Bhuse : शिक्षण, आरोग्य, औद्योगिक अशा विविध क्षेत्रांत जिल्हाभर प्रशासनामार्फत लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांना नागरिकांची साथ मिळत असून, जिल्हा विकासाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले. (Guardian Minister Dada Bhuse statement Districts move towards holistic development of maharashtra din police parade nashik news)

महाराष्ट्र दिनानिमित्त (ता. १) सकाळी शरणपूर रोडवरील पोलिस मुख्यालयातील कवायत मैदानात मुख्य ध्वजवंदन संचलन झाले. या वेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल, महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री भुसे म्हणाले, जिल्ह्यातील १२७ जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री पीकविमा योजनेत २०२२-२३ वर्षात खरीप हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसाठी १६ कोटी ५५ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले.

नाशिक द्राक्ष क्लस्टरसाठी तीनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यात धर्मवीर आनंदजी दिघे महाआरोग्य अभियानाच्या माध्यमातून दहा लाख २५ हजार रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याचे या वेळी सांगितले.

संचलनात महाराष्ट्र पोलिस अकादमी, पोलिस आयुक्तालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, गृहरक्षक दल, वाहतूक शाखा, श्वान पथक, वन विभाग, अग्निशमन दल, वज्र वाहन, पर्यटन पोलिस, निर्भया पथक, जलद प्रतिसाद पथक, वन्य प्राणी बचाव पथक, १०८ रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापनाचे देवदूत या पथकांचा सहभाग होता. या वेळी पोलिसांचे संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

विविध पुरस्कारांचे वितरण

* शहर पोलिस आयुक्तालयातील उपायुक्त किरणकुमार चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईणकर यांसह तीन सहाय्यक उपनिरीक्षक व नऊ अंमलदार, महाराष्ट्र पोलिस अकादमीतील उपनिरीक्षक सुभाष गुंजाळ यांसह चौघे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सात अंमलदार, ग्रामीणचे सहाय्यक निरीक्षक मुनीर सय्यद, अंमलदार नवनाथ सानप यांसह नागरी हक्क संरक्षणच्या दोन अंमलदारांना पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले.

* इगतपुरीच्या सजा-नांदूरवैधचे एस. एस. कदम यांना आदर्श तलाठी, महिला व बालविकासच्या कुसुमताई चव्हाण, कालिंदी हिंगे, डॉ. विद्या सोनवणे, प्रा. डॉ. जोत्सना सोनखासकर, शुभांगी बेळगावकर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात आले.

* सुंदर माझा दवाखाना मोहिमेत मालेगाव सामान्य रुग्णालय, कळवण उपजिल्हा रुग्णालय, मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, बेळगाव ढगा उपकेंद्र यांना बक्षीस देण्यात आले.

* विशेष सेवेसाठी सुरक्षारक्षक रामदास चिंतामण भाबड यांना सन्मानित करण्यात आले.

लोकप्रतिनिधींची पाठ

महाराष्ट्र दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमस्थळी शहर-जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसाठीची आसनव्यवस्था करण्यात आलेली होती. परंतु, अग्रस्थानी असलेली आसने शेवटपर्यंत रिकामीच होती. शहर-जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी या वेळी उपस्थित राहिलेले नाहीत. या लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाला पाठ दाखविल्याची चर्चा मात्र कार्यक्रमस्थळी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT