Dada Bhuse & NMC esakal
नाशिक

Dada Bhuse News : पालकमंत्री उद्या घेणार महापालिकेची झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा

Dada Bhuse News : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून महापालिकेची झाडाझडती घेणारे पालकमंत्री दादा भुसे पुन्हा एकदा महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेणार आहे.

सोमवारी (ता. १४) महापालिका मुख्यालयात विविध विषयांवर चर्चा करतील. यामध्ये प्रामुख्याने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतील. (Guardian Minister Dada Bhuse will review functioning of Municipal Corporation tomorrow nashik news)

पालकमंत्री भुसे यांच्या बैठकीमुळे मुख्यालयात कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ उडाली आहे. अनेक प्रश्न प्रलंबित आहे. यामध्ये आकृतिबंधाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. शासनाकडे चौदा हजार पदांचा नवीन आकृतिबंध मंजुरीसाठी प्रलंबित आहे.

त्याचबरोबर वादग्रस्त पदोन्नती व चौकशीची सद्यःस्थिती, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास आराखडा तयार करणे, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित बाह्य रिंगरोड, बांधकाम व्यावसायिकांना नगररचना विभागात येणाऱ्या अडचणी, दादासाहेब फाळके स्मारक पुनर्विकास, दारणा धरण ते नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट पाइपलाइन.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अमृत दोन योजनेत मंजूर झालेले प्रकल्प व सद्यःस्थिती, गंगापूर व दारणा धरणातील पाणी स्थिती, गेल्या वर्षभरात मंजुरी दिलेले वादग्रस्त प्रकल्प, उड्डाणपुलाखालील रंगरंगोटी, मेट्रो निओ, प्रस्तावित द्वारका ते नाशिक रोड डबलडेकर उड्डाणपूल, एमएनजीएलकडून रस्त्यांची खोदाई, गंगापूर ते शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत लोखंडी पाइपलाइन प्रस्ताव आदी महत्त्वाच्या विषयांचा आढावा पालकमंत्री घेतील.

स्थानिक आमदारांचा महापालिकेशी संबंधित असलेल्या प्रश्नांशी अधिक संबंध असल्याने भाजपच्या तीनही आमदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. नाशिक महापालिकेत पालकमंत्री भुसे यांनी कार्यालय सुरू करणार असल्याचे संकेत दिले होते. कामकाजाचा आढावा घेणारी बैठक हा त्यातीलच एक भाग मानला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT