Dada Bhuse with Dr. Rahul Ranalkar esakal
नाशिक

नाशिकचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार : Guardian Minister Dada Bhuse

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरासह ग्रामीण भागातील अनेक महत्त्वाचे प्रश्न शासनदरबारी प्रलंबित आहेत. प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याबरोबरच शहर व जिल्ह्यासाठी नवीन काय देता येईल, यासाठी प्रयत्नशील राहील, असे आश्वासन राज्याचे खनिकर्ममंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. (Guardian Minister Dada Bhuse statement on pending issues of nashik at Sakal Office Latest Marathi News)

पालकमंत्री झाल्यानंतर श्री. भुसे यांनी प्रथमच ‘सकाळ’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नाशिक महानगरासह ग्रामीण भागातील विविध विषयांना स्पर्श करताना ते सोडविण्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती देताना पालकमंत्री भुसे म्हणाले, मुंबई-पुणेनंतर नाशिकच्या प्रगतीचा वेग अधिक आहे.

या परिस्थितीत सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय स्टेडियमची आवश्यकता आहे, ती गरज लक्षात घेऊन शासनाकडे पाठपुरावा करू, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके स्मारकाला ऊर्जितावस्था आणण्याबरोबरच खासगी संस्थेच्या चित्रपट सृष्टी निर्माण करता येईल का, यासंदर्भात विचार करून महापालिकेला त्याप्रमाणे सूचना केल्या जातील. त्र्यंबकेश्वर रस्त्यावर खादी ग्रामोद्योग, तसेच एकलहरे रोडवर जवळपास ९० एकर शासनाच्या जागेवर नवीन प्रकल्प आणण्याचे प्रयत्न राहतील.

महापालिका क्षेत्रात औद्योगिक मालमत्ता करात झालेली वाढ कमी करण्यासाठी कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतला जाईल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कारकीर्दीत शेवटच्या अर्थसंकल्पात नाशिकमध्ये अन्नप्रक्रिया उद्योग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला जाईल. श्री सप्तशृंगगडाच्या विकासासाठी पर्यटन आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

छत्रपती स्टेडियमवर पार्किंग शक्य

नाशिक शहरामध्ये वाहन पार्किंगचा प्रश्न जटिल झाला आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यातील काही भाग किंवा अंडरग्राउंड पार्किंग करून त्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.

‘अपेक्षा पालकमंत्र्यांच्या’ सदराचा पाठपुरावा

पालकमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन नाशिकचे प्रश्न समजून घेतले. त्या संदर्भानुसार ‘सकाळ’मध्ये ‘अपेक्षा पालकमंत्र्यांकडून’ या सदराच्या माध्यमातून विविध प्रश्न मांडले जात आहेत. अपेक्षा पालकमंत्र्यांकडून या सदरांच्या अनुषंगाने उपस्थित होणारे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन श्री. भुसे यांनी संवादादरम्यान दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT